बनावट ॲपद्वारे शनिभक्तांची कोट्यावधींची फसवणूक, मंदिर प्रशासन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे आंदोलन

Ahilyanagar News:  सोनई- श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ॲपची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व विविध संघटनाकडून काल सोमवारी शिंगणापूर देवस्थान मंदिर परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शनिशिंगणापूरमध्ये काहींनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून तसेच बनावट देणगी पावती व बनावट ॲपच्या माध्यमातून गैरप्रकार करून हा … Read more

भंडारदरा वीकेंडला हाऊसफुल्ल! काजवा महोत्सव आणि गिर्यारोहणासाठी हजारो पर्यटकांची गर्दी

Ahilyanagar News: भंडारदरा- पर्यटनाची पंढरी महणून प्रसिद्ध असणारा भंडारदरा वीकएंडच्या सुट्टीला हाऊसफुल्ल झालेला दिसून आला. हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्यातील काजया महोत्सवाचा आनंद घेत निसर्ग सौंदर्याची अनुभुती घेतली. अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या भंडारदऱ्याला निसर्ग पर्यटनाची पंढरी म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून शनिवारी व रविवारी हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट देत निसर्ग पर्यटनाचा आनंद उपभोगला. … Read more

महसूलमंत्र्यांचे आदेश धाब्यावर! जिल्हाधिकाऱ्यांकडून राशीन मंदिर अतिक्रमण प्रकरणाकडे दुर्लक्ष?

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण, धर्मादाय आयुक्तांचा निष्काळजीपणा, भूमी अभिलेख कार्यालयाने केलेली चालढकल, याबाबत अनेकांनी आवाज उठवला होता. याची दखल महसूलमंत्री यांनी घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याकडे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले म्हणून या प्रकरणात आता थेट मुख्यमंत्री यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी योगेंद्र … Read more

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच अभियंत्यानी केली सीना नदीच्या पुलाची पाहणी, काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नका शिवसेनेची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- मागील आठवड्यामध्ये अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालून करण्यात आली होती. त्यानंतर आज पुणे येथून राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांनी शहरात सुरू असलेल्या सीना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू … Read more

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला आधार

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील बाभळेश्वर, राजूरी, ममदापूर, तिसगाव वाडी आणि अस्तगाव परिसरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळसदृश पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे डाळींब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे पडून घरे आणि गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाला … Read more

क्रिकेट पाहून परत येत असतांना अहिल्यानगरजवळ क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात, २ जण ठार तर ११ जण जखमी

Ahilyanagar News: नेवासा- पुणे येथून जळगावकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भिषण अपघात होऊन त्यात बोदवड (जि. जळगाव) येथील खाजगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थी ठार झाले. तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात काल सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  याप्रकरणी क्रिकेट प्रशिक्षक गौरव सुनील … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात मेथी महागली! कोथिंबीर-शेपूला मिळतोय एवढा भाव?, जाणून घ्या भाजीपाल्याचे आजचे दर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची १९९१ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये १८ हजार ७० पालेभाजांच्या जुड्यांचा समावेश होता. यावेळी मेथीच्या ५०५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी मेथी जुडीला २५ ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळाला.  कोथिंबीर जुडीला ८ ते २५ रुपयांपर्यंत भाव कोथिंबीरीच्या १७ हजार ६५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत आंब्याची सर्वाधिक आवक, हापूसला ११ हजारापर्यंत भाव तर मोसंबीच्या दरात मोठी घसरण

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी ३७२ क्विंटल विविध फळांची आवक झाली. चार दिवसांच्या तुलनेत रविवारी फळांची आवक घटल्याचे दिसून आले. यावेळी मोसंबीला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीच्या भावात सुमारे तीन हजार रुपयांनी घसरण झाली होती.  हापूस आंब्यांना 11 हजारापर्यंत भाव डाळिंबाला २००० ते १२ हजारांपर्यंत, तर पपईला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल १५०० … Read more

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार, मोरवाडी धरणाबाबत १८ जूनला मंत्रालयात बैठक- आमदार खताळ

Ahilyanagar News: संगमनेर-तालुक्यातील पठारभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी येथे धरण व्हावे, अशी साकुर पठारभागातील जनतेची अनेक वर्षाची मागणी होती. या मागणीचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली असून १८ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयामध्ये मंत्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरवाडी धरणाच्या संदर्भात जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती आ. अमोल … Read more

अवकाळी पावसामुळे भंडारदरा परिसरात टळली भीषण पाणीटंचाई, शासनाचे वाचले लाखो रुपये

Ahilyanagar News: भंडारदरा- गत आठवड्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शासनाची डोकेदुखी दूर केली आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई यावर्षी टळली असून टँकरवर दरवर्षी खर्च होणारे शासनाचे लाखो रुपये अवकाळी पावसामुळे वाचले आहेत. त्यामुळे यंदा अनेक गावांची तहान भागली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासलेली नाही. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानला ११० कोटींच्या जलप्रकल्पाची मंजुरी! १५ वर्षांची पाणी समस्या सुटणार

Ahilyanagar News: शिर्डी- पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी गरज आणि आव्हान असणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने ही बाब ओळखून १५ वर्षाचा दृष्टीकोन ठेवत केलेले नियोजन म्हणजे एक यशस्वी आणि दूरगामी धोरणात्मक पाऊल ठरणार आहे. ११० कोटी रुपयांच्या प्रकल्पातून जलसाठा, शुद्धीकरण आणि पुरवठा यावर केंद्रित हा उपक्रम संस्थानच्या विकासासोबतच पर्यावरण जपणारा ठरणार आहे. याबाबत संस्थानमधील सूत्रांकडून … Read more

शेतकऱ्यांनो! पीक फेरपालट करून जमीनीचा पोत सुधरवा अन् उत्पादनात भरघोस वाढ करा; कृषी खात्याचा सल्ला

Ahilyanagar News: श्रीरामपूर- आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून सध्या पीक लागवडीचा निर्णय घेतला जात आहे. अनेक शेतकरी दरवर्षी एकच पीक घेत असल्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा शेतात पीक फेरपालट केल्यास शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जमिनीतील एनपीके नाहीसा अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस, सोयाबीन आणि मका पिकाने … Read more

राहुरीत पैसे चोरणाऱ्या सराईत टोळींचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे लावला शोध, सापळा रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahilyanagar News: राहुरी- बँक किंवा पतसंस्थांसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीचा छडा लावत राहुरी पोलिसांनी तीन चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल याबाबत … Read more

श्रीरामपुरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत,महावितरणचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? तब्बल २८ तासांनी वीजपुरवठा केला सुरळीत

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शनिवारी बाभळेश्वर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी महावितरणचे पोलही पडले.परिणामी बाभळेश्वर सबस्टेशनहून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना त्रास श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर त्रास सहन करावा लागला. युद्ध पातळीवर पोल उभे करून श्रीरामपूर शहराला वीज पुरवठा सकाळी … Read more

चापट पडली… आणि आयुष्य संपलं ! शिर्डीतील ‘त्या’ रात्री भयानक घडलं…

शिर्डी येथील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत झोपलेल्या एका व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारली. त्या मारामुळे तो पेव्हर ब्लॉकवर पडून जखमी झाला आणि काही क्षणातच जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक … Read more

गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईन कामासाठी १० दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकात १५० झाडे लावणार

अहिल्यानगर – शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते तपोवन रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मार्गावर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे. गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौक येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ८ जून ते १८ जून या कालावधीत हे काम करण्यात … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षी विजेच्या धक्क्याने ७२ व्यक्ती आणि ३७ जनावरांचा मृत्यू, पावसाळ्यात विजेपासून वाचण्यासाठी ‘या’ महत्वाच्या खबरदाऱ्या घ्या!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात पावसाळ्यात वीज अपघातांमुळे मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात वीज धक्क्याने ७२ व्यक्ती आणि ३७ जनावरे मृत्यूमुखी पडली, तर १८ जण जखमी झाले. यातील एक मृत्यू हा वीज कर्मचाऱ्याचा होता. पावसाळ्यातील ओलसर वातावरण, अतिवृष्टी आणि तांत्रिक बिघाड यामुळे वीज अपघातांचे प्रमाण वाढते. यामुळे नागरिकांनी विद्युत उपकरणे … Read more

जिल्ह्यातील रेशनधारकांना तीन महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार, जिल्हा पुरवठा विभागाकडून उपाययोजना सुरू

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत रेशन वितरणात अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन लाभार्थ्यांना एकदाच ३० जून २०२५ पर्यंत वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गोरगरीब आणि अंत्योदय लाभार्थ्यांना पावसाळ्यातील पूर आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत धान्य मिळवण्यासाठी रांगेत भिजण्याची वेळ येणार नाही. जिल्हा … Read more