Ahmednagar News : जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला पहा सविस्तर … !

Pragati
Published:

Ahmednagar News : गेल्या वर्षी रोहिणी, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले होते. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. यंदा मात्र मृगाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मान्सूनने वेळेत हजेरी लावत पावसाच्या पहिल्याच नक्षत्रात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. मृग नक्षत्रातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी देखील पेरणीची तयारी करत आहे.

रविवार दि. १६ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७.७ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, यंदा गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर सुरु आहे. १६ जूनपर्यंत प्रत्यक्षात सरासरी १३७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर तालुके वगळता सर्वत्र पेरणीजोगा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी २३६.८ मि.मी.इतका पाऊस आतापर्यंत पडला आहे. त्यापाठोपाठ श्रीगोंदा तालुक्यात २१६.१, पाथर्डी तालुक्यात १९६.१, जामखेड तालुक्यात १८४.४, नगर तालुक्यात १७०.८, पारनेर १७०.८, शेवगाव ११५, नेवासा ११५, राहुरी १०४, संगमनेर८६.५, अकोले ६६.२, कोपरगाव ९३.१, श्रीरामपूर १०३.६ आणि राहाता तालुक्यात ९२.८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

अकोले, संगमनेर, कोपरगाव आणि राहाता तालुके वगळता उर्वरित तालुक्यात सरासरी १०० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे अद्याप काही भागात पेरणीसाठी वाफसा नाही. अद्यापही कमी अधिक पाऊस सुरुच असल्याने पेरणी रखडली आहे. तर दुसरीकडे शेतकरी पावसाची वाट पाहत असल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

आता पर्यंत फक्त उसासह १० हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अकोले तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे. या भागात अद्याप पेरणीजोगा पाऊस झाला नसल्याने तालुक्यात भाताची पेरणीस प्रारंभ झाला नाही.

जिल्ह्यात आठ दहा दिवसांत सरासरी १३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही कमी अधिक पाऊस सुरुच आहे. वाफशाअभावी पेरणी रखडली आहे. तर काही भागात अद्याप पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही.

त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. जिल्ह्यात फक्त १० हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत फक्त १.८८ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४३० हेक्टरवर बाजरी, २९२ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe