राज्याचे सध्याचे सरकार हे फक्त घोषणाचे पाऊस पाडणारे सरकार आहे. अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली. राहुरी तालुक्यातील आंबी येथील एका कार्यक्रमात नुकतेच ते बोलत होते.
यावेळी शिवाजीराव कोळसे अध्यसस्थानी होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मागील १० ते २० वर्षात जे कामे झाली नाही. ते रखडलेले रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडवून प्राथमिक सर्व शाळा डिजीटल केल्या. मला खोट बोलण्याची सवय नाही. शासकीय योजना पुढाऱ्यांच्या खिशातील पैशाच्या नाही.
ती सामान्य जनतेच्या करामधून वसुल केलेल्या पैशाच्या आहे. यावेळी शिवाजीराव कोळसे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी संचालक वसंतराव कोळसे, माजी नगरसेवक अशोक कानडे, आंबीच्या सरपंच संगिता साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, चेअरमन सतिष जाधव, उपस्थित होते.
तसेच अंमळनेरच्या सरपंच पुष्पावती साळुंके, बी.एल. साळुंके, बापूराव जाधव, बापूराव डुकरे, बाळासाहेब ए. साळुंके, माजी सरपंच हरिश्चंद्र साळुंके, भास्करराव कोळसे, किसनराव साळुंके, मच्छिद्र जाधव, पंकज कोळसे, कोंडिराम साळुंके व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच विजय डुकरे यांनी सूत्रसंचलन केले. सदस्य दादा साळुंके यांनी आभार मानले.