सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे – ना.प्रा.राम शिंदे

जामखेड : मला अतिशय आनंद होतोय की, आपल्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा हेतूने आजचा दिवसाचे विशेष महत्व आहे. कारण मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध … Read more

आ.भाऊसाहेब कांबळेंनी स्व.जंयतराव ससाणेंना फसविले !

श्रीरामपूर :- काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग दोन वेळा आमदार करण्यासाठी स्व. जंयतराव ससाणे यांनी प्रयत्न केले. पंरतु ससाणे यांनादेखील आ. कांबळे यांनी फसवले. स्व. ससाणे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज होते. त्यांनी लोकसभेला उघड आमदार कांबळेंविरुध्द काम केलं. लोकसभा निवडणूक आमदार कांबळे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची साथ घेत निवडणूक लढवली. पंरतु … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश … Read more

प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना?

संगमनेर :- काँग्रेसला व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना? असा खोचक सवाल गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केला. ‘वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना कामं करणारी … Read more

मुलीने हिम्मत दाखविल्याने छेड काढणाऱ्यास चोप देवून पकडले

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात वा. नं. ७, कॅनॉल पुलाजवळील श्री सिद्धीविनायक  हनुमान मंदिराजवळ  श्रीरामपुरात तरूणीची गाडी अडवून छेडछाड करून विनयभंग करणाऱ्याला तरूणीने आरडाओरडा करत जाब विचारल्याने गणेशोत्सव सुरू असल्याने नागरीकांची वर्दळ मोठया प्रमाणावर होती. हा आरडाओरडा ऐकून जागरूक नागरीकांनी तातडीने तरुणीला काय झाले विचारले. तेव्हा विनयभंग, छेडछाड केल्याची माहिती मिळताच संबंधीत अजहर नावाच्या तरुणास लोकांनी यथेच्छ … Read more

लाच घेताना भूमिअभिलेख लिपिकास अटक

श्रीरामपूर: येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक बाबुराव यादवराव राशीनकर याला दहा हजारांची लाच घेताना नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. टाकळीभान येथील एका शेतकऱ्याची नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावर भोकर शिवारात ३० आर जमीन आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने मोजणीची तारीख मिळण्यासाठी अर्ज केला होता.त्यासाठी राशीनकरने २० हजार रोख व … Read more

पक्ष बदलणाऱ्यांचा पराभव होणार

संगमनेर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वारे बदलल्याचा काही लोकांचा समज झाला. त्यामुळे धावपळ करत काहींनी पक्ष बदलले. मात्र, त्यांचा हा निर्णय शंभर टक्के चुकेल. मतदार त्यांना मानणार नाहीत. त्यांचे उड्या मारणे लोकांना आवडले नसल्याने ज्यांनी-ज्यांनी वेगळ्या पक्षाचा आधार घेतला त्यांना पराभव पत्करावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शनिवारी संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना … Read more

भाऊसाहेब कांबळेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

श्रीरामपूर: काँग्रेसला जय महाराष्ट्र करून राजीनामा दिलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. विधानसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे, मागील निवडणुकीत सेनेकडून निवडणूक लढलेले लहू कानडे, काही महिन्यांपूर्वी सेनेत प्रवेश केलेले माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांचीही व्यूहरचना सुरू होती. … Read more

सासूरवाडीत जावयाचा पाय केला पॅक्चर

लोणी  – राहाता तालुक्यातील निर्मळपिंपरी येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेले राजेंद्र चंद्रभान बाराहाते, वय – ४७, रा. कोकमठाम, ता. कोपरगाव यांना ते निर्मळ यांच्या घरी असताना आरोपींनी लाकडी दांडा व लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत डावा पाय फ्रेंक्चर करून दुखापत केली. काल या प्रकरणी जखमी राजेंद्र … Read more

सासरकडून पैशांची मागणी माहलेचा गळफास

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे सासरी नांदत असलेली विवाहीत तरूणी वैशाली संदिप अनर्थे, वय – ३२ हिला नवरा, सासू, सासरा यांनी तू घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशांची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली. उपाशी पोटी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला. या त्रासातून वैशाली या महिलेने गळफास घेवून … Read more

कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना … Read more

नारायण राणे हद्दपार, त्यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागेल

शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून, त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी हवं तिथं जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. कुचिक हे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईभक्त व कर्मचाऱ्यांसंदर्भात ते नेहमी … Read more

दामदुप्पटीच्या आमिषाने २९६ लोकांना गंडा

संगमनेर : संगमनेरात सुरुअसलेल्या फिनॉमिनल हेल्थ केअर स्व्हिहसेस कंपनीने २९६ लोकांना दामदुप्पटीचे आमीष दाखवून ८१ लाख २९ हजार ३८७ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना दि. २८ फेब्रुवारी २००९ ते जून २०१६ या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सातजणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर याठिकाणी … Read more

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा – आ.शिवाजी कर्डिले

राहुरी :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा मिळाली, त्यांच्यामुळेच राहुरी मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी मिळाली व पाचव्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनीदेखील राहुरी मतदारसंघासाठी भरीव निधी देऊन मुंडे -कर्डिले कुटुंबाचे ऋणानुबंध जोपले, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, देवराई, घाटशिरस येथील विविध … Read more

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या … Read more

नगर जिल्ह्यातील या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर :- काही पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या. बदली झालेले अधिकारी, ठिकाण पुढीलप्रमाणे : गोकूळ औताडे – वाचक उपअधीक्षक कार्यालय शिर्डी, अरुण परदेशी – नगर सायबर ठाणे, पांडुरंग पवार- वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय, हनुमंतराव गाडे- साई मंदिर सुरक्षा शिर्डी, प्रवीणचंद लोखंडे – आंर्थिक गुन्हे शाखा, दीपक गंधाले – प्रभारी शिर्डी, सुभाष घोये – … Read more

नेत्यांनी सोडले तरी जनता काँग्रेसच्या पाठिशी

शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे … Read more

बाळासाहेब थोरतांपुढे पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान

नेवासा – कॉंग्रेस पक्षाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नेते प्रयत्नशिल आहेत. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे खुर्च्या उबविणाऱ्या नेत्यांच्या काळात नेवासा तालुक्‍यात पक्षाला पदाधिकारी शोधण्याची वेळ अली आहे. त्यामुळे ना नेते ना कार्यकर्ते, कॉंग्रेस चाचपडते भलतीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेवाशात पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगर जिल्ह्यातील असले, तरी नेवाशात पक्षाची … Read more