अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-बॉलीवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारी आणि त्याच्या साथीदारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याबाबत वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला आयुष तिवारीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असून आयुष तिवारीला अटक करण्यात आलेली नाही. वृत्तानुसार अत्याचाराचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
पीडितेचा आरोप आहे की, आयुष तिवारीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर दोन वर्षांत अनेकदा अत्याचार केले. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, याबाबत तिने आयुषचा मित्र राकेशकडे तक्रार केली असता त्यानेही अत्याचार केले. लग्नाचं आमिष दाखवून आयुषने पीडित अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केला.
त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. मात्र, आयुषने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेत आयुषविरोधात तक्रार दाखल केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात आयुष विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, आयुषने या पीडित अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्ष बलात्कार केला. मात्र, ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या अभिनेत्री काही वेब सीरिजमध्ये काम केलं असून या घटनेनंतर कलाविश्वात पुन्हा एक खळबळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved