अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

नेवासा तालुक्यात घराला आग लागून गॅस टाकीचा स्फोट, वृद्धेचा संसार उघड्यावर

नेवासा- तालुक्यातील भानसहिवरा गावात मारुती तळे वस्तीवर एक धक्कादायक घटना घडली. २५ मार्चला रात्री ८:३० वाजता घरी कोणीही नसताना अचानक आग लागली आणि गॅस टाकीचा स्फोट झाला. या घटनेत मोठं नुकसान झालं, ज्यामुळे ७७ वर्षीय द्वारकाबाई भणगे यांचा संसार उघड्यावर पडला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध महिलेची ही आपत्ती पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे. … Read more

नेवासा तालुक्यातील १६ गावांना हर घर जल’चं पाणी कधी मिळणार? योजना बंद, लोक तहानलेलेच!

नेवासा तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या १६ गावांमध्ये सुमारे ५१ हजार लोक राहतात. या गावांतील प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे आश्वासन ‘हर घर जल’ योजनेने दिले होते. पण हे स्वप्न कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली आहे. गंगथडीचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गोहत्येच्या आरोपाखाली ८ सराईत गुन्हेगार हद्दपार – नेमकं काय घडलं?

२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी … Read more

जलजीवन योजनेच्या कामाचा ‘स्पीड ब्रेकर’! ठेकेदारावर कारवाई का होत नाही ?

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर आणि इतर सात गावांसाठी नियोजित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही योजना एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे या योजनेच्या कामाला अजूनही एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. परिणामी, गावकऱ्यांना २०२५ च्या उन्हाळ्याऐवजी २०२६ च्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळेल. ३४ कोटींच्या योजनेच्या संथ प्रगतीमुळे … Read more

अतिक्रमणामध्ये टपरी काढली ! सलून व्यवसायिकाने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली…

अतिक्रमण कारवाईमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने एका सलून व्यावसायिकाने नैराश्यातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळील ढोरा नदीत उडी घेऊन पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय 50) यांनी आत्महत्या केली. बुधवारी (दि. 19) ते बेपत्ता झाले होते, त्यानंतर आज शुक्रवारी (दि. 21) दुपारी त्यांचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ … Read more

सौंदाळा येथील महादेव मंदिरातून मूर्त्यांची चोरी

१३ जानेवारी २०२५ भेंडा : नेवासे तालुक्यातील सौंदाळा आणि परिसरात आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्यात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या, दुचाकी चोऱ्यांचा समावेश असून,अशा अनेक घटना घडत असतानाच चोरांनी महादेव मंदिरात गणपतीची मूर्ती आणि शिव लिंगावरील पार्वती माता या दोन मूर्तीची मंदिरातून चोरी झाली. या मूर्तीची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे व … Read more

सुरेशनगरच्या सरपंचाचा ५ लाखांचा अर्थिक गैरव्यवहार ! अमृत उभेदळ यांचा आरोप; कारवाई न झाल्यास जलसमाधीचा इशारा

९ जानेवारी २०२५ कुकाणा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्राम पंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत यावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत सुरेशराव उभेदळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.याबाबत … Read more

२० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात ; ज्येष्ठ साहित्यिक गडाखांची माहिती

७ जानेवारी २०२५ सोनई : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि. १०) ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात गडाख … Read more

शेतकऱ्यांच्या तक्रारी नको : आ. लंघे यांनी पहिल्याच बैठकीत टोचले अधिकाऱ्यांचे कान !

३ जानेवारी २०२५ नेवासा : माझ्याकडून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्रास होणार नाही. मात्र तालुक्यातील कुठल्याही प्रशासकीय कार्यालयाबाबत शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरीकांच्या तक्रारी नको, अशा सूचना देत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिल्याच बैठकीत कान टोचले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल गुरुवारी (दि. २) तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, प्रमुख कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

नेवासा मतदारसंघ भाजपला की शिंदे सेनेला? लंघे आणि मुरकुटे मुंबईत तळ ठोकून; ‘सागर’वर होईल का निर्णय?

fadanvis and shinde

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता जवळपास महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये जवळपास प्रत्येक पक्षाच्या संदर्भात महत्त्वाचे असलेले जागावाटप जवळपास निश्चित समजले जात आहे. परंतु तरीदेखील राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत अजून देखील तिढा असल्याचे दिसून येत आहे. अशा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे देखील पक्षांपुढे राजकीय पेच निर्माण झालेला आहे. अशीच काहीशी परिस्थिती … Read more

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शंकरराव गडाखांना आयकर विभागाचा झटका! गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर विभागाने पाठवली 137 कोटींची नोटीस

shankar rao gadakh

Ahilyanagar News: राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीचा फिवर चढायला लागला असून राजकीय वातावरण तापायला लागले आहे. प्रत्येक पक्षांकडून या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असून बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांना बंडखोरीचा देखील सामना करावा लागू शकणार आहे. अशाच पद्धतीचे राजकीय वातावरण आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख … Read more

नेवासा विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळेल की शिंदेसेनेला? भाजप आणि शिंदे सेनेकडून इच्छुकांची भाऊगर्दी, गडाखांच्या विरोधात कोण असेल उमेदवार?

newasa news

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात झाली असून याचाच भाग म्हणून भाजपाच्या माध्यमातून रविवारी जवळपास 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचा मात्र या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेवासा विधानसभा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचे नामांतर ज्ञानेश्वरनगर करा,अन्यथा विधानसभा निवडणुकीवर….. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांचा इशारा

newasa

Ahmednagar News: आपल्याला माहित आहे की,नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर शहराचे नामांतरण करण्यात आले. अनुक्रमे बघितले तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आता सध्या अहमदनगर शहराचे अहिल्यानगर अशाप्रकारे नामांतर प्रक्रिया पार पडली असून अगदी त्याच धर्तीवर आता  अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचे नामांतरण करून ते ज्ञानेश्वर नगर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नेवाशाचे नामांतर … Read more

नेवासा तालुक्यातील अनेक गावांवरून रात्री ड्रोनच्या घिरट्या! लांडेवाडीत कोसळले ड्रोन; नेमके आहे कुणाचे? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

drone

Ahmednagar News: गेल्या आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन गिरट्या घालताना दिसून आले व त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. नेवासा तालुक्यातील झापवाडी,भेंडा कुकाना, लोहगाव, सोनई, वडाळा, रस्तापूर, चांदा, तुकाई, शिंगवे इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी तीन ते चार ड्रोन फिरताना नागरिकांना दिसून आले होते व त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले … Read more