अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरून हार्वेस्टरच्या डिपरचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : शेतात ऊस तोडणी यंत्राच्या मागे उसाची टिपरे गोळा करणाऱ्या महिलेच्या डोक्यावरून हार्वेस्टर डिपरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव- हरेगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या शेतात घडली.

श्रीरामपूर तालुक्यातील महाजनवाडी येथील शकुंतला दादा सोनवणे (वय ६२) या शेती महामंडळातील कराराने दिलेल्या शेतात हार्वेस्टर सुरू असताना पडलेली उसाची टिपरे गोळा करून ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी कामाला होत्या.

दुपारच्या वेळी त्या हार्वेस्टरच्या सावलीत जेवनासाठी बसल्या असाव्यात, त्यातच त्यांचा डोळा लागला. यादरम्यान त्यांच्या डोक्यावरून हार्वेस्टरच्या डिपरचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी चर्चा आहे.

आजूबाजूला असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने धावपळ केली व श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान मेडीकल ऑफिसर साखर कामगार यांच्या खबरीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु र. नं. ६०/२०२३ सि.आर.पि.सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.