‘पारनेर’चा २११ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण ! आ. काशिनाथ दाते ; पतसंस्थेला ३ कोटी २६ लाखांचा नफा

Published on -

७ मार्च २०२५ निघोज : पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या ठेवींनी २११ कोटी १५ लाख रुप्यांचा टप्पा पार केला आणि सहकार क्षेत्रात मोठी आर्थिक झेप घेतली आहे. या संस्थेला ५ मार्च अखेर ३ कोटी २६ लाख रुपयांचा नफा झाला अशी माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली.

याबद्दल माहिती देत असताना आ. दाते म्हणाले, पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडे २४७ कोटी २७ लाख रुपयांचे खेळते भांडवल असून निव्वळ भांडवल ६ कोटी १६ लाख रुपये आहे. संस्थेचा निधी २६ कोटी २९ लाख रुपयांचा तर १४७ कोटी २२ लाख रुपयांचे कर्ज वाटप संस्थेने केले आहे. संस्थेने ८३ कोटी १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून मालमत्ता ४ कोटी ४ लाख रुपयांची झाली आहे.

संस्थेच्या १७ शाखा उत्कृष्ट पद्धतीने काम करत असून सोनेतारण कर्जावर फक्त शेकडा ९ टक्के व्याजदर आकरले जात आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून खातेदारांना कोणत्याही शाखेतून त्वरीत व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

५ मार्च अखेर संस्थेला ३ कोटी २६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. आयएसओ ९००१ : २०१५ प्रामाणित असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा असून मुख्य कार्यालय पारनेर येथे आहे. संस्थेच्या पारनेर शहर, पारनेर तालुक्यातील सुपा, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, खडकवाडी, पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, शिरूर, नवी मुंबईच्या कामोठे येथे स्वमालकीच्या इमारती असून पारनेर तालुक्यातील पारनेर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, जामगाव, ढवळपुरी व श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथील शाखांमध्ये खातेदार व सभासदांसाठी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

संस्थेचे संस्थापक, चेअरमन म्हणून आ. काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक भरभराट केली आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन व माजी सरपंच सुरेश बोहुडे, बाळासाहेब सोबले, रखमाजी कापसे, लक्ष्मण डेरे, मयुर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, पांडुरंग भादिगरे, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, दिलीप दाते, सुनिल गाडगे, सुनंदा दाते, आशा तराळ हे कुशल संचालक म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ठेवीदारांमध्ये विश्वास व नावलौकीक मिळविला आहे, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe