अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर,असे असतील कार्यक्रम…

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक … Read more

प्रेम प्रकरणातून आत्महत्या, ४ जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-आपली मुलगी प्रेम विवाह करणार हे समजल्यावर प्रेम करत असलेल्या पुणे येथील मुलीच्या नातेवाईकांनी नेवासा येथील तरूणाला मारहाण केली. तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यामुळे घाबरून जाऊन त्या तरूणाने राहुरी तालूका हद्दीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पुणे येथील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली, चोवीस तासांत आढळले ‘इतके’ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या उतरतीकडे असलेल्या कोरोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच असून अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण  2 हजार 935 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील शहर व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  गेल्या 24 तासाच 2 हजार 935 जणांना काेराेना संसर्गाचे … Read more

रेमडेसिवीरचा काळाबाजार तेजीत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- पाथर्डीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असुन अठराशे रुपयाचे इंजेक्शन विस हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने घेणारा व विकणारा दोघेही व्यवहाराची वाच्यता होवु नये म्हणुन काळजी घेतात. येथील एक युवक इंजेक्शनसाठी तिन तालुक्यात जाऊनही त्याला ते मिळाले नाही, अखेर पाहुण्याच्या मदतीने त्याला वीस हजार रुपये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्यात घरोघरी जाऊन होणार करोनाबाधितांची तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- राहुरी तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधीत गावातील स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतींना तशा सूचना करण्यात आल्या … Read more

‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ गुन्हेगारी रोखण्यासह कोरोना मदतकार्यातही ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन कार्यान्वित करण्यात आलेली ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे कोरोना मदतकार्यातही या यंत्रणेचे मोठे योगदान आहे. लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्याबाबत कर्जत पोलिस स्टेशनच्या वतीने … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असतानाही पारनेरमधील मुख्य बाजारपेठ असणार्‍या गावात भाजीपाला व फळ विक्रेत्यांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी बुधवारी संयुक्त कारवाई करत गर्दी करणार्‍या भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पारनेर शहरासह … Read more

जिल्हयातील कोरोनामुक्त रुग्णसंख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षी पासून कोरोनाची लाट सुरूच आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनमुक्त रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज … Read more

अबब… जिल्ह्यात ७५ लाखाची दारू पकडली,

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-येथील दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाभळेश्वर परिसरात साफळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील दारुचे 1200 बॉक्स आणि आयशर ट्रक असा 94 लाख 88 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी गहु देविसिग मिल याला अटक करण्यात आली आहे. नगर येथील दारुबंदी विभागास अवैध दारूची … Read more

मुळा धरणातून चार बंधारे भरणार ; उद्यापासून विसर्ग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-मुळा धरणाचे दरवाजे अखेर उद्या(29 एप्रिल) रोजी उघडणार असून कोल्हापूर पद्धतीचे चारही बंधारे भरून दिले जाणार आहे. राज्याचे नगर विकास तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा होकार मिळवत धरणातून पाणी सोडण्यास मंजुरी आणली आहे. याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, उन्हाळी परिस्थिती … Read more

रेमडेसीविरच हेच कोरोनावर उपचार नसून त्याचा बाऊ करू नका !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-रेमडेसीविरच हेच कोरोनावर उपचार नसून त्याचा बाऊ करू नका. रुग्ण नॉर्मल उपचारानेही बरे होत आहेत. तसेच लसीकरण करणे महत्वाचे आहे. पण ते गर्दी करून न करता सर्व नियम पाळून करून घ्यावेत, असे अावाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या … Read more

मोदींचा विकास आणि सुजय विखेंच्या रेमडेसिवीरचे लाभार्थी दिसत नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर चाकणकर यांनी शंका घेऊन ही बॉक्समध्ये नेमके काय आणले, इंजेक्शन आणली असतील तरी ती कोठून आणली, कोणाला वाटली हे जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विखे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा तीन हजार पेक्षा जास्त…वाचा चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा ३ हजार चा टप्पा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 3122 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता … Read more

दोनदा महापौर, सात वर्षे आमदार, दहा वर्षे वडील आमदार, पाच वर्ष नगराध्यक्ष असणाऱ्यांना शहरात एक हॉस्पिटल उभारता आले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते.  त्याचे राजकीय पडसाद शहरात उमटू लागले आहेत. काळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढत टीका केली होती. यावर … Read more

धक्कादायक ! तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे चार जणांनी एका तरुणावर चक्क कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संदीप राजेंद्र तांबे (वय 28 वर्षे, धंदा नोकरी, रा. तांबे वस्ती, तांभेरे ता. राहुरी) या तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये … Read more

कोरोनाला झुगारून ऊसतोड कामगार आपल्या कामात मग्न

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील चार कामगार कोरोनाच्या संसर्गामुळे दगावले आहेत. श्रीगोंदा कारखान्यातील २५ कामगारांना संसर्ग झाला. मात्र संपूर्ण राज्यात एकाही ऊस तोडणी मजुराला कोरोनाची लागण झालेली नाही. यामुळे ऊसतोड मजूर कोरोनाला झुगारून आपल्या कामात मग्न असल्याचे काहीसे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या राज्यात तापमानाचा पार चढला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-तू माझ्या सोबत चल, जर आली नाही तर मी आत्महत्या करेन, असे धमकावून साथीदाराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. व नंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला.ही घटना जामखेड तालुक्यात घडली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन अगरचंद खाडे व बाबा … Read more

बाबो : गुप्तधनासाठी पुरातन वाड्यात खोदकाम;मात्र?

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-एकविसाव्या शतकात देखील अंध्दश्रध्देपोटी अनेक अघोरी प्रकार केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा शहरात घडला आहे. शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका तब्बल तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेले. गुप्तधन काढण्यासाठी वाड्यतील … Read more