file photo

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. यातच सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव हा वेगाने होऊ लागला आहे.

यामुळे आता ग्रामस्थ देखील सतर्क होऊ लागले आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे करोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे या समितीने घेतला आहे.

शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे.

चिंचोलीतील तांभेरे रस्ता परिसरातील बाधितांची संख्या पाहता गुहा आरोग्य केंद्राचे अधिकारी रुग्णतपासणीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करतात.

दरम्यान, गावातील औषध दुकाने व दवाखाने वगळता बंद पाळण्यात येणार असून उल्लंघन करणाराचे दुकान सील करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे.

कोरोना अद्यापही कायम असून नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करणयात येत आहे.