अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-‘जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्याने अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाच्या या संकटात जिल्हा प्रशासनास अनेकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत असून त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणे सुलभ होईल.
केएसबी कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या अॅब्युलन्स व मॉनिटरमुळे रुग्णांवर उपचार करण्यास सोपे होणार आहे. अशा उपक्रमांमधूनच नागरिकांच्या सहकार्याने कोविड विरुद्धची लढाई आपण जिंकू,
असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्ट व केएसबी लि. वांबोरी यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयास एक अॅब्युलन्स व २० मॉनिटर देण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, एच. आर. मॅनेजर रावसाहेब सोर, प्लॅँट हेड भगवान बागल, डीजीएम एचआर किरण शुक्ल,
क्वॉलिटी मॅनेजर शिरीष गायकवाड, परचेस मॅनेजर संदीप देशमुख, पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष कोकरे, विजय ढाकणे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, मनपा उपायुक्त प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved