नगर मधून दोन मुलासह महिला बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर मधील चंदन इस्टे भोसले आखाडा बुरूडगाव येथून दोन मुलेसह महिला माहेरी बांडगाव तालुका पारनेर या ठिकाणी जात असल्याचे सांगून घरातुन गेली ती माहेरी पोहचली नाही तेव्हा तिच्या नातेवाईकांकडे व नगर शहरात शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात सुशिला भानुदास जाधव (वय 55 धंदा … Read more

जिल्ह्यातील 6 पोलिसांना जाहीर झाले ‘पोलीस महासंचालक’ पदक

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलात काम करणार्‍या सहा पोलिसांचा समावेश आहे. या सहा पोलिसांना ‘पोलीस महासंचालक’ पदक जाहिर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अर्जुन चिंचकर, राज्य गुप्त वार्ता विभागाचे … Read more

पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पारनेर शहरातील भाजी बाजारात कारवाई करीत असणाऱ्या पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायायासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली . याबाबत पोलीस कर्मचारी सत्यजित शिंदे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून सुभाष … Read more

डीवायएसपी भाऊसाहेब ढोले याना पोलीस महासंचालक पदक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील सुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर होताच त्यांचे राहते गाव दुलेचांदगाव येथे व पाथर्डी,नगर येथे आंनद व्यक्त करण्यात आला.डी.वाय. एस.पी ढोले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपअधीक्षक … Read more

पुढील १५ दिवस पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली. मात्र, अद्यापही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, नागरिकांचे … Read more

आज ३१४८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज ३१४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ८०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

शरद पवारांच्या कन्येने थोपटली आमदार निलेश लंकेची पाठ

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनमानसात स्वतःची एक वेगळी ओळख असलेले पार्नरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याची सध्या राज्यात चर्चा होत आहे. आजवर लंकेच्या कामाची दखल अनेक राजकीय नेत्यांनी घेतली आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत वाढले तब्बल इतके रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना चा पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे,  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 3953 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या चोवीस तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयास दहा ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी या रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी आ.रोहित पवार प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नियोजनातून रुग्णांना चांगल्या सुविधा आणि उपचार मिळत असुन अनेक रुग्ण उपचार घेऊन आपल्या घरी परतत आहेत. त्यांच्या याच कामाने प्रभावित होऊन काही सामाजिक संस्थांनी आ.रोहित पवार यांच्याकडे सुमारे १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर … Read more

खा. सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून आणलेल्या रेमडीसियर इंजेक्शन विषयी चे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता या प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणारे श्रीरामपुर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नुकतेच डिवायएसपी संदीप मिटके हे आपल्या पथकासह शिर्डी विमानतळावर पोहचले असुन विमानतळ अधिकाऱ्याची चर्चा … Read more

आ.निलेश लंके कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पारनेर शहराचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कोरोणा महामारीच्या काळात 1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठानच्या वतीने निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यावेळी जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरच्चंद्र आढाव, अक्षय उघडे, निलेश लंके प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष विजय … Read more

राहूरीतील ‘ या’ नगरसेवकाने सुरू २० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कायम सामाजिक प्रश्नाची जान असणारे, समाजावर कुठलेही संकट उभे राहिले तर पुढे जाऊन नेतृत्व करणारे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु केलेआहे. राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरा येथील नागरिकांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याचे राज्यमंञी ना.प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. राहुरी फँक्टरी येथे नगरसेवक … Read more

रेमडेसिवीर प्रकरण सुजय विखेंना भोवणार; न्यायालयाने दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाची मोठी आकडेवारी दररोज दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात अनेक वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. यातच कोरोना रुग्नांसाठी महत्वपूर्ण असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी हवाई दौरा करत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये आणला होता. आता याच प्रकरणावरून सुजय विखे अडचणीत … Read more

प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शेवगाव तालुक्यात पथकाकडून रुग्णालयांच्या तपासण्या

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-शेवगाव नगरपरिषदने शहरातील खासगी कोविड सेंटरची तपासणी करून हॉस्पिटलमध्ये आढळून आलेल्या त्रुटी व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला लेखी सूचना कळविल्या आहेत. नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील बडे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, श्री साई कोविड हॉस्पिटल, अथर्व … Read more

स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणे भोवले! कोट्यवधीच्या बोटी पोलिसांनी केल्या नष्ट….

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील माळवाडी शिवारात वाळूचा ट्रक रिव्हर्स घेत असताना ट्रक चालकाच्या दुर्लक्षाने ट्रकच्या पाठीमागे असलेली दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली आली. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि स्थानिक नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे हे प्रकरण बेलवंडी पोलिस आणि तहसीलदार यांच्याकडे गेले असता, त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता स्थानिकांनी … Read more

रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत आहे: प्रथम दर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याबाबत दि. 3 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  खा. सुजय विखे यांनी विनापरवाना रेम्डेसिवीर आणल्याप्रकरणी प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई यांना शिर्डी विमानतळ येथील १० ते २५. एप्रिल २०२१ पर्यंतच्या सर्व खासगी … Read more

राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढला,निर्बंधांमध्येही झाली वाढ वाचा १० महत्वाचे मुद्दे

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २९३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more