मटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक !

राहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र सुनिल नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याचाच राग … Read more

सरकारकडून पुन्हा एकदा राज्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय !

श्रीरामपूर :- केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून भाजप व सेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळातच राज्य सरकारने केंद्राकडे मागितलेली 7 हजार कोटींची मदत अत्यंत … Read more

भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार.

अहमदनगर :- नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात बाबा ढाब्यासमोरील वळणावर एसटी बस व मारूती आय २० कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चारही युवक जागीच ठार झाले. अपघतानंतर बसने पेट घेतल्याने तीच्यातील १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शिर्डी – … Read more

सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा.

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले येथील सरपंच तान्हाजी मारुती घुले व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके या दोघांनी संगनमताने शासकीय योजनांचे बनावट बिले, तसेच मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय रकमेचा अपहार केल्याची घटना सन २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

संगमनेरमध्ये अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार.

संगमनेर :- तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारात मुळा नदीवरील मांडवे पुलावर ट्रक आणि मोटार सायकल यांच्यात धडक झाली. या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.  भरधाव जाणाऱ्या रिकाम्या मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच चिरडून मृत्यू झाला. दुचाकीवरील त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी मालट्रक पेटवून दिला. … Read more

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एका जणावर गुन्हा दाखल

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील हनुमानवाडी, सारोळे पठार येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासोबत हनुमानवाडी, सारोळे पठार याठिकाणी राहते. गावातीलच हसन बनेमियाँ मोमीन याने मंगळवारी सकाळी घरी येऊन या महिलेचा हात धरुन लज्जा … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

संगमनेर :- कर्जबाजारीपणाला कंटाळून संगमनेरच्या कनोली येथील शेतकऱ्याने राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रेय नानासाहेब वर्पे (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने राहत्या घरात विष पिउन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेली असता घरात कोणी नसल्याचे बघून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. घरी आलेल्या पत्नीला औषधाचा वास … Read more

तब्बल 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा !

श्रीरामपूर :- शौचालयाचे बांधकाम न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील सुमारे 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2015 पासून श्रीरामपूर पालिका हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने शासनाची वैयक्तीक शौचालय योजना संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. तेव्हापासून आजपर्यंत नागरिकांनी केलेल्या अर्जापैकी 3314 पात्र लाभार्थ्यांना त्यांनी दिलेल्या बँक … Read more

राहत्या घरात गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या.

कोपरगाव :- शहरातील मोहिनीराज नगर भागात रविवारी (दि. २०) रोजी सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात राहणाऱ्या सचिन सर्जेराव सुपेकर (वय २३) व्यवसाय पेंटिंग काम करणाऱ्या तरुणाने रविवारी (दि.२०) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घरातील किरकोळ भांडणावरून राहत्या … Read more

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शिक्षकाचा मृत्यू.

श्रीरामपूर :- शहरातील नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डानपुलावर ऊसवाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका शिक्षकाचा मृत्यू झाला.काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रगतीनगर येथे राहात असलेले अशोक शंकर घाटविसावे हे दुचाकीवरून श्रीरामपूरकडून आपल्या घरी प्रगतीनगर येथे जात होते. तर ट्रॅक्टर श्रीरामपूरच्या दिशेने चालला होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली होत्या. श्रीरामपूर व शिरसागवच्या हद्दीवर असलेल्या … Read more

‘नाजूक’ कारणातून महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या.

श्रीरामपूर :- शहरातील शिरसाठ हॉस्पिटलजवळ रहाणार्या महिलेचा खून करून एका तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील इराणी गल्ली येथे घडली. नीता हौशाराम गोर्डे (वय 42 रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ, वॉर्ड नं. 1) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून गणेश राधाकृष्ण दळवी (वय 31, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव … Read more

राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येणार – आ.बाळासाहेब थोरात.

नेवासे :- राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येईल. तसेच नगर जिल्ह्यातील कोणीही सध्या भाजपमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. आ.थोरात हे शेवगावकडे कार्यक्रमाला जात असताना तालुका अल्पसंख्याक आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने नेवासेत स्वागत करण्यात आले. तर भेंडा येथे ज्ञानेश्वर उद्योग समूहातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आता काँग्रेसला नवी उभारी … Read more

माजी आमदार गडाखांकडून अटक वॉरंटचे प्रदर्शन !

नेवासे :- माजी आमदार शंकरराव गडाख हे अटक वॉरंटचे तालुक्यात प्रदर्शन करत आहेत. तालुक्यात भावनिक वातावरण तयार करून वेगळ्या दिशेला नेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला. बेलपिंपळगाव येथे आमदार मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बेलपिंपळगाव ते घोगरगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, बेलपिंपळगाव … Read more

कार-बसच्या अपघातात दोन ठार.

कोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. चालक प्रमोद भाऊसाहेब भांबरे (२५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) व गणेश नामदेव डांगे (२६, रा. हल्ली मुक्काम पुणे) अशी मृतांची नावे आहे. नितीन रामनाथ डांगे … Read more

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.

कोपरगाव :- तालुक्यातील खोपडी येथील आरती श्यामहरी त्रिभुवन (२२) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. तिचा भाऊ गणेश आनंद पठारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरतीचा पती श्यामहरी, दीर शिवहरी व रामहरी, सासरा चांगदेव व सासू अंजनाबाई यांच्याविरुद्ध हुंड्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

कोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, १ ठार ६ जखमी

कोपरगाव- शहरात फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात 1 ठार व सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिका प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर कारवाई केली आहे. गांधी नगरातील आचारी हॉस्पिटल चौकात दुसऱ्या स्फोटात एक जणाचा जागीच मृत्यू झाला.तर इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला स्फोट झाला. त्यात सहा जण … Read more

त्या महिलेची आत्महत्या कि घातपात ?

कोपरगाव :- तालुक्या-तील खोपडी येथील आरती शामहरी त्रिभूवन (वय 22) या बेपत्ता महिलेचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी आरतीचा घातपात झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबतची गौतम पठारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती आनंदा पठारे हिचा विवाह गेल्या 30 एप्रिल 2018 रोजी खोपडी … Read more

कांद्यामुळे शेतकरी संकटात.

अहमदनगर :- उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच चाळीत साठवून ठेवला. मात्र आता तो कांदा आता चाळीत सडू लागला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास देखील गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जायकवाडी परिसरात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, कांद्यासाठी चांगले हवामान, कमी कालावधीत चांगले उत्पादन … Read more