शेवगावातील स्थानिक टपरीधारकांचे झेडपीच्या सीईओना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेवगाव येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे, या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले. शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन करण्यात आलेली असून त्यालगत चारही बाजूने … Read more

वीजबिल सक्तीची वसुली नको; शिर्डीकरांची प्रशासनाला हाक

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोनाकाळात सगळीकडेच अर्थचक्र गाळात रुतलेले दिसून येत आहे. कामधंदे बंद पडल्याने अनेकांवर आर्थिक कुर्हाड कोसळली आहे. यातच कोणतेही उत्पन्न स्रोत नसल्याने आर्थिक हाल होत असताना महावितरणकडून वीजबिल वसुली सक्तीने होत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली करू नये यासाठी शिर्डीमधील सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक … Read more

अठ्ठावीस वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे. ज्योती मोहित साळुंके (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्योती हिचा विवाह चार वर्षांपूर्वी मोहित साळुंकेबरोबर झाला होता. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता. काही दिवसांपूर्वी … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी होतेय दररोज तीनशे जनावरांची बेकायदेशीर कत्तल

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :-  राज्यात गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कत्तलखाने खुलेआमपणे सुरू आहेत. शहरातील गोमांसाला मुंबई, ठाणे व कर्नाटकात मोठी मागणी आहे. संगमनेर शहरांमधून दररोज हजारो किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस निर्यात केले जात आहे. या बेकायदेशीर कत्तलखान्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. धक्कादायक बाब … Read more

12 कोटींच्या राज्यात 17 स्वच्छ आणि पात्र चेहरे सरकारला मिळेना

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- शिर्डीच्या विश्वस्त मंडळांची मुदत संपल्यानंतरही नवीन नियुक्ती होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सरकारला मुदत देऊन नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे निर्देश दिले. आता कोर्टाने यासाठी पाच जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, मधल्या काळात यासाठी राजकीय बैठका होऊन काही निर्णयही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजची सर्वात महत्वाची बातमी….

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी नियम मोडणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्याचे … Read more

जिल्ह्यातील या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळतो आहे. यातच अनेक ठिकाणी रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात केवळ 09 करोनाबाधित रुग्ण आढळून आले … Read more

घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची रेकॉर्डब्रेक आवक

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली आहे. घोडेगाव येथील कांदा मार्केटला सर्वाधिक विक्रमी 70 हजार 248 गोण्या कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेतील वाढ कायम असून जास्तीत जास्त भावही 2400 रुपयांपर्यंत स्थिर आहेत. दरम्यान बुधवारी 70 … Read more

दरोडेखोरांना आश्रय देणार्‍यास पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मागील आठवड्यात ग्रामसुरक्षा दलातील युवक व सोनई पोलिसांनी सोनई ते मोरेचिंचोरे व नंतर शेतात पाठलाग करून सहा आरोपींस अटक केली होती. दरम्यान परप्रांतीय आरोपीस आश्रय दिल्याप्रकरणी भगवान अंबादास इलग (रा. मोरेचिंचोरे) यास सहआरोपी करून नेवासा न्यायालय येथे हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. … Read more

कोविडसंबंधी मृत्यूची चुकीची नोंद केल्यास कोविडविरुद्धचा लढा कमजोर होईल

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला होता. यातच कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यू दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यातच रुग्णालये आणि राज्य सरकार यांच्याकडून कोविडसंबंधी मृत्यूची चुकीची नोंद केल्यास कोविडविरुद्धचा लढा कमजोर होईल. त्यामुळे मृत्यूचे नेमके चित्र व कारणीमीमांसा करण्यासाठी सरकारने सर्वत्र लेखापरीक्षण हाती घेतले आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला लोकाभिमुखता व गतिमान करत संगणकीकृत केले. ऑनलाइन सातबारा ही संकल्पना राबवल्यामुळे मंगळवारी राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० नागरिकांनी सातबारा उतारे डाऊनलोड केल्याने मोठा विक्रम महसूलच्या नावावर नोंदला गेला. मंत्री थोरातांनी महसूल विभागाला लोकाभिमुख व गतिमान करत हायटेक केले. विद्यार्थ्यांना शाळेत … Read more

साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा सस्पेन्स कायम

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी अजून दोन आठवड्याची मुदतवाढ शासनाच्यावतीने मागीतली असून दोन आठवड्यानंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार असल्याचे शासनाच्या वकीलांनी सांगीतल्याने सोशल मीडियावर तिनही पक्षातील विश्वस्त पदासाठी निवड करण्यात आल्याच्या चर्चेला पुर्णविराम लागला असून करोडो साईभक्तांसाठी विश्वस्त पदाचा सस्पेन्स कायम राहिला … Read more

कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावाच्या मदतीने पत्नीने केला विजेचा शॉक देऊन पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना … Read more

रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून नको

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या आपल्या प्रलंबित मागण्या असो व काही इतर कारणे ते मंजूर करून घेण्यासाठी आजकाल आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. यामध्ये सरकारी कार्यालये अथवा लोकप्रतीनिधींची निवास्थान हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असतात. मात्र रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी … Read more

महा ई सेवा केंद्र सुरू करून देण्याच्या नावाखाली महिलेला गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अकोल्यातील एका महिलेस विश्वासात घेऊन तुला घरबसल्या महा ई सेवा केंद्र सुरू करून देतो असे सांगून तिची 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संदीप शरद बुळे (रा. खराडी, जिल्हा पुणे) याचे विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी 29 कोटींच्या निधीस मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपजलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून यापैकी राहाता आणि निफाड … Read more