अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित गावातील सरपंचासह शेतकरी करणार उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी … Read more

धोरण चांगले पण अडचणी अनंत ! ६०० रुपये ब्रास वाळूसाठी रोज ५०० रुपयांचे नुकसान, लोक ५ दिवसांपासून रांगेत उभे

Ahmednagar News

वाळू तस्करीला आळा बसला पाहिजे व सर्वसामान्यांना वाळू उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीने महसूल विभागाने नवीन धोरण आणले. या नव्या धोरणानुसार ६०० रुपये ब्रास वाळू आता लोंकाना उपलब्ध होईल. हे धोरण आखण्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोठे योगदान. परंतु सध्या हे धोरण चांगले असले तरी विविध अडचणी येत आहेत. ६०० रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील … Read more

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार

Ahmednagar News

Ahmednagar News : १०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्युसेकने पाणी यायला पाहिजे; परंतु आज ते टेलला फक्त ५० क्युसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या … Read more

भरदिवसा कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविली !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसाचा ट्रक उलटल्याने महिलेचा मृत्यू

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावानजिक उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाल्याची घटना काल शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की उसाने भरलेला १० टायर ट्रक (एमएच १२ एचसी ९६६६) श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे ६ वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील … Read more

Ahmednagar News : रिक्त पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील रिक्त असलेल्या २१ गावाच्या पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत काल गुरूवारी (दि.७) येथील प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. याप्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर तहसीलदार मिलींदकुमार वाघ, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे आदी उपस्थित होते. सोडतीच्या प्रारंभी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय आदिक यांना आदरांजली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विषारी गवत खाल्यामुळे पाच गायी मृत्युमुखी ! परिसरात एकच खळबळ…

Ahmednagar News

Ahmednagar News : विषारी गवत खाल्यामुळे पाच दुबत्या गायी मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. दिघी (ता. श्रीरामपूर) शिवारात नुकतीच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकच गवत व जास्त प्रमाणात खाण्यात गेल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी व्यक्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिघी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? सराईत गुन्हेगारांनी केला गोरक्षकावर गोळीबार

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील ममदापुर कत्तलखाण्याचे केंद्र बनले आहे. बुधवारी शिर्डी, श्रीरामपूर, लोणी पोलीस व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकला असता कत्तलीसाठी आणलेल्या गायी आढळल्या.येथे धाड टाकताच येथील सराईत गुन्हेगारांनी गोरक्षकावर गोळीबार केला. त्यांच्या वाहनांची मोडतोड करून धारदार शस्त्राने वार देखील केले. यात एक जण गंभीर जखमी असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात … Read more

गरजूंना मिळणार माफक दरात वाळू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शासकीय वाळू केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांतील गरजू लोकांना विशेषतः शासनाच्या योजनेअंतर्गत घरकुल, शासकीय व इतर कामासाठी एकलहरे केंद्रातून माफक दरात वाळू मिळणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील एकलहरे येथे शासकीय वाळू केंद्राचे काल मंगळवारी मंत्री विखेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरून हार्वेस्टरच्या डिपरचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शेतात ऊस तोडणी यंत्राच्या मागे उसाची टिपरे गोळा करणाऱ्या महिलेच्या डोक्यावरून हार्वेस्टर डिपरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव- हरेगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या शेतात घडली. श्रीरामपूर तालुक्यातील महाजनवाडी येथील शकुंतला दादा सोनवणे (वय ६२) या शेती महामंडळातील कराराने दिलेल्या शेतात हार्वेस्टर सुरू असताना पडलेली उसाची टिपरे गोळा करून ट्रॉलीमध्ये … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय वाळू विक्री केंद्रांचा शुभारंभ संपन्न

माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. माहेगाव देशमुख येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री श्री विखे पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, … Read more

Shrirampur News : योग्य नियोजनामुळे श्रीरामपूरात विकासकामे !

Shrirampur News

मतदारसंघात विकास कामे करताना आपण योग्य नियोजन केले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. खंडाळा गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही काही कामे बाकी असून ती पुढील काळात मार्गी लागतील, असे प्रतिपदन आमदार लहू कानडे यांनी केले. तालुक्‍यातील खंडाळा येथील एका कार्यक्रमानंतत आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, विकास कामांसाठी … Read more

धुक्यात हरवली पहाटेची वाट वाहतूक विस्कळीत

हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पहाटे पहाटे दाट धुके पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र रविवारी सकाळी प्रवरा परिसरातील अनेक भागात पाहावयास मिळाले.राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरात रविवारी पहाटे धुक्याने पूर्ण परिसर व्यापून गेला होता. या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील श्रीरामपूर रोड, लोणी रोड, नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग यांसह अनेक गावांमध्ये पूर्ण धुकेमय वातावरण होते. पहाटे उठणाऱ्या … Read more

घरातच केला गुटख्याचा साठा; पोलिसांनी टाकला छापा

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे छापा टाकत सुगंधी तंबाखू व गुटखा, असा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. चोरी छुपे गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. साजीद साहेबखान पठाण (वय २३, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शिर्डी येथे राज्यात बंदी … Read more

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही – आ.लहू कानडे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. तरुणांसाठी नोकरी मेळावा घेऊन सुमारे ११०० तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीच्या मदतीसाठी आंदोलन केल्याने मदत मिळाली. विम्याच्या २५ टक्के अग्रीम मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सरकारकडे पाठपुरावा केल्याने श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादीत आला आहे. तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही, असे आश्वासन आ.लहू कानडे … Read more

श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत उपसभापतींचा ठिय्या

सभापती व प्रभारी सचिवांनी बेलापूर ग्रामपंचायतीची कराची रक्कम दिवाळीपूर्वी अदा न केल्याने उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी येथील बाजार समितीच्या मासिक सभेत ठिय्या मांडला. यावेळी समितीच्या आवारात माजी सचिव किशोर काळे यांना झालेल्या मारहाणीवरून माजी सभापती व ज्येष्ठ संचालक सचिन गुजर यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे सभापती सुधीर नवलेंसह सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. बाजार समितीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेम असल्याचे सांगून तरुणीवर अत्याचार !

श्रीरामपूर तालुक्यातील एका १८ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या भावाने अत्याचार केला. तिचे बळजबरीने छायाचित्रे व व्हिडीओ काढत ते प्रसारित करण्याची धमकी आरोपीने दिल्याचा धकादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश मन्सुरी, असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्रिणीच्या घरी … Read more

श्रीरामपुरात जनावरांच्या कातडीची तस्करी उघड ! २५ लाख…

Ahmednagar News

Ahmednagar News  : श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरात जनावरांची कातडी गोदामामधून ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांनी कारवाई केली. यात २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजू निसार सय्यद (वय ३३ रा. जेऊर, ता.नगर), दानिश जावेद बागवान (वय १८, सुभेदारवस्ती श्रीरामपूर), फारुख सुलेमान कुरेशी (वय … Read more