नगर : पन्नास वर्षे मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. या काळात असंख्य आव्हाने व निवडणुकांचा सामना मी केला. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहिले नाही. अनेक वेळा पोलिस कारवायांचा सामना करावा लागला, पण परवा पोलिसांना ज्या पध्दतीने कारवाई करायला लावली ते अत्यंत क्लेशदायक होते.
हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजकीय नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे
गडाख यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, शेतकरी प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी शंकरराव व इतर कार्यकत्यांवर नेवासा कोर्टात खटले दाखल केले. त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
या सर्व कायदेशीर प्रक्रियेविषयी कोणतेही दुमत नाही, त्याचा मला आदरच आहे. पण त्याची अंमलबजावणी करण्याची पध्दत आणि पोलिसांचा अतिरेक चुकीचा होता. सकाळी घरात असताना शंकरराव यांना शोधण्यासाठी पोलिस घरात घुसले.
घरातील सर्व महिला, सुना, नातवंडे या अचानक झालेल्या प्रकारामुळे गडबडून गेले. शंकरराव कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत ते आल्यावर न्यायालयात हजर होतील, असे विजय व प्रशांत यांनी पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी घराच्या कानाकोपऱ्याची झडती घेतली.