आयपीएस पठारेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! लेखा परीक्षक ते पोलिस उपायुक्त.. ‘असा’ होता अहिल्यानगरच्या भूमीपुत्राचा प्रवास…

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला. रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते. तेथे … Read more

पारनेर तालुक्यातील १४ गावांना पाणी टंचाईच्या झळा, टँकरसाठी गावांचे मागणी अर्ज

पारनेर: उन्हाळा जवळ येताच पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, सारोळा आडवाईसह १४ गावांना पाण्याच्या टंचाईचा त्रास भोगावा लागतोय. या गावांनी टंचाईचे प्रस्ताव सादर करताच गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन उद्भवांची पाहणी केली. त्यांनी शासनाकडे तातडीनं अहवाल पाठवला आहे. तहसील आणि पंचायत समितीकडे टँकरची मागणी करणारे अर्जही दाखल झालेत. पारनेर तालुक्यातील अनेक गावांत पाणी पुरवठा … Read more

पारनेरसाठी आमदारांचा मास्टर प्लॅन! टाकळी ढोकेश्वरला मिळणार का एमआयडीसी ?

पारनेर तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी राज्य सरकारकडे भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारित एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) उभारण्याची मागणी केली आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी मांडली. पारनेर हा दुष्काळी मतदारसंघ असून, येथील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांचे मत … Read more

पारनेर तालुक्यात गुरू शिष्याच्या नात्याला फासला काळीमा ; शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील पठार भागावरील एका गावात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी साहेबराव जऱ्हाड या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या … Read more

पारनेरचा अश्लील बोलणारा आणि छळ करणारा शिक्षक अखेर अडकलाच !

पारनेर तालुक्यात एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. साहेबराव जऱ्हाड असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, साहेबराव जऱ्हाड यांनी मागील … Read more

प्राथमिक शिक्षकाच्या चौकशीसाठी नेमले पथक ; पारनेर तालुक्यातील प्रकार

७ मार्च २०२५ पारनेर : पारनेर तालुक्यातल्या एका प्राथमिक शाळेतल्या वयस्कर शिक्षकाने शनिवारी (दि. १) या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली.त्याबद्दल वर्तमान पत्रांमध्ये गुरुवारी (दि. ६) हि बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली गेली त्यामुळे त्या शिक्षकाच्या चौकशीसाठी दोन विस्तार अधिकाऱ्यांसह … Read more

‘पारनेर’चा २११ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण ! आ. काशिनाथ दाते ; पतसंस्थेला ३ कोटी २६ लाखांचा नफा

७ मार्च २०२५ निघोज : पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या ठेवींनी २११ कोटी १५ लाख रुप्यांचा टप्पा पार केला आणि सहकार क्षेत्रात मोठी आर्थिक झेप घेतली आहे. या संस्थेला ५ मार्च अखेर ३ कोटी २६ लाख रुपयांचा नफा झाला अशी माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली. याबद्दल माहिती देत असताना आ. दाते म्हणाले, पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडे २४७ … Read more

घडा भरला ! निघोजच्या धोंड्या टोळीला मोक्का !!

नगर: विशेष प्रतिनिधी निघोजच्या जत्रा हॉटेल मालकावर सशस्त्र हल्ला, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बैंक ऑफ महाराष्ट्राची रोख रक्कम तसेच दागिण्यांची लुट, साकूर ता. संगमनेर येथील सराफाची लुट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मास्टरमाईंड असलेल्या निघोजचा घोड्या व त्याच्या टोळीचा घडा भरला आहे त्यांच्याबर मोळांतर्गत कारवाई करण्यात आली असून तालुक्यातील मिथुन उंबऱ्या काळे याचाही त्यात समावेश आहे. दरम्यान … Read more

पारनेरचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली मागणी

१ मार्च २०२५ टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील एसटी महामंडळ डेपोसाठी नविन एसटी बसेस मिळाव्यात तसेच वडगाव सावताळ व वासुंदे या गावांचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या परीसरात नविन वीज उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पारनेरमधील परिवहन महामंडळ डेपोमध्ये ६५ बसेस … Read more

पारनेरच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष ! पुणे जिल्ह्यात अतिरिक्त पाणी, इथे कोरडे कालवे

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला सोडण्यात आले, मात्र पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके जळत असतील, मग आमची का जळू नयेत?” असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ, आदेश नसल्याचे कारण पिंपळगाव जोगा कालव्याचे … Read more

मतदारांनी खासदारकीच्या माध्यमातून लागलेली कीड नष्ट केली; आमदार दाते यांची टीका

Ahilyanagar News : खासदारकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयात दहशतीची कीड पसरली होती;परंतू पारनेर, नगर मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी ही कीड नष्ट करण्याचे काम केल्याने जिल्हा शांत झाल्याचे सांगत आ. काशीनाथ दाते यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल आ. दाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर … Read more

अखेर पारनेरच्या त्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याऱ्या मुख्याध्यापिका निलंबित:काय आहे नेमका प्रकार

Ahilyanagar News : गोरगरीब व आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी शासनाकडून भरमसाठ निधीची तरतूद करण्यात येते. तो निधी आवश्यक कामासाठी वापरुन निधी योग्य योग्य त्या ठिकाणी वापरूनत्याचा सदुपयोग करण्यापेक्षा त्या निधीतून आपला कसा फायदा होईल याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे दिसुन येते आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असर्णा­या आदिवासी आश्रमशाळेचे चित्र तर अतिशय … Read more

१५ फेब्रुवारी पासून कुकडीचे आवर्तन – आ. काशिनाथ दाते

११ फेब्रुवारी २०२५ पारनेर : कुकडी प्रकल्पातील येडगांव धरणातून निघोज व परिसरातील १४ गावांना कालव्याद्वारे पाणी दिले जाते. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार हे आवर्तन २० फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र पीकांना पाण्याची आवष्यकता असल्याने हे आवर्तन आगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती. … Read more

पारनेरला साकारणार ‘तांबडीकार प्रकल्प’ ; अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

२९ जानेवारी २०२५ टाकळी ढोकेश्वर : आमदार काशिनाथ दाते यांची आमदार निवड झाल्याबद्दल वासुंदे येथील म्हणून नि आयोजित सत्कार कार्यक्रमात तांबडी कार प्रकल्प व्हावा अशी आग्रही मागणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली होती.यावेळी आ. काशिनाथ दाते यांनी हा प्रकल्प प्राधान्याने करणार असल्याचे आश्वासन या कार्यक्रमात दिले होते, त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभेच्या … Read more

दाढी १३०, स्टाईल कटींग १५० ! असे आहेत कटिंग-दाढीचे नव्या वर्षातील दर

२१ जानेवारी २०२५ सूपा : या समाजातील अनेक तरुणांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे आणि व्यवस्थापनाचे कार्सेस करून या व्यावसायात व्यावसायिकता निर्माण केली.तसेच पूर्वीच्या दुकानापेक्षा हेअर सलून म्हणून त्यामध्ये विविध प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित केले,त्यामुळे या व्यवसायाला चांगले दिवस आले असले तरी महागाईची झळ या व्यावसायालाही बसत आहे. त्यामुळे सलून व ब्युटी पार्लरच्या … Read more

यंदा ज्वारीचा पेरा घटला ; गरिबांची भाकरी महागणार

२१ जानेवारी २०२५ सूपा : यंदा शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली आहे.रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून ज्वारीचे नाव घेतले जात असे.मात्र ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता,यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरांवर येणाऱ्या पिकाकडे शेतकरी वळाले.धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जाऊ न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सोडवत असल्याने दूध उत्पादनाचा … Read more

Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू

टाकळी ढोकेश्वर : संगमनेर येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने खडकवाडी येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्या नर जातीचा आहे. खडकवाडी गावातील गणपती मळा परीसरात या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी सकाळपासून युद्धपातळीवर मोहीम सुरु केली होती. अखेर दुपारी ३.३० वाजता त्यास जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, त्या अगोदर काल खडकवाडी येथे … Read more

कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर

कान्हुरपठार। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण गडावर तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली, यात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखो भाविकांनी कोरठण नगरीत कुलदैवताचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार नादाने संपूर्ण परीसर दुमदुमून गेला होता बेल, भंडाराची मुक्त हाताने … Read more