तीन तोळ्यांचे गंठण लांबवले

अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले. नगर-कल्याण रस्त्यावरील माधवनगर बोर्डाजवळ ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कविता सुनील बाचकर (वय ३२, रा. माधवनगर, नगर-कल्याण रोड) या नगर-कल्याण रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एकजण आला. त्याने बाचकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून … Read more

घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास

अहमदनगर : नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २८ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल चंद्रकांत वसंत मोरे (वय-२८ रा. … Read more

महापालिकेच्या 50 टक्के निधी खर्चास स्थगिती

अहमदनगर: महापालिका अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आणि जाता जाता तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी खर्चास मंजुरी दिलेल्या 50 टक्के महापालिका निधीच्या खर्चास प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्थगिती दिली आहे. महापालिका निधी म्हणून मोठ्या प्रमाणात निधीची मंजुरी अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.    या  निधीस भालसिंग यांनी जाता जाता मंजुरी दिली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर … Read more

चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असताना ही वापर सर्रासपणे सुरू

नगर – शहरात चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मकर संक्रातीच्या उत्सवामुळे शहरातील पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र त्यासाठी चायना बनावटीच्या मांजाचा वापर केला जात असल्याने नागरिक व पक्षी यांच्या जीविताला अपाय होऊ लागला आहे. अशाच दोन घटनांत शहरातील दोन नागरिक जखमी झाले. नालबंदखुंट येथील सय्यद … Read more

शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप

नगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे. नगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, … Read more

भाचीने गळफास घेत संपविले जीवन, धक्का सहन न झाल्याने मामाचा झाला असा शेवट

अहमदनगर :- भाचीने गळफास घेतल्याचे घटना मामाला कळताच त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. मामाचे ह्यदयविकाराने निधन झाले. महिलेच्या गळफासप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॅलिस्टा ग्रॅहम रॉक (वय-३२, रा. सौरभनगर, भिंगार) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. भिंगारमधील सौरभनगर येथे रॉक या युवतीने मंगळवारी पहाटच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. … Read more

ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या खोल्यांना या एका कारणामुळे ठोकले सील

अहमदनगर :- महापालिकेच्या बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या पाच खोल्यांना सील ठोकत जप्तीची कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी केली. टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसकडे मनपाची मिळकतीवरील मालमत्ताकराची आज अखेर थकबाकी १५ लाख ३७ हजार ४६९ रुपये एवढी आहे. महापालिकेच्या वतीने संबंधितांना वेळोवेळी थकबाकी भरण्याबाबत कळविले होते. मात्र त्यांनी … Read more

…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप

अहमदनगर  – शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत.  अशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होऊ देणार नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशांवर कारवाईची मागणी करणार … Read more

नगरसेविका सारिका भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द !

  अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या प्रभाग सहा अ मधील विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांची ही दुसरी टर्म होती. मागील महापालिकेत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. मात्र जातपडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्दबातल … Read more

लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड

नगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई … Read more

पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील सम्राट ‘बारा-शून्य’ करू असा नारा देत होते. त्यांना गर्व झाला होता. साधन संपत्ती त्यांच्या हाती होती, पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता लगावला. नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण … Read more

नायलॉन मांजामुळे गळा कापला

कोपरगाव : सोनारी येथील सुकदेव आघाव हे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धारणगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना चिनी बनावटीच्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात हा धोकादायक मांजा सर्रास विकला जात असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे. आघाव हे संजीवनी … Read more

प्लास्टिक उत्पादनावर निर्बंधासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार जगताप

नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले … Read more

वाडिया पार्कमधील अनधिकृत इमारतीवर कारवाई 

अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठी इमारत पाडल्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली … Read more

राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर : मायबाप सरकार . आमचं काही चुकतं का? नाही तर आम्हाला मरू द्यावाट पाहून पाहून आमची सहनशीलता आता संपुन गेली तुम्ही काही दाद देत नाही, मग आम्हाला तुमच्या दारातच मरु द्या. अशी आर्त हाक कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथे एप्रिल ते ऑक्टोबर२०१७ या काळात अवकाळी व अतिवृष्टीमुळे १०१ शेतकऱ्यांच्या … Read more

‘त्या’ मुलांच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

अहमदनगर : विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र, मुंबई यांनी ऑपरेशन मुस्कान दि.२८ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या बालकाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन मुस्कान-७ ही शोधमोहिम दि.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात दरवर्षी प्रमाणे राबविण्याचे आदेश पारीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मुस्कान-७ शोधमोहिम दि.१ पासुन सुरू केली असल्याची माहिती अनैतिक मानवी … Read more

भररस्त्यावर तरुणावर चाकूने वार

नगर: नगर शहरात तोफखाना परिसरात शितळादेवीच्या मंदिराजवळून दीपद देवानंद ताडला, वय १९ रा. दातरंगे मळा, नालेगाव, नगर हा तरुण दुचाकीवरुन जात होता. आरोपी मोहीत परदेशी याने दीपक ताडला या तरुणाच्या दुचाकीची चावी काढून घेतली व शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. धारदार चाकूने मोहीत परदेशीने दीपक या तरुणावर वार करून हातावर, पोटावर जखमी केले. गंभीर जखमी … Read more