मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता ? – वाकचौरे

अकोले : मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता का? आताही कोण कोणत्या पक्षात फिरतात हे आपण पाहतोय. या वेळी लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी साईबाबांना सांगून अपक्ष लढण्याची शपथ घेतली आहे. असे असले तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे व भाजपबरोबरच राहणार आहे. मागच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा उमेदवार असताना … Read more

गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.

राहाता :- गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार-पाच गुंडांनीच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावर घडली. रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एका गुंडाला पकडून ठेवले. आठवडे बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात. पिंपळवाडी येथे वीटभट्टीवर काम करणारा मजूर मंजित केवट (मूळ उत्तर प्रदेश) हा आठवडे बाजारासाठी राहात्याला आला होता. बाजार करताना त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने … Read more

#लोकसभा 2019 : पहिल्याच दिवशी २१ जणांनी नेले ३९ अर्ज !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली. या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी, विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक यंत्रणेचे १७ अधिकारी- कर्मचारी या प्रक्रियेसाठी … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 17 वर्षे सक्तमजुरी !

श्रीरामपूर :- तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या शिवाजी विठ्ठल शाख याला 17 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी शिवाजी शाख याने 3 जून 2017 रोजी पीडित मुलीस तिच्या मामाच्या घरून आईकडे नेवून सोडतो, असे सांगून घरी न सोडता गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व दुसर्‍या दिवशी … Read more

खा.सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी दूर होईना…

नेवासा :- लोकसभेच्या मागील निवडणुकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे तालुक्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तालुक्यात त्यांचे संपर्क कार्यालय शेवटपर्यंत झाले नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी लोखंडे यांनी अजून दूर केलेली नाही. लोखंडे चार-साडेचार वर्षे तालुक्यात फारसे दिसले नाहीत. खासदार निधीतून तालुक्यात विशेष भरीव कामे केली नसल्याने नाराजी आहे. … Read more

आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक !

संगमनेर :- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली. देशात व महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धाम धूम सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील व महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. यामध्ये  सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष खा.राहूल गांधी, सरचिटणीस पियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक … Read more

…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.  नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान … Read more

काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे !

अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला. जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

जावयाची सासुरवाडीला जाऊन आत्महत्या.

अकोले :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुतोडी येथील राजेंद्र देवराम आहेर (वय २७) या तरुणाने गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. राजूर येथे त्याच्या सासुरवाडीला तो पत्नीला आणायला गेला होता. त्यास नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजेंद्र आहेर … Read more

कंटेनर – दुचाकीच्या धडकेत महिला ठार.

काेपरगाव | नगर-मनमाड रस्त्यावर एमपी सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर कंटेनर व दुचाकीची धडक होऊन महिला ठार झाली. कावेरी विठ्ठल जाधव (२६, राहुरी) असे या महिलेचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कावेरी जाधव या वडील व मुलगा सार्थक यांच्यासह मनमाड येथील लग्न समारंभ आटोपून राहुरी तालुक्यातील शेण … Read more

गडाखांच्या घराची झाडाझडती निषेधासाठी एकवटले नगरकर

अहमदनगर – नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर एकवटले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी … Read more

चौघांकडून डॉक्टरांची ५५ लाखांची फसवणूक

संगमनेर : आयुर्विम्याचा चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवत येथील वैद्यकीय व्यावसायिकाला चार ठगांनी ५५ लाखांना गंडा घातला. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता वर्मा, निधी गुप्ता, नरेंद्र मौर्या आणि विकास (पूर्ण नाव माहिती नाही) अशी आराेपींची नावे आहेत. अर्जुन भागुजी ठुबे (वय ५८, साकूर, संगमनेर) असे … Read more

ग्रामसेवक, सरपंचावर अपहाराचा गुन्हा

कोपरगाव:  वेळापूर येथील ग्रामसेवक व सरपंचाने संगनमताने शासनाच्या योजनेतील २ लाख ३२ हजारांची पाण्याची टाकी न बांधता केवळ १ लाखात काम करुन १ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  चौदाव्या वित्त आयोगाच्या २ लाख ३२ हजारांतून शिंदेवस्ती वेळापूर येथे पाण्याची टाकी बांधायची होती. कोणतेही काम न करता ग्रामसेवक विनोद गिरीधर … Read more

राजीनाम्याच्या वृत्तावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…

मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तथ्यहीन असल्याचे विखे पाटील म्हणाले. ते आजून कॉंग्रेस मधेच असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले . राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपाक्षापादाचा राजीनामा पक्षाश्रेष्टीनकडे दिल्याचे वृत्त पसरत होते. या राजीनाम्यावर लवकरच पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार असल्याने चर्चना उधान आले होते … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा ?

नवी दिल्ली : विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांचा मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. पण आपण राजीनामा देणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं. पण अखेर त्यांनी पक्षा कडे राजीनामा दिला आहे असे बोलले जात आहे. सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी … Read more

हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस – यशवंतराव गडाख

नगर : पन्नास वर्षे मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. या काळात असंख्य आव्हाने व निवडणुकांचा सामना मी केला. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहिले नाही. अनेक वेळा पोलिस कारवायांचा सामना करावा लागला, पण परवा पोलिसांना ज्या पध्दतीने कारवाई करायला लावली ते अत्यंत क्लेशदायक होते. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याची … Read more

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

कोपरगाव : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी महादेव मनोहर जरीत (.आदमपूरवाडी ता. तेलारा, जि. अकोला) याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महादेव जरीत फरार असून याचा तपास पोलिस घेत आहेत.  कोपरगाव शहरालगत असलेल्या रेल्वेस्टेशन जवळ राहणाऱ्या एका विवाहित महिलेला आरोपी महादेव मनोहर जरीत याने लग्नाचे … Read more