अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता परत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची परत एकदा धावपळ उडाली. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा हवामान खात्याने इशारा दिला होता.
त्यानुसार आज दुपानंतर नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झाले असून थंडी गायब झाली आहे.
अवकाळी पावसामुळे सरासरी तापमानात वाढ झाली असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची
शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved