कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयास दहा ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी या रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी आ.रोहित पवार प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या नियोजनातून रुग्णांना चांगल्या सुविधा आणि उपचार मिळत असुन अनेक रुग्ण उपचार घेऊन आपल्या घरी परतत आहेत.

त्यांच्या याच कामाने प्रभावित होऊन काही सामाजिक संस्थांनी आ.रोहित पवार यांच्याकडे सुमारे १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मदत म्हणुन दिले आहेत.विशेष म्हणजे ही उपकरणे सध्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने परदेशातुन मागवण्यात आली आहेत.

ही उपकरणे नुकतीच आ.रोहित पवार यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केली.यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,गट विकासाधीकारी अमोल जाधव,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड उपस्थित होते.ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते.

एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा फायदा गरज असलेल्या कोरोना रुग्णांना होणार आहे.

मदतीच्या आवाहणातून अनेक नागरिक व सामाजिक संस्था मदत देऊन या कठीण काळातही माणुसकीचे दर्शन घडवत आहेत ही नक्कीच प्रत्येकाला ऊर्जा देणारी बाब आहे.

“मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक व सामाजिक संस्था पुढे येत आहेत याचा मला निश्चित आनंद आहे.

आता पुढील काळातही आणखी काही ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची मदत होणार आहे.मदतीसाठी सरसावलेल्या सर्वांचे मी आभार मानतो” -आ.रोहित पवार

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|