हळदी कार्यक्रमाचा महामार्गावर धिंगाणा; 11 जणांविरूध्द गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : हळदी कार्यक्रमामध्ये महामार्गावर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणार्‍या 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर- औरंगाबाद महार्गावरील अशोका हॉटेल येथे 18 मे, 2022 रोजी ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रविवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शफी जानसाब शेख यांनी फिर्याद दिली आहे.

फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मझन मिर्झा, मोहम्मद जिशान जहागीरदार, सोहील शेख, अशरफ नदिम जहागीरदार, सलमान शेख, रझन कुरेशी, अझीम शीमलावाला, इझान शेख, कलिम सादिक जहागीरदार (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

18 मे, 2022 रोजी अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील अशोका हॉटेलसमोर ही घटना घडली. 18 मे रोजी रात्री 10 वाजता वरील लोकांनी हळदी कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी न घेता अशोका हॉटेल येथे गर्दी जमा केली. टवाळखोर लोकांनी रहदारीच्या महामार्गावर स्वत: ची वाहने आडवी उभी करून महामार्गावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना आडथळा निर्माण केला.

फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. धिंगाणा घालून लोकांना जाणीवपूर्वक त्रास होईल असे वर्तन केले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बी. एस. म्हस्के करीत आहेत.