अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

जामखेड मधील धामणगावचे 50 प्रभावशाली कार्यकर्त्यांचा प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा! रोहित पवारांची सोडली साथ

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास सर्वच लढती या चुरशीच्या होतील अशी सध्या परिस्थिती दिसून येत आहे. या बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चूरशीची होईल अशी सध्या राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. या ठिकाणी यावेळेस भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशी लढत दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की 2019 … Read more

जामखेडमधील सहा प्रख्यात गुंड तडीपार, चौघे नगर जिल्ह्यातून, एकजण तीन व दुसरा चार जिल्ह्यातून हद्दपार !

crime

जामखेड परिसरात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्नी शस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा विविध प्रकारची या आरोपींवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक असणाऱ्या सहा गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, यातील चार गुंडांना नगर … Read more

फसवणुकी प्रकरणी जामखेडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह १९ जणांवर गुन्हा दाखल !

dnyanradha

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह १९ जणांवर ठेवीदारांची १ कोटी १० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार भारतीय न्याय संहिता विएनएस 2023 नुसार 316 (2), 316 (5), 318 (4), 61(2) प्रमाणे गुन्हा दि. ७ रोजी दाखल झाला आहे. … Read more

रोहित पवारांना शह देण्यासाठी, अजितदादांनी दिली जामखेडमधील युवतीला प्रदेशाध्यक्षपदाची संधी !

sandya rohit

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जामखेडमधील संध्या सोनवणे यांची निवड करून पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आ. रोहित पवार यांना शह दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांना आव्हान देण्यासाठी आणि राज्यात युवतींचे संघटन उभे करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे समजते. सोनवणे या जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि राष्ट्रवादी … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विधानसभा मतदारसंघनिहाय समितीच्या अध्यक्षपदी राम शिंदे यांची निवड !

ram shinde

राज्यातील महिला भगिनींसाठी महायुती सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विधानसभा मतदारसंघनिहाय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा आदेश ५ ऑगस्ट २०२४ रोजी जारी … Read more

आ. रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेवू नका ते महाराष्ट्राचे नेतृत्व : खा. अमोल कोल्हे !

amol kolhe, rohit pawar

आमदार रोहित पवार हे आता संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या मतदारांनी राज्यामध्ये फिरण्यासाठी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिरजगाव (ता. कर्जत) येथील उपजिल्हा रुग्णालय, रस्ता व गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी … Read more

दोन वाहनांच्या अपघातात एक ठार, एक जखमी, नगर – सोलापूर महामार्गावरील घटना !

accident

मिरजगाव नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजगाव शिवारात बाह्यवळणावर पंचर झालेला टायर बदलत असणाऱ्या पिकअप टेम्पोला आयशर टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या पिकअप टेम्पोच्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला. तर आयशर टेम्पोचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.२७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात पिकअपचा चालक महेश भगवान मोरे (वय २४, … Read more

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो !

talaw

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो झाला. यामुळे जामखेड शहर व पाच वाड्यावस्त्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील तीन वर्षापासून तलाव ओव्हर फ्लो होत असतो, त्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागत असे, यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला, यामुळे जोड तलावासह दोन्ही तलाव पुर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले … Read more

तालुक्यातील रत्नापूर, धोत्री, मोहरी, नायगाव चार तलाव ओव्हरफ्लो, तालुक्यातील इतर भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम !

jamkhed

आवर्षण प्रवण दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात मोहरी, नायगाव लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले असून, परिसरातील इतर तलावांत पावसाअभावी पाण्याची आवक कमी असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली होती. त्यावेळी तालुक्याला संजीवनी ठरलेल्या मोहरी तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे … Read more

शेतकऱ्याला भरदिवसा लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले ४८ तासात जेरबंद !

jerband

जामखेड येथून कांदे विकून घरी नान्नजकडे येणाऱ्या शेतकऱ्याला मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लुटून शेतकऱ्याकडील १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लुटली होती. परंतू पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. पारस छगन भोसले व दीपक पवार, रा. आरोळे वस्ती, जामखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस … Read more

कर्जत, जामखेडच्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे मिळणार १६८.३६ कोटी रुपये : आ. राम शिंदे

ram shinde

जामखेड येथे पीक कापणी प्रयोगानंतर नुकसानभरपाई म्हणून पिकविम्याचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १६८.३६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. राम शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्या नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीकविमा या योजनेच्या धर्तीवर एक रुपयात पिकविमा ही योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे कर्जत व जामखेड, या दोन्ही तालुक्यांमध्ये … Read more

रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, सरकारकडून सीना नदीवरील बंधाऱ्यांच्या कामासाठी ५० कोटी रुपयांची मंजुरी !

rohit

मिरजगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लातूर बॅरेज टाईपमध्ये रुपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती. त्यास अखेर मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिना नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे एकूण १० बंधारे असून, त्यातील ६ बंधारे हे आष्टी विभागात येतात तर ४ … Read more

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठे नुकसान !

dhagfuti

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डासहित जामखेड शहरात ८ जुलै रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने छोट्या बंधाऱ्यासहित मोहरी तलाव हा केवळ दोन तासात भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याचा प्रकार २५ वर्षात पहिल्यांदाच घडला असल्याचे जुने जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोहरी येथील काही शेतकऱ्यांचे मात्र या तुफान मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद … Read more

पावसाच्या तडाख्याने जामखेडच्या खडर्यातील ऐतिहासिक ‘निंबाळकर गढीचे’ बुरूज ढासळले !

disaster

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या ऐतिहासिक निंबाळकर गढीच्या तटबंदी, बुरुज व मुख्य इमारतीची पडझड चालूच असून, या पावसाळ्यात तिच्या अस्तित्वाचा प्रश्नच गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी करत आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या गढीच्या पश्चिमेकडील बुरुज कोसळल्याने या गढीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच ही सततची … Read more

आ. राम शिंदे यांची नाराजी ! कर्जत-जामखेड मतदारसंघातुन विखेंच्या पराभवाची सुरवात…

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच आ. राम शिंदे यांची नाराजीही विखे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. विखे यांनी राम शिंदे यांची नाराजी अखेरच्या टण्यात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्यांना मतदारसंघात पुरेसे मतदान मिळू शकले नाही. २०१९ च्या निवडणुकीत जामखेडमधून विखेंना १८,५०० एवढे लिड मिळाले होते. मतदारसंघातील जनतेला सापत्न वागणूक … Read more

Ahmednagar Politics : 2022 मध्ये मला घरातच स्थानबद्ध केले होते, आता मात्र आम्ही रोहित पवारांना.. आ. राम शिंदे म्हणतात..

shinde pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेत कर्जत जामखेड मतदार संघात प्रा. राम शिंदे यांचे राजकीय प्राबल्य कायम राहिले. दोन वेळेस ते आमदार राहिले आहेत. २०१९ ला मात्र आ. रोहित पवार हे आमदार झाले व त्यांचा पराभव झाला. दरम्यान आता त्यांनी नुकतीच एक २०२२ मधील आठवण सांगितली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवादरम्यान मला घरातच स्थानबद्ध केले … Read more