अटक वॉरंट असलेले गडाख पोलिसाना आढळले नाहीतच

नेवासे: शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख व माजी आमदार शंकरराव गडाख यांना पकड वॉरंट काढून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांना दिले होते.  त्यानुसार आज ( शनिवार ) पोलिसांनी गडाख यांच्या नगर व सोनईमधील घरांची झडती घेतली. मात्र शंकरराव गडाख दोन्ही ठिकाणी मिळून आले नाहीत. दरम्यान शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला नगर … Read more

गडाख कुटुंबियांविरुद्ध सूडाचे राजकारण : प्रशांत गडाख

नेवासे : आम्ही सगळे कुटुंबीय झोपेत असताना एलसीबीचे पोलिस घरात आले. त्यांनी घरात महिला लहान मुले असताना प्रत्येक रुमची झडती घेतली. हे सर्व बघून आम्ही सर्वजण गोंधळलो. आम्ही पोलिसांशी चर्चा केली. ते शंकरराव गडाखांना अटक करायला आले होते. आम्ही त्यांना सांगितले की, काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले आहेत. परंतु चर्चेने हा प्रश्न सोडवू शकत होते. … Read more

माजी आ.शंकरराव गडाखांविरोधात पकड वॉरंट.

नेवासे :- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या चक्का जाम आंदोलनप्रकरणी नेवासे न्यायालयाने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख, शंकरराव गडाख यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले आहे. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिस ठाण्याला बजावले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने आणि शंकरराव गडाख हे तालुक्यात जणू समीकरणच बनले आहे. पाटपाणी, कर्जमाफी, हमीभाव, कांदा, कापूस, दूध दर, बॅकवॉटर, वीज, पिण्याच्या पाण्याचा … Read more

मुलाने हट्ट केला, तर त्याला समजावण्याची जबाबदारी वडिलांची…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते आहेत. ते राज्याच्या पातळीवरील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असल्याने मुलगा भाजपमध्ये जात असताना त्यांनी त्याला रोखायला हवे होते.  दुर्दैवाने तसे घडले नाही. मुलाच्या प्रवेशानंतर आपण विरोधी पक्षनेतेपदावर राहणार आणि पक्ष सांगेल ते करणार, असे ते म्हणत असतील, तर त्यांना ते सिद्ध करावे लागेल. त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. … Read more

प्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट !

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट  केली.  ‘लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण ही निवडणूक लढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात प्रशांत गडाख उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा होती.  … Read more

शिर्डीत खा.सदाशिव लोखंडेच सेनेचे उमेदवार !

कोपरगाव :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीविषयी मातोश्रीवर झालेल्या चर्चेत खासदार सदाशिव लोखंडे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोखंडे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. बैठकीच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोणाही शिवसैनिकाने संभ्रमावस्था न ठेवण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. युती झाल्यामुळे … Read more

लोकसभेआधीच युवा नेते डॉ.सुजय विखे बनले ‘खासदार’!

अहमदनगर :- लोकसभेसाठी इच्छुक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असलेले विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर निवडणुकीच्या आधीच खासदार म्हणून घोषित केलय. दररोज वेगवेगळ्या पक्षातून तिकीट मिळण्याबाबत बातम्या येत असताना ठोस काही निर्णय होत नसल्याने विखे समर्थकांची घालमेल वाढली असून विखे पाटील हाच एक पक्ष आहे, … Read more

आठ दिवसांत सुरू न झाल्याने ६ छावण्यांची मान्यता रद्द

अहमदनगर :- परवानगी मिळूनही आठ दिवसांत चारा छावणी सुरू न केल्याने सहा संस्थांची छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली. एका गावात दोन-तीन छावण्यांना मान्यता दिली आहे. मान्यता मिळूनही छावण्या सुरू केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात १५१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत छावणी सुरू होणे बंधनकारक … Read more

डॉक्टर प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने युवकाची प्रेमभंगातून आत्महत्या.

संगमनेर :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील एमआरआय टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे (वय २२) या युवकाने कौठेकमळेश्वर शिवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर असलेल्या प्रेयसी तरुणीने लग्नास नकार दिल्याने प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी अमित … Read more

माजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.

अहमदनगर :- सध्या भाजपमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी पक्ष्याने त्यांना दिलेले श्रीसाईबाबा संस्थानचे ट्रस्टी पद सोडणे गरजेचे होते. मात्र, आयुष्यात केवळ पद मिळवण्यासाठी झटणाऱ्या वाकचौरेंकडून ही अपेक्षा व्यर्थ असल्याने त्यांना ट्रस्टी पदावरून काढण्याची विनंती … Read more

मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्ष सक्तमजुरी.

कोपरगाव :- मतिमंद मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचाराची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील माहेगा देशमुख व कुंभारी येथील आरोपी रमेश ऊर्फ पिन्या म्हसू जाधव व किरण ऊर्फ गोट्या भागवत कदम यांना २० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी सुनावली. २३ … Read more

शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू.

शनिशिंगणापूर :- रवींद्र बबनराव जरे (वय ४५) व त्यांची पत्नी ज्योती (४३) या दाम्पत्याचा पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना नेवासे तालुक्यातील लोहगाव शिवारातील गट क्रमांक ८४ मध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली. आपल्या घराजवळ जरे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीला पाणी देण्यासाठी मध्यरात्री जात असताना पाय घसरून पाण्यात बुडून या दाम्पत्याचा मृत्यू … Read more

नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद.

संगमनेर :- तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवारी रात्री एक बिबट्या अडकला. बिबट्यांची संख्या लक्षात घेता नागरिकांवर हल्ला करणारा हाच आहे का याबाबत मात्र संभ्रम आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दुचाकीवरील चार जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले. एकाच रात्री झालेल्या बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांतून सपना बाळासाहेब वाघमारे, वेणूनाथ सुखदेव … Read more

शाळेत जातो असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परतल्याच नाहीत…

कोपरगाव :- शहरातील सुभाषनगर व दत्तनगर भागातील तीन अल्पवयीन मुली शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परत आल्याच नाहीत. १ व २ मार्चला या घटना घडल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समजते. सुभाषनगर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. हेड … Read more

शाळेची बस उलटून मुलांसह ११ जण जखमी.

संगमनेर :- तालुक्यातील एका इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसचालकाकडून बेदरकारपणे वाहन चालवल्याने बसचा अपघात होऊन नऊ शाळकरी मुलांसह दोन जण जखमी झाल्याची घटना येथील रणखांब शिवारातील रस्त्यावर घडली. तालुक्यातील गुंजाळवाडी पठार भागातील वृंदावन इंग्लिश मीडिअम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी असलेली बस (एम एच १७ बीडी २०६६) घेऊन चालक गोरक्ष कैलास साळुंखे (वय २६ … Read more

अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी.

कोपरगाव :- लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी आकाश रमेश रानशूर (कोपरगाव) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपी आकाश रानशूर याला पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहरालगत असलेल्या सोनार वस्ती येथे राहणाऱ्या आकाश रमेश रमेश रानशूर याने आपल्या घरी धुणे-भांड्याचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन … Read more

संगमनेर बसस्थानकाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा !

संगमनेर :- नव्याने उभ्या रहात असलेल्या बसस्थानकामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली बसस्थानकाच्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावरील बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. ठेकेदाराने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवत वाळूतस्करांकडील वाळू या कामासाठी वापरल्याचा आरोप सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला. खताळ यांनी पत्रकारांना यासंदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले आहे … Read more

थोरात – विखे संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे.

संगमनेर :- निमोणमधील सभेत बालकाने खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेकडे आपण फार गांभीर्याने बघत नसलो, तरी हे बालक सभेत खुनशीने बोलत असताना व्यासपीठावर आईसाहेबदेखील टाळ्या वाजवत होत्या. पक्षाने सांगितले म्हणून यांना दोनदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणारा मी आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात विखे माय-लेकांचे नाव न घेता म्हणाले. थोरात-विखे संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून याला … Read more