पक्षादेशाप्रमाणे काम करणार – महापौर बाबासाहेब वाकळे 

अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.  या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची … Read more

नगर, पुणे, मुंबई येथे मालमत्ता…अशी आहे अनिल राठोड यांची संपत्ती !

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे ३ कोटी ५९ लाख ७० हजार १६७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे ६३ लाख ७५ हजार ४८८ रुपयांची संपत्ती आहे. राठोड यांनी काल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे उमेदवारी अर्जासह संपत्ती विवरणाचे शपथपत्र सादर केले. त्यानुसार त्यांच्याकडे १ कोटी २० लाख ६५ … Read more

आ.संग्राम जगताप यांची ‘इतकी’ आहे संपत्ती तर तीन कोटींचे कर्ज !

अहमदनगर : शहर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ९ कोटी ३३ लाख ५७ हजार ४५७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शीतल कोट्याधीश आहे. जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ७ कोटी ११ लाख २० हजार ६३९ रुपयांची … Read more

माजी खासदार दिलीप गांधींचा अनिल राठोड यांना विरोध कायम

नगर शहरातून शिवसेना-भाजपा युतीची उमेदवारी माजी आमदार अनिल राठोड यांना पुन्हा मिळाली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. भाजप व सेना एकत्रित लढत असल्यामुळे आता सर्वांचीची मोट सेनेला बांधावी लागणार आहे. मागील काही काळात राठोड व गांधी यांच्यात सुरू असलेला … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकास अटक

नगर : पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक समद खान याला गुरुवारी पहाटे भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. खान मुकुंदनगर येथे घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. गेल्या महिन्यात मोहरम व गणेशोत्सवामुळे शहरातून तीनशेहून अधिक गुन्हेगारांना शहरबंदी करण्यात आली होती. त्यात खानचा समावेश होता. शहरबंदी असताना खान मुकुंदनगरमध्ये … Read more

फक्त जुमलेबाजी न करता काम करुन दाखवलंय – आ. संग्राम जगताप

नगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी आयटी पार्कमधील युवक-युवती तसेच आई-वडिलांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वडील तथा आमदार अरुण जगताप, आई पार्वतीबाई जगताप तसेच आयटीपार्कमध्ये नव्याने कार्यरत झालेले दर्शन गाडळकर, आकांक्षा भिंगारदिवे, फराह इनामदार, शुभम जोशी, अक्षय बांगर, साहिल सचदेव, सौरभ पवार, अजिंक्य आढाव, देवेंद्र वैद्य हे युवक-युवती … Read more

नगर शहराला उद्योग नगरी बनवण्याचा संकल्प करीत किरण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगर : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली तीस वर्ष विकासापासून वंचित असलेल्या नगर शहरामध्ये उद्योग नगरी उभा करून त्या माध्यमातून तरुणाईला रोजगाराची उपलब्धता करून देण्याचे आपले ध्येय असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक … Read more

ईडीने शरद पवारांवर केलेली कारवाई योग्य !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्यच असून, त्यांचे पाप झाकण्याचे काम कोणी करू नये. पवार यांना पुढील दोन वर्षात जेलमध्ये घालण्याचे काम करणार असून पाटबंधारे खात्यातील त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा घणाघात खा. सुजय विखे यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महायुतीचे उमेदवार आ. शिवाजी कर्डिले … Read more

श्रीपाद छिंदम या पक्षाकडून लढविणार निवडणूक !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर … Read more

तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपवणार- वाकळे, कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघामधुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. अहमदनगर- अहमदनगर शहराचा तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपविण्यासाठी आणि दगडापेक्षा विट मऊ या अंधश्रध्देतून मतदार संघ बाहेर काढून सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक, औद्योगिक आणि नागरी विकास घडविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सेक्रेटरी अ‍ॅडव्होकेट.शांताराम … Read more

माजी महापौर अभिषेक कळमकर काय करणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला माजी महापौर अभिषेक कळमकर व त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर यांनी आव्हान दिले आहे. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळेही शर्यतीत होते. पण पक्षाची उमेदवारी जगतापांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर काळेंनी पक्षाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. या पार्श्वभूमीवर आता माजी महापौर कळमकर … Read more

जिल्हाभरात सात जणांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर जिल्ह्यातील ह्या सहा नेत्यांना उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील पाच नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. अकोले – किरण लहामटे , कोपरगाव – आशुतोष काळे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – निलेश … Read more

समोरासमोर येऊन चर्चा करा – आ.संग्राम जगताप

नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील. मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी … Read more

अनिल राठोड यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला येणार !

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेत प्रवेशाबद्दलच्या काही अफवा होत्या, पण त्यात काहीच तथ्य नव्हते, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म आणल्यानंतर उपनेते राठोड यांचे केडगावकरांनी रंगोली चौकात स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, अंगत महानोर, नगरसेवक आमोल येवले, विजय पठारे, सुनील सातपुते, आबा सातपुते,पप्पू ठुबे, … Read more

नगर मध्ये रंगणार भैय्या VS भैय्या लढत

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदारसंघात मागील २०१४च्या निवडणुकीतही या दोन्ही भय्यांमध्येच प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेली, व त्याचा फायदा जगतापांना झाला. २५ वर्षे आमदारकी केल्यानंतर राठोडांचा त्यावेळी पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदा युती व आघाडी … Read more

शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात,राष्ट्रवादीला धक्का !

अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारास सुरवात

अहमदनगर :- आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास मंगळवारी (दि. १) सकाळपासून सुरुवात केली आहे. शहरात प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन केले असून प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन व नारळ वाढवून केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार … Read more