अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2161 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

नगर सोलापूर रोडवर झालेल्या खड्ड्यांवर पॅचिग काम करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगर सोलापूर रोडची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झालेली असून येथील रस्त्याचे पॅचीग काम करण्याच्या मागणीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन देताना श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर समवेत गजानन भांडवलकर, दादासाहेब गव्हाणे, बळीराम खताळ, अक्षय भिंगारदिवे आदी उपस्थित होते. नगर-सोलापूर रस्त्यावर … Read more

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साई संस्थानने साईबाबांची माणूसकीची शिकवण जपली – मुख्यमंत्री ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी … Read more

संतापजनक : प्रसिध्दीसाठी तहसीलदारांनी तो अंत्यविधी केला, मुलगा व नातेवाईक येत असताना देखील परस्पर अंत्यविधी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील तहसीलदार यांनी कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याने त्यांनी स्वत: अंत्यविधी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यम व वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. पारनेर तहसिलदार यांनी वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ नका सांगून स्वत:च अंत्यविधी उरकून प्रसिध्दी मिळवून त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोडदे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे … Read more

युवकाचा खून केल्याप्रकरणी 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जमिनीच्या वादातून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40 वर्षे) यांना नऊ आरोपींनी मारहाण करून त्यांचा खून केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत आप्पासाहेब मारुती चंदने हे आपल्या घरासमोर असतांना गैरकायद्याची … Read more

चक्रीवादळाच्या तडाख्याने फळबागांचे नुकसान; शेतकरी हैराण!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते चक्रीवादळाचा राज्यातील अनेकभागात फटका बसला आहे. या वादळाचा नगर तालुक्यातील बहुतांशी भागाला देखील तडाखा बसला आहे. यात प्रामुख्याने कांदा व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासुन अनेक भागातील वीज गायब झाली आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेला बळीराजा चक्रीवादळाच्या तडाख्याने पुरता हैराण झाला आहे. पावसाळा तोंडावर … Read more

‘त्या’ सात पोलिस कर्मचाऱ्यांचा काळ आला होता पण वेळ…!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगरहून पुण्याच्या दिशेने सिमेंट घेऊन निघालेला ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील अहमदनगर जिल्हा हद्दीवरील चेक पोस्टजवळून गेल्याने यावेळी बंदोबस्तासाठी असलेले सात पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले. नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे जिल्हा सरहद्दीवर बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत वाहन तपासणीसाठी तात्पुरती … Read more

नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच सुरु आहे पशुधनाचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांचे लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. यातच नागरिकांचा जीव जसा महत्वाचा आहे, त्याचबरोबर पशु पक्ष्यांचा देखील जीव महत्वाचा आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात … Read more

मंत्री तनपुरेंना बाकीची कोविड सेंटर दिसली नाहीत का?

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी कोविद सेंटरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. मात्र मंत्री तनपुरेंचा असाच एक दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे. राज्यमंत्री तनपुरे यांनी काही कोविड सेंटरलाच … Read more

चक्रीवादळाचा महावितरणला फटका तब्बल ३ हजार २८६ रोहीत्र पडले बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते या चक्रीवादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह जिल्ह्यात देखील मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून, अनेक भागातील  वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी बहुतांश भागील वीजपुरवठा तात्काळ सुरु करण्यात आला तर अनेक भाग सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. वाऱ्याची … Read more

काय सांगता : या पंपावर रुग्णवाहिकेस मिळतेय मोफत पेट्रोल!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र या सर्व अडचणीच्या काळात देखील जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज ५० लिटर इंधन पूर्णपणे मोफत देण्याचा … Read more

धोका लक्षात घेऊन ‘या’ तहसीलदारांची कार्यतत्परता !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते वादळामुळे भयावह परिस्थिती असून या वाऱ्याचा फटका सहारा शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने संपूर्ण हॉल बंदीस्त करण्याच्या सूचना दिल्यानंतर अवघ्या काही तासात ज्या भागातून वारा आत शिरतो तो भाग ग्रीन शेडने बंदीस्त केल्याने सर्व रुग्णांनी सुटकेचा निश्वास … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा गाजतोय हनी ट्रॅप ! ते साहेबही झाले शिकार…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपची चर्चा गाजत आहे,नगरमध्ये नुकतेच प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘त्या’ प्रसंगाचा व्हिडिओ शूट करून एक बागायतदारावर हनी ट्रॅप रचला असल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणीही केली गेली. परंतु संबंधित बागायतदाराने पोलिसात धाव … Read more

मंत्री तनपुरे संतापले…तहसीलदारांना वेळेच भान आहे कि नाही

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर गावोगावी मंत्री, राजकीय नेतेमंडळी भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत आहे. यातच हलगर्जीपणा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे. नुकतेच मंत्री प्राजक्त तनपुरे हे वांबोरी गावाकडे गेली असता गावात सुरु असलेला वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार मंत्र्यांसमोर उघड … Read more

नगरकरांसाठी महत्वाची बातमी; पाणी जपून वापरा…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-मुळानगर येथील वीज पुरवठा सोमवारी दुपारपासून बंद झाल्याने धरणातून पाणी उपसा झाला नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. धरणातून पाणी उपसा झाला नसल्याने परिणामी साठवण टाक्या भरल्या नाहीत. त्यामुळे नगरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. काही मिनिटे लाईट गेली तरी मुळानगर,विळद आणि … Read more

दुर्दैवी : जिल्ह्यातील इतक्या शिक्षकांचा घेतला कोरोनाने बळी

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. यात आरोग्य,पोलिस व त्यांच्या सोबतच जिल्हा परिषदेचे शिक्षक वर्ग देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. परंतू शिक्षण व महसूल यांचा समन्वय नसल्यामुळे  प्राथमिक शिक्षकांची प्रचंड कुचंबना होत आहे. लसीकरण न करता कोविड ड्युटी केल्यामुळे कोरोनाची बाधा होवून जिल्ह्यातील जवळपास ४२ शिक्षकांना आपला जीव … Read more

आयुक्त म्हणतात: ‘तो’ निर्णय २०मे नंतर घेऊ

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सोमवार दि.१७ मे पासून नगर शहरातील किराणा दुकाने,भाजी,फळे हे विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना या सर्व वस्तू जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहेत. भाजी व फळे ही जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहे. एक तर लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका त्यात महागाई यामध्ये … Read more

बंद व्यापार पुन्हा सुरु करावा; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-नगर महानगरपालिका आयुक्त यांनी नुकतेच शहरातील घाऊक व किरकोळ किराणा भुसार व्यापार करण्याकरिता परवानगी दिली व त्यानंतर आज पुन्हा 17 पासून सर्व व्यापार बंद केला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान नुकतेच नवीन आदेशानुसार बाजारपेठ उघडल्यामुळे व्यापा-यांनी परराज्यातून मालाची खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांनी … Read more