Mahindra XUV 700 : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. विशेषता ज्यांना 7सीटर कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक फायद्याची ठरणार आहे. खरं तर भारतीय कार बाजारात फार पूर्वीपासून सेव्हन सीटर कारला डिमांड आहे. मोठ्या कुटुंबातील लोक सेव्हन सीटर एसयूव्ही खरेदी करण्यास अधिक पसंती दाखवतात.
यामुळे भारतातील अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी विविध सेवन सीटर कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. यामध्ये महिंद्रा आणि टाटा या दोन प्रमुख इंडियन कंपन्यांचा देखील समावेश होतो. Mahindra कंपनीची XUV700 आणि Tata कंपनीची Safari या दोन SUV सेव्हन सीटरमध्ये देखील उपलब्ध आहेत.
भारतीय कार बाजारात उपलब्ध असलेल्या या दोन 7-सीटर SUV ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. या कंपनीच्या या दोन्ही एसयुव्ही ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून या दोन्ही गाड्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, Tata ची Safari 6 आणि 7 सीटरमध्ये बाजारात लाँच झाली आहे. दुसरीकडे महिंद्राच्या XUV 700 बाबत बोलायचं झालं तर ही कार 5 सीटर, 6 सीटर आणि 7 सीटरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खरेतर महिंद्राची XUV700 चे जे बेस व्हेरियंट आहे म्हणजे MX व्हेरियंट हे 5 सीटर आहे. पण, आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बेस वॅरीयंटमध्ये आता कंपनीने नवीन 7-सीटर कॉन्फिगरेशन सादर केले आहे. यामुळे ग्राहकांना XUV 700 सेवन सीटर कार कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.
टाटा सफारीला टक्कर देण्यासाठी महिंद्राचे नवीन वॅरीयंट
खरेतर सध्यास्थितीला महिंद्रा XUV700 चे AX 5 वॅरीयंट हे 7-सीटर पर्यायात उपलब्ध आहे. या वॅरीयंटची किंमत मात्र प्रतिस्पर्धी टाटा सफारी पेक्षा खूपच जास्त आहे. महिंद्राच्या या SUV च्या सेवन सीटर वॅरीयंटची राजधानी मुंबईत 22.34 लाख रुपये एवढी ऑन रोड प्राईस आहे.
दुसरीकडे, टाटा सफारीच्या 7-सीटर वॅरीयंटची राजधानी मुंबईतील ऑन रोड प्राईस 19.58 लाख रुपये एवढी आहे. अर्थातच टाटा सफारी ही किमतीच्या बाबतीत ग्राहकांना परवडत आहे. यामुळे टाटा सफारी खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
आता मात्र टाटा सफारीला टक्कर देण्यासाठी महिंद्रा कंपनीने XUV 700 चे नवीन सेवन सीटर व्हेरिएंट लॉन्च केले आहे. महिंद्राने XUV700 चे MX 7-सीटर हा प्रकार लॉन्च केला आहे. यामुळे टाटा सफारी आणि महिंद्रा एक्सयुव्ही 700 मध्ये मोठी फाईट पाहायला मिळणार आहे.
कारण की, Mahindra चे XUV 700 चे नवीन 7 सीटर व्हेरिएंट हे आपल्या सध्याच्या सेव्हन सीटर व्हेरिएंटपेक्षा तब्बल तीन लाख रुपयांनी स्वस्त राहणार आहे. महिंद्राने जें नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे ते फक्त डिझेल मॅन्युअल मध्ये आहे. नव्याने आलेल्या MX 7-सीटरची किंमत ही आपल्या आधीच्या MX 5-सीटर व्हेरियंटपेक्षा फक्त 40,000 रुपयांनी जास्त राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, XUV700 च्या नवीन MX 7-सीटरची राजधानी मुंबईत ऑन रोड प्राईस ही सुमारे 18.83 लाख रुपये एवढी आहे. ही किंमत आपल्या आधीच्या AX 3 7-सीटर व्हेरियंटच्या तुलनेत जवळपास 3.5 लाख रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे आता टाटा सफारी आणि XUV 700 मध्ये टफ कॉम्पिटिशन तयार होणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे कंपनीला मोठा फायदा होणार असा दावा केला जात आहे.