नगर करांची चिंता वाढली ! कोरोना रुग्ण संख्येत झालीय वाढ…

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार १५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar hospital fire : विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले ‘त्या’ दोघांवर गुन्हा दाखल करा !

Ahmednagar hospital fire :- अहमदनगर मधील जिल्हा शासकीय रुग्णलयात लागलेल्या आगीला जबाबदार धरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पोलिसांनी दबावाखाली फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली का असा प्रश्न निर्माण होतोय. राज्यातील फायर ऑडिटेर बाबत 337 रुग्णालयाचे अंदाजपत्रक पाठवले असताना अद्याप एकही रुग्णालयाचे काम … Read more

लाडक्या बैलाचा झाला मृत्यू; शेतकऱ्याने नातेवाईकांच्या उपस्थितीत केला दशक्रिया विधी

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :-शेतीच्या कामात नेहमीच साथ देणारा बैल हा शेतकऱ्यांचा हक्काचा साथीदार असतो. त्याच्या साहाय्याने बळीराजा शेतात सोने पिकवतो मात्र असाच हा सहकारी सोडून गेल्यानंतर बळीराजा देखील व्यथित होतो. त्याच्या जाण्याने बळीराजाला देखील दुःख होते. असाच आपल्या लाडक्या बैलाचा मृत्य झाल्यानंतर एका शेतकऱ्याने बैलाचा दशक्रिया विधी नातेवाईकांच्या उपस्थितीत केला आहे. पारनेर … Read more

नगर अर्बन बँकेच्या चार जागा बिनविरोध तर १४ जागांसाठी निवडणूक होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 14 जागांसाठी निवडणूक लागली असून त्यासाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 87 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यातील बँक बचाव कृती समितीच्या 22 जणांसह 66 जणांनी निवडणूकीतून माघार घेतली. दरम्यान, … Read more

पाथर्डीसाठी ७३ कोटी तर शेवगावसाठी ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी व शेवगाव शहराला सध्या पाणी पुरवठा करणारी पाथर्डी शेवगाव व 54 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या 2018 पासून या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. अनेक … Read more

अर्बन बँकेच्या संचालक मंडळाविरोधात आरोप करणाऱ्या बँक बचाव पॅनलची निवडणुकीतून माघार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :-नगर अर्बन बँक निवडणूक प्रक्रियेत बँक बचाव पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तत्कालीन संचालक मंडळाविरोधात सातत्याने आरोप करत चौकशी, गुन्हे दाखल होणे, आरबीआयने प्रशासक नेमणे आदी गोष्टी लावून धरत निवडणुकीत उतरलेल्या राजेंद्र गांधी यांच्या बँक बचाव समितीच्या पॅनलने ऐन वेळी माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधकांनी घेतलेल्या माघारी … Read more

जिल्हा शल्यचिकित्सकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 रुग्णांचा बळी गेला असून, या दुर्घटनेस जिल्हा शल्यचिकित्सकास जबाबदार दोषी धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. परिचारिका व इतर वैद्यकिय अधिकार्‍यांवर कारवाई करुन जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. मागणीचे … Read more

२२७ कोटींच्या विकास कामांचे उद्या भूमिपूजन !

जामखेड शहरासाठी १४० कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचा, तसेच जामखेड शहरातील व तालुक्यातील अशा २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार रकमेच्या विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा शनिवारी १३ नाेव्हेंबर होणार सायंकाही ५.३० वाजता येथील बाजार तळावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री … Read more

एसटी संप ! नगर जिल्ह्यातील ‘एवढे’ कर्मचारी झाले निलंबित

अहमदनगर – गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे लालपरीची चाके पूर्णतः थांबली असून यामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. यातच एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. दरम्यान आता या प्रकरणी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच … Read more

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक कर्जत पोलिसांनी पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक कर्जत तालुक्यातील मांदळी येथे कर्जत पोलिसांनी कारवाई करत पकडला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगावकडून मांदळीच्या दिशेने एक ट्रक अवैध वाळू चोरून बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे. खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून मांदळी बस थांब्याजवळ सदरील निळ्या रंगाचा ट्रक अडवला. ट्रक … Read more

विकासाला चालना मिळणार…जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार मोठा निधी

अहमदनगर – 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये सन 2020-21 या कालावधीसाठी नगर जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 85 कोटी 39 लाख रुपये आले होते. ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या या निधीचे … Read more

राजकीय सूड उगवण्याच्या नादात ३० कोटी गेले !

जिल्हा परिषद सदस्य कामांची मागणी करत असताना, सत्ताधार्‍यांनी एकवेळ निधी मागे गेला तरी चालेल मात्र विरोधकांच्या गटात कामे होऊ द्यायची नाही, असे खालच्या पातळीचे धोरण राबविले. अशाप्रकारे सत्ताधार्‍यांनी केवळ आमच्यावर राजकीय सूड उगवण्याच्या नादात ३० कोटी रुपये शासनाला परत केले. मात्र ती रक्कम विकासकामांसाठी वापरली नाही, असा आरोप जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी … Read more

दुःखद घटना ! भाऊबीजेसाठी आलेल्या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यु

अहमदनगर – नगर तालुक्यातील वाळकी येथे भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विहीरीत मृत्यु झाल्याची घटना घडली. शुभांगी कैलास बाबर ( वय ३१,रा.कानडी बेलगाव ता. कर्जत) असे विहीरीत पडून मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, विवाहिता आपल्या दोन चिमुरडया मुलांसह भाऊबीजेसाठी आपल्या … Read more

पुरस्कार प्राप्तीनंतर पोपटराव पवार थेट अण्णांच्या पायाशी नतमस्तक झाले

अहमदनगर – पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथे उभ्या केलेल्या ग्रामविकासाच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. पुढील काळातही पवार याना पद्मभूषण मिळावा अशा सदिच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. पोपटराव पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानंतर आज … Read more

दुर्दवी घटना ! गुरांसाठी चारा घेऊन येणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून गेले बैलगाडीचे चाक

अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. योगेश सोमनाथ नरोटे असे मयत मुलाचे नाव आहे. या दुर्दवी घटनेबाबत समजताच परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवार रोजी दुपारच्या सुमारास योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा … Read more

खा.सुजय विखे पाटील म्हणाले…दिलीप गांधींनी मदत केली नसती तर मी….

MP Sujay Vikhe Patil – नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्व. दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांच्या  प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून करण्यात आला. यावेळी माळीवाड्या पासून ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी मतदारांना एक आवाहन केले आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाथर्डी शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विजयनगर, आनंदनगर भागात राहणारे किसन आव्हाड, सागर पोटे, जगन्नाथ बरशिले यांच्या राहत्या घरी तर सुभद्रा भोसले यांनी भाड्याने दिलेल्या भाडेकरूंच्या घरी चोरी झाली आहे. उपनगरत घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत किसन महादेव आव्हाड रा.विजयनगर पाथर्डी यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

शेतकर्‍यांच्या कापूस खरेदी मध्ये दलालाकडून होतेय लूटमार

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील अवैध खाजगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात विलास फाटके यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान फाटके यांनी अहमदनगर जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे खाजगी दलालाकडून कापूस खरेदी केला जातो. या दलालांकडे कापूस खरेदीचा कुठल्याही प्रकारचा … Read more