Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे. Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत … Read more

सुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.

अहमदनगर :- सुनेच्या भावानेच महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार दिल्लीगेटच्या मोहनबागेत घडला. रविवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. भूतकरवाडीमधील नातेवाईक असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पिडित महिलेच्या बहिणीला त्रास का देता असे म्हणून शिवीगाळ करत थोबाडीत मारली. तसेच साडी, … Read more

विखे पाटील भाजपात जातील असे वाटत नाही !

संगमनेर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या,  तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळे वागतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केली. थोरात म्हणाले, विखे भाजपत जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. तथापि, राज्यातील महत्त्वाची जबाबदारी … Read more

पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन !

कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली.  पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे. सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही. हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी … Read more

हिशेब मागणाऱ्यांनी माहिती घ्यावी,आ.संग्राम जगताप यांची टीका

अहमदनगर : नगर शहराचे आमदार असलो, तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले. नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आपण शासनाकडून मंजूर करून आणली असून त्यासाठी सुमारे १५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. यातील काही रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात … Read more

पुत्रप्रेमामुळे अखेर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात दाखल !

अहमदनगर :- मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय कोंडीत सापडलेले विरोधी पक्षनेतेे राधाकृष्ण विखे यांनी पुत्रप्रेमापोटी अखेर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी मेळ बसवत जुळवून घेतले. मंगळवारी डॉ. सुजय यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे यांनी शहर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर :- केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून श्रध्दांजली वाहिली.  कॅण्डलमार्चमुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक वर्ष … Read more

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

अहमदनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, 8 एप्रिल 2019 रोजी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गायकवाड सबाजीराव महादू (अपक्ष),घोडके गौतम काशिनाथ (अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष), शेख रियाजोददीन फजलोददीन दादामियाँ (अपक्ष),शेटे गणेश बाळासाहेब (अपक्ष), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष) यांनी … Read more

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश?

अहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.  त्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून  डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही … Read more

तिकीट कापले तरीही पक्षाचेच काम करणार – खा.दिलीप गांधी

अहमदनगर :- राजकारणामध्ये चढ – उतार चालू असतात. पक्षाने जरी मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, माझे तिकीट कापले मात्र तरीही नाराज न होता, न थांबता पक्षाचेच काम करणार हे मी जाहीर केले आहे. पक्षविरोधी कृती करणे आमच्या रक्तात नाही. २००४ मध्येही पक्षाने माझे तिकीट कापले होते, तरीही पक्षाचेच काम केले, असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार तथा … Read more

धनश्री विखेंचा अर्ज का ठरला अवैध ? २६ अर्ज ठरले वैध !

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये २६ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत. यापैकी सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला, तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिली.  … Read more

सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ !

अहमदनगर :- लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास … Read more

सुजय विखेंच्या पत्नीचाही भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत. सौ. धनश्रीताईंनी देखील भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल … Read more

चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण

अहमदनगर :- बोल्हेगाव येथील शंभुराजे चौकात चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. भैरवनाथ अण्णा शिंदे असे मारहाण झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. शिंदे हे घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली. जवळच पडलेले लाकडी दांडके घेऊन … Read more

प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तरुणास मारहाण

अहमदनगर :- प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तिघांनी तरुणास शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना लालटाकी परिसरातील सिद्धार्थनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वप्निल शेलार याच्या फिर्यादीवरून सुनील शेलार, सचिन शेलार, रुपेश शेलार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. स्वप्नील घरासमोर उभा असताना तू प्रेमविवाह करू नकोस, असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. त्याच्या तोंडावर … Read more

जिल्हा न्यायालयात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या वकिलास दंड.

अहमदनगर :- न्यायालयात थुंकणाऱ्या एका वकिलासह चौघांविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आवारात तंबाखू, पान, मावा, गुटखा खाऊन थुंकून भिंती खराब करण्यात आल्या आहेत. न्यायालयातील भिंतीवर थुंकू नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही वकील, पक्षकार व इतर जण तंबाखू खाऊन थुंकून भिंती खराब करत … Read more

संग्राम जगताप यांच्यासाठी राज ठाकरे अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे. त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या … Read more

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेही भाजपवासी होणार ?

अहमदनगर :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढील पंधरा दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तवाहिनीवर बुधवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डाॅ. सुजय नुकताच भाजपत गेला आहे. भाजपने त्याला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विखे … Read more