अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बाधितांची आकडेवारीमध्ये वाढ होतच आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच यामध्ये दरदिवशी काहीतरी नवीन नियम करण्यात येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढला आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी … Read more

अहमदनगर कोरोनाला हरवत आहेत ! आज रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी…वाचा संपूर्ण आकडेवारी “

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४०५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १९० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

आयुक्त म्हणाले…कुणाच्या दबावाखाली काम करू नका

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, मात्र या लसीकरण मोहिमेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिक यापासून वंचित राहू लागले आहे. याच अनुषंगाने मनपाच्या आयुक्तांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर होणारा नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबविण्याच्या सूचना देत, कुणाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या सहा म्हशी ठार !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकणासह गोव्यात प्रचंड नुकसान केले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या वादळाने अनेक जिल्ह्यात झाडे कोसळेली,त्याचसोबत घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका नगर जिल्ह्यातील काही भागास बसला असून आज शहरातील कानडे मळा येथील एका शेतकऱ्याच्या म्हशींच्या अंगावर वीजवाहक … Read more

रुग्णांची बेडसाठीची धावाधाव थांबणार ; मनपाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना अनेक वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याचा सातत्याने तुटवडा देखील रुग्नांना भासतो आहे.मात्र शहरात रुग्णांची बेडसाठी होणार धावाधाव रोखण्यासाठी मनपाने महत्पूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात आयुर्वेद … Read more

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने; तहसिलसमोर घोषणाबाजी

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- देशात कोरोना संकटामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांचा रोजगार गेला आहे, मात्र दुसरीकडे केंद्र सरकार नागरिकांना महागाईचा चटका देत आहे. यामुळे नागरिकांमधील रोष देखील वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्राच्या निषेधार्थ निदर्शने केली. दरम्यान या वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबादार असून त्याचा पाथर्डी … Read more

विनाकारण हिंडफिऱ्यांची होणार अँटीजेन टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्‍यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असा संशय जिल्हा प्रशासनाला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता गर्दीच्या ठिकाणी चेक … Read more

कोरोनाने गाव बंद करण्यास पाडले भाग; 10 दिवसांचा लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. यातच सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव हा वेगाने होऊ लागला आहे. यामुळे आता ग्रामस्थ देखील सतर्क होऊ लागले आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे करोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे या … Read more

गुड न्यूज : अखेर कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची अधिकृत आकडेवारी..

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2105 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता असलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे ( वय ३८ वर्षे) याचा मृतदेह आढळून आला. सोपान शिंदेचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सोपान शिंदे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तशी फिर्याद नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी अकरा वाजेच्या सुमारास गावातील एक व्यक्तीला … Read more

तौक्‍ते वादळाचा अहमदनगर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा; मोठ्या प्रमाणात नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे,अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर मध्ये जोरदार सरी बरसल्या. हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस … Read more

‘आ. रोहित पवार यांच्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा खेळखंडोबा’

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षात कुकडी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी केला. कर्जतसह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्या क्षेत्राला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतकरी देशोधडीला लागून आर्थिक संकटात सापडून आत्महत्येची भाषा … Read more

निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- ऊस व दुध व्यवसाय शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने ऊस गाळपाची विक्रमी कामगिरी केली. संगमनेर तालुका सुजलाम – सुफलाम करण्यासाठी लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ … Read more

राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उवल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. खासदार राजीव … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते हत्याकांड ! ‘तो’ घरी गेला नसता तर वाचला असता…

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- आपण करत असलेल्या चोरीचे बिंग फुटू नये म्हणूनच एका अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेवगाव तालुकातील खुंटेफळ येथे सोमवार १० मे रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. दरम्यान सार्थक अंबादास शेळके (वय-11) असे मयत मुलाचे … Read more

असाही आदर्श ! जामखेडच्या अंगणवाडी सेविकेने कोविड सेंटरला दिला एक महिन्याचा पगार

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  मुस्लिम बाधवांंमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात रोजे ठेवले जातात. या काळात दान (जकात) करावे, असेही या धर्मात सांगितले आहे. आपल्या एकूण उत्पन्नातील काही भाग दान द्यायचे असते. याच उद्देशाने जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार … Read more

अहमदनगरकरानों घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच ! नाही तर करावी लागेल कोरोना टेस्ट..

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढतच आहेत दररोज वाढणाऱ्या ह्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर ताण आला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता नावा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे. उद्यापासून अहमदनगर शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या … Read more