स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांची बदली

Published on -

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती पुणे ग्रामीण पोलीस दलात झाली आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे, खून, दरोडा, घरफोडी या गुन्ह्याबरोबरच अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास पवार यांनी लावला. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यात निरीक्षक पवार यांचा वाटा आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारांना घाम फोडणारे निरीक्षक दिलीप पवार अशी त्यांची ख्याती झाली होती. निरीक्षक पवार यांनी आपल्या कार्यकालात

अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता. आता गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे जिल्हा पोलीस दलासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!