तीन दिवसांत साई संस्थानच्या दानपेटीत सव्वासहा कोटी रुपयांचे दान प्राप्त : गोरक्ष गाडीलकर

sai baba

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शनिवार २० ते सोमवार २२ जुलै या कालावधीत आयोजित श्री गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये ६ कोटी २५ लाख ९८ हजार ३४४ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. याबाबत पत्रकात गाडीलकर यांनी म्हटले, की देणगीमध्ये रोख स्वरुपात २ कोटी ५३ लाख २९ हजार ५७५ रुपयांची दक्षिणा … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील ८५ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटींचा पीकविमा मंजूर !

rhorat

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले की, आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा … Read more

साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता ४० कोटीचा निधी मंजूर, मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेला येणार मूर्त स्वरूप!

laser show

शिर्डी शहरामध्ये साकार होणार्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.शहराच्या विकासासाठी नगरपरीषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी दिला जातो. शिर्डी नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरात येणार्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थिम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे.यासाठी राज्य सरकार … Read more

पाणलोटासह लाभक्षेत्रात पावसाची प्रतिक्षा, कोपरगावला १२ दिवसाआड पाणी, दारणा धरणात ५६ टक्के पाणी !

darana

कोपरगाव गेल्या २ महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ७ टीएमसी क्षमतेचे दारणा धरण अवघे ४ टीएमसी इतके भरले आहे. त्यात ५६ टक्के पाणी साठा तयार झाला. पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या धरणात ऑगस्ट उजाडला तरी जेमतेम पाण्याचा साठा आहे. त्यामुळे हजारो शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक – धंनजय मुंडे !

dhannjay

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाज बांधवांना १० टक्के आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. सगेसोयऱ्यांचा विषय राहिलेला आहे, मात्र या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे. संविधानाला धरून सगळ्या सुविधांची व्याख्या करून हा अध्यादेश न्यायालयात कुठेही अडचणीचा ठरू नये, तो न्यायालयात टिकावा व त्याचा सकल मराठा समाजाला फायदा व्हावा, अशी भूमिका … Read more

शासकीय योजना सामान्य जनतेच्या करामधून वसुल केलेल्या पैशाच्या, पुढाऱ्यांच्या खिशातील नव्हे : आ. कानडे

kanade

राज्याचे सध्याचे सरकार हे फक्त घोषणाचे पाऊस पाडणारे सरकार आहे. अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली. राहुरी तालुक्यातील आंबी येथील एका कार्यक्रमात नुकतेच ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव कोळसे अध्यसस्थानी होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मागील १० ते २० वर्षात जे कामे झाली नाही. ते रखडलेले रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडवून प्राथमिक सर्व शाळा … Read more

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट !

एक रूपयात पीकविमा

शासनाने एक रूपयात पीकविमा योजनेची घोषणा केली. मात्र नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापुस, बाजरी, मुग, मका, उडीद, तुर या पिकासाठी पीक विमा भरला होता. परंतु सदर पीकाचा विमा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विमा रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मुख्यमंत्री यांनी … Read more

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे – विठ्ठलराव शेळके

kalava

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे तसेच शेतीसाठीच्या पाणीपट्टीत केलेली १० पट वाढ रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी उजवा तट कालव्याच्या उपअभियंत्यांना राहाता येथे दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे … Read more

दूध दरप्रश्नी २३ जुलै रोजी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन !

dudh

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. दूध हंडी, कोतूळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता … Read more

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरुच, धरण ५० टक्के भरले !

BHANDARADARA

भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरुच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अति महत्त्वाचे धरण समजले जाते. या … Read more

श्रीरामपूर येथे घरफोडी करणाऱ्या दोन आरोपी मुद्देमालासह अटक, एक फरार !

atak

श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई श्रीरामपूर पोलिसांनी केली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की २२ जून रोजी नगरपरिषदेच्या निवृत्त कर्मचारी लता गोविंद शिंदे (रा. लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी रोड, वार्ड नं. १, ता. श्रीरामपूर) … Read more

जनतेच्या मनातले सरकार निवडून द्या तरच महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल : खा. शरद पवार

sharad pawar

लोकसभेला जनतेने राज्यातील ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले. तुम्ही जिल्ह्यातील दोन्ही खासदार मताधिक्याने विजयी करून देशाला दाखवून दिले, की आता इथे थांबायचे नाही. ७० दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे. मला जनेतेने ५६ वेळा निवडून दिले आहे. आता एकच मागायचे आहे, महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल. कष्टकरी, शेतकरी, माता बहिणीचा विचार करणारे सरकार आणायचे आहे. त्यामुळे जनतेच्या … Read more

राहात्यात १६० कोटींचा पीक विमा मंजूर, ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ !

pik vima

महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपयांचा पीक विमा मंजुर झाला असून, यापैकी ४०.८५ कोटी रुपये अग्रीम रक्कमेच्या माध्यमातून यापुर्वीच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पुर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. … Read more

झगडे फाटा येथे अशोक लेलॅन्ड कंपनीच्या मालट्रकमधून ४०० लिटर डिझेलची चोरी !

crime

पोहेगाव झगडे फाटा येथे उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाला बंदूकीचा धाक दाखवत डिझेल टाकीतून नुकतेच ४०० लिटर डिझेल चोरी केले गेले. काल गुरूवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलॅन्ड कंपनीचा (आरजे ११ जीसी ४५०५) क्रमांकाचा मालवाहू ट्रक यूपीकडून झगडे फाटा मार्गे इंदापूर … Read more

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण, सोनाईत तीघांवर गुन्हा दाखल !

badanami

मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देणे व दीड तोळा सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याप्रकरणी रुपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आदिनाथ संजय मिठे याने आमच्या मुलीबरोबर … Read more

भंडारदरा धरण ४३% भरले, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे पुनरागमन !

bhandardarra

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा एकदा पाऊस परतला असून पावसाच्या आगमनाने रखडलेल्या भात लागवडींना आता वेग आला आहे. तर भंडारदरा धरण ४३% भरले असून पावसाचे पुनरागमन झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या पातळीत संथगतीने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात चार ते पाच दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात … Read more

श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, उक्कलगाव येथे बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा !

bibatya

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर कोल्हार रस्त्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती परिसरातील शेतऱ्यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला. कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गळनिंब शिवारात सुरेश विश्राम थोरात यांची शेतवस्ती आहे. थोरात यांच्या वस्तीवर दुभती जनावरे … Read more

राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, आ. काळेंचे विठूरायाला साकडे !

ashutosh kale

कोपरगाव मतदार संघासह राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे. आषाढी एकादशीनिमित्त काल बुधवारी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी … Read more