दारू विक्रेत्यांना दणका, या गावातील दारूबंदी कोर्टाकडून वैध

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. निघोज येथे महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने दारुबंदी करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निघोज येथे पुन्हा दारूबंदी जाहीर केल्याच्या निर्णयाला येथील दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जतला सापडले ‘गुप्तधन’, पण किती?

AhmednagarLive24: कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुन्या घराचे उत्खनन करत असताना शंभर वर्षापूर्वीचे धातूचे नाणे आढळून आले. गावातील सुरेशशेठ हरकचंद भंडारी यांच्या जुन्या वाड्याचे उत्खनन सुरू होते. यावेळी जेसीबी चालक व कामगार यांना ही नाणी आढळून आली. यावरून गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा पसरली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली … Read more

हळदी कार्यक्रमाचा महामार्गावर धिंगाणा; 11 जणांविरूध्द गुन्हा

Ahmednagar News : हळदी कार्यक्रमामध्ये महामार्गावर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणार्‍या 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर- औरंगाबाद महार्गावरील अशोका हॉटेल येथे 18 मे, 2022 रोजी ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रविवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शफी जानसाब शेख … Read more

अहमदनगर ब्रेकींग : भीषण अपघातात बाप-लेक ठार

AhmednagarLive24 : समोर चाललेल्या वाहनाला कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात आज पहाटे हा अपघात झाला. बाजीराव मिसकर व ओम मिसकर असे मयत बाप-लेकाची नावे आहेत. ते त्यांच्या कारमधून जेजुरी येथे देव दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की … Read more

Ahmednagar Rain | अहमदनगरमध्ये केव्हा येणार मान्सून, आयएमडीने सांगितले…

rain_19

Ahmednagar Rain : यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार त्याची वाटचालही सुरू झाली आहे. मात्र, अहमदनगरमध्ये मान्सून केव्हा पोहचणार याची उत्सुकता आहे. यासंबंधीही आता हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या … Read more

गोरक्षनाथगडावर जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Ahmednagar News : नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर जाणारा घाट रस्ता दुरुस्ती कामामुळे २१ ते २९ मे या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात गडाकडे कोणालाही पायी अथवा वाहनाने जाता येणार नाही. राज्यातून येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष ऍड. शंकरराव कदम यांनी केले … Read more

अभिनेत्री केतकी चितळेबाबत अहमदनगर पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Ahmednagar News : पारनेर पोलीस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. दरम्यान या प्रकरणात तिला अटक करण्यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी दिली. … Read more

अण्णांच्या पत्राला सरकारी उत्तर, असे कळविले की…

Ahmednagar News : राज्य सरकारकडे निवेदने, तक्रारी केल्यानंतर सरकारच्या यंत्रणेकडून जसे स्वयंचलित पद्धतीने उत्तर येते, तसेच उत्तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रालाही आले आहे. आपले पत्र पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांकडे पाठविल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लोकायुक्त कायद्याच्या मसुदा समितीच्या बैठका घेऊन हा कायदा मार्गी लावावा, अशी मागणी केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक जूनला राळेगणसिद्धीत ‘अण्णा उठो’ आंदोलन, कोणी दिला इशारा?

AhmednagarLive24 : लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्याविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोमनाथ काशिद या सामाजिक कार्यकर्त्याने हजारे यांच्या विरोधातच एक जून रोजी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जनता महागाईने होरपळत असताना गप्प कसे? असा सवाल काशिद यांनी विचारला आहे. लोकांच्या … Read more

आ. संग्राम जगताप यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दूरध्वनीद्वारे केली विचारपूस

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील मुंबईकडे पहाटेच नगर शहरातील नागरिकांच्या कामांसंदर्भात रवाना झाले आहेत. त्यांना अपघाताची घटना समजल्यानंतर त्यांनी आ. जगताप यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे. याबाबत काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की … Read more

अपघातानंतर आमदार जगताप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर रसायनीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.जगताप म्हणाले, एवढा भीषण अपघात असूनही आम्ही सुखरूप आहोत. साधी दुखापतही झाली नाही. नगरकर जनतेचे प्रेम आणि आशिवार्दाचे सुरक्षाकवच सोबत आहे. ते आज कामाला आले. … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात ! वाचा पहाटे नक्की काय घडलं ???

Ahmednagar News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यातून ते आणि त्यांचा चालक सुखरूप बचावले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जगताप यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसाठी रात्रीच मुंबईला त्यांच्या बीएमडब्ल्यू … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरला : पत्नीनेच काढला पतीचा काटा

Ahmednagar News ;- अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याच्या कारणातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड उघडकीस आला आहे. या खून प्रकरणात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यालयासमोर हजर केले असता यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! चक्क नगरसेवकाच्या तालमीमध्ये मुलावर….

Ahmednagar News :- पारनेरच्या एका तालीममध्ये अल्पवयीन मुलावर समलैंगिक अत्याचाराचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध पारनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही), आकाश (पूर्णनाव माहिती नाही) व विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही) यांच्याविराेधात … Read more

केतकी चितळेविरूद्ध अहमदनगरच्या या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरूद्ध आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बबनराव भोर (रा. देसवडे ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चितळेविरूद्ध कलम १५३ सह बदनामी केल्याच्या कलमान्वये … Read more

Ahmednagar News | भाचाला मारहाण, जाब विचारणार्‍या मामालाही मारले

Ahmednagar News : भाचाला मारहाण का केली, असे विचारायला गेलेल्या मामाला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना केडगावमध्ये घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी अंबादास पवार, अनू क्षीरसागर, कुणाल बादल, गोट्या भांबरे, कृष्णा बागडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बबन सुळ (वय 40 रा. शास्त्रीनगर, केडगाव) … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीला दोघा युवकांनी हात धरून ओढले आणि…

Ahmednagar News : शिवण क्लास करून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा दोघा युवकांनी विनयभंग केला. ही घटना नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रोडवर घडली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळू जपकर व अमोल आजिनाथ होळकर (दोघे रा. नेप्ती … Read more

Ahmednagar News : कार दुभाजकावर आदळली; एक ठार

Ahmednagar News : कार रस्ता दुभाजकावर आदळून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश प्रल्हादराव धोडरे (रा. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. संजय शाहूराम धस (रा. क्रांतिनगर, तहसीलकार्यालयाजवळ, बीड) हे कार (एमएच 24 बी एल 1703) मधून बीडवरून पुण्याकडे जात होते. त्यांची कार चास शिवारात रस्ता दुभाजकावर … Read more