अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते.

राजस्थानहून महाराष्ट्रात आलेल्या राठोड यांनी नगरमध्ये कोणतीही मोठी संस्था, कारखाना पाठीशी नसताना पावभाजी, ज्युसची गाडी लावून काम केले. हे काम करतानाच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झाले.
त्यांच्याही ध्यानीमनी नसेल की ज्युसच्या गाडीवाला माणूस आमदार, मंत्री होईल. पण विचारांशी बांधिलकी व निष्ठा असल्याने त्यांनी ढाण्या वाघाप्रमाणे काम केले.
अनेकदा व्यासपीठावरही त्यांचा मोबाईल वाजायचा व त्याव्दारे ते जनतेची कामे करीत असत. एक चळवळ्या, झुंजार व निष्ठावान कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved