काय सांगता ! मंत्री थोरात – पिचड- आ. लहामटे आले एकाच व्यासपीठावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- 2019 ची विधानसभा कुणीही विसरणे अशक्य आहे. जी राजकीय परिवर्तन, उलथापालथ , पक्ष बदल आदी गोष्टी या कालखंडामध्ये घडल्या. या काळात एकाच पक्षातील सहकारी एकमेकांचे विरोधक बनले.

संगमनेर-अकोले मधील माजी मंत्री पिचड, मंत्री थोरात , आ. लहामटे हे एकेकाळचे स्वपक्षीय विरोधक झाले. परंतु तब्बल वर्षभरानंतर हे लोक एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. निमित्त होते, हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॅास्पिटल येथे कोव्हिड सेंटरचा शुभारंभ .

याचा प्रारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे,

माजी आमदार वैभवराव पिचड, त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक अशोकराव भांगरे हे सर्व जण एकाच व्यासपीठावर आले होते. यापूर्वी अकोलेचे सुपुत्र,समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोले बाजारतळावरील सभेत पिचड पिता- पुत्र व आ. डॉ.किरण लहामटे एकत्रित आले होते.

त्यानंतर आज पुन्हा ते या व्यासपीठवार एकत्रित आले.तर वर्षभरापूर्वी पिचड पिता पुत्रांनी भाजपामध्ये प्रवेश केला.त्यानंतर माजी मंत्री पिचड व थोरात प्रथमच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले.उद्घाटनप्रसंगी संयोजकांनी एका ठिकाणी फीत कापण्यासाठी कात्री डॉ. लहामटे यांचेकडे दिली मात्र

त्यांनी स्वतः फित न कापता कात्री माजी मंत्री पिचड यांच्याकडे देत त्यांना फित कापण्याची विनंती केली. आ.डॉ. लहामटे यांनी राजकारण बाजूला ठेवत ज्येष्ठत्वाचा आदर केल्याचे उपस्थितांना दिसले. कोरोनाच्या संकट काळातही शहरात काही जणांनी पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला आहे मात्र आपल्या संगमनेर अकोल्याच्या डॉक्टरांचे सेवाभावीवृत्तीने काम सुरू असल्याचे मंत्री थोरात यावेळी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment