राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… पोस्ट व्हायरल !

bhaurao karhade

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सिने जगतात एकच खळबळ उडाली. ख्वाडा, बबन आणि टीडीएम असे एका पाठोपाठ एक हीट चित्रपट देणारे भाऊराव मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत असे या पोस्टवरून समजल्यानंतर चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. भाऊराव जमीन विकू नका, आपण सर्व मिळून मार्ग काढू, … Read more

अहमदनगर मध्ये रेल्वे गाडीच्या धडकेत एकाजणाचा मृत्यू , परिसरात खळबळ !

dhadak

रेल्वे गाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना निंबळक शिवारात गुरुवारी (दि.२५) सायंकाळी घडली. गौतम रामदास भोसले (वय ४०, रा. खारे कर्जुने, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. गौतम भोसले हे निंबळक शिवारात असलेल्या रेल्वे गेट जवळ रेल्वे मार्गा शेजारी गुरुवारी सायंकाळी जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना त्यांचा नातेवाईक सोन्या सुनिल पाचारणे (रा. वडगाव गुप्ता) याने … Read more

डिंबे माणिक डोह कालवा झाला नाही तर तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल – घनश्याम शेलार !

ghanshyam shelar

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व टीडीओमध्ये तू तू मै मै, व्हिडिओ व्हायरल !

lalage

पारनेर : प्रतिनिधी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला. अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापले व दोघांमध्ये तू तू, मै मै झाली. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो, असे सांगत लाळगे यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री … Read more

अहमदनगर पुणे महामार्गालगत राळेगण सिद्धी फाट्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी !

accident

अहमदनगर पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १९) पहाटे राळेगणसिद्धी फाट्याजवळ चारचाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवारी (दि.१९) माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार (रा. ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) व वाहनचालक जखमी राहुल लिंबाजी राठोड … Read more

वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर, सुपा परिसरात रुग्णसंख्येत वाढ !

helth

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागते आहेत. या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, त्यातून अनेकजण इन्फेक्शन ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी … Read more

सुजय विखे आणि त्यांचे कुटुंब कोणाशीच प्रामाणिक नाही, फेरमतमोजणीच्या मागणीवर खा. लंके यांचा डॉ. विखेंवर हल्लाबोल !

lanke vikhe

नगर : प्रतिनिधी ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आमच्यासारख्याने तक्रार करायला हवी होती. तुम्ही भाजपाचे, देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्‍वास दाखवत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत असे सांगत खा. नीलेश लंके यांनी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या फेरमतमोजणीच्या मागणीवर माध्यमांजवळ प्रतिक्रीया देताना विखे यांचे नाव न … Read more

सुपा परिसरात सर्वत्र वरुणराजा मेहेरबान, बळीराजा आनंदी, तलावांच्या जलसाठ्यात देखील वाढ !

moog sheti

पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात रविवारी दुपारनंतर व सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने सर्व परीसर जलमय झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप पिकांची वाढ चांगली झाली असून, पिकांचे उत्पादनात चांगली वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दमदार पावासामुळे पाणी नालीमध्ये बसत नसल्याने ते रस्त्यावरून वाहिल्याने रस्ते धुवून … Read more

संजय राऊत यांचे नगर जिल्ह्यात मोठे विधान.. म्हणाले, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत”.. पैकी २ उमेदवार जाहीर केले…

sanjay raut

श्रीगोंदा : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना उपनेते साजन पाचपुते हे शिवसेनेचे श्रीगोंद्यातून उमेदवार असतील. ते आमदार म्हणून राणी लंके यांच्याबरोबर एकाच गाडीत विधानसभेत येतील, असे विधान करत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही तर, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात महाविकास आघाडी कडून … Read more

पिकावरील अमर्याद खते व तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीचा कस बिघडतोय !

tanaanashak

शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढला त्यामुळे जमिनीची सुपिकता सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ढासळत आहे. जमिनी खारपड व चोपन होत आहेत. उत्पादन खर्च वाढून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत असताना दुसरीकडे वर्षाकाठी हजारो लिटर तणनाशकांचा … Read more

महाराष्ट्र्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रात लाडकी ठरणार !

ladaki bahin

महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे, या याजनेंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. त्या नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या महिलांना … Read more

हॉटेल मालकावरील जीवघेण्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थांकडून निषेध करत चार तास निघोज बंद.

nighoj crime

मंगळवारी २ तारखेला निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी तिव्र निषेध केला. गुरुवार (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानेस्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. येत्या दोन दिवसांत पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा … Read more

जेवणावरून तुफान राडा ! निघोज येथील जत्रा हॉटेलवरील घटना.

crime

पारनेर तालुक्यातील निघोज येथील जत्रा हॉटेलवर जेवणावरून तुफान राडा झाला. या वेळी आरोपींनी हॉटेल मालकासह वेटरला कोयता व तलवारीने मारहाण केल्याने हॉटेल मालक प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती पोलिसांना देताना फिर्यादी गणेश भाऊ भुकन यांनी सांगितले की, … Read more

निलेश लंकेंकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य ! म्हणतात की….

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेअर झाला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे निलेश लंके हे एक जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खरंतर नगर दक्षिणची निवडणूक ही मोठी अटीतटीची झाली. या निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने निलेश लंके … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेलाही पारनेरच ठरेल लक्षवेधी ! ‘ही’ आहे इच्छुकांची फौज, अजित पवारांसोबतच विखेंचाही निघेल घाम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ऑक्टोबर मध्ये साधारण विधानसभेच्या निवडणुका होतील असे अंदाज आता वर्तवण्यात येऊ लागले आहेत. त्यानुसार सर्वच पक्ष व इच्छुक तयारीला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदार संघ असून विधानसभेलाही शक्यतो पारनेर लक्षवेधी ठरेल असे चित्र आहे. याचे कारण असे की येथे विधानसभेला इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. त्यात अनेकांना लोकसभेवेळी वरिष्ठांनी आमदारकीचा … Read more

Ahmednagar News : लहानपणीच वडिलांचे निधन, दोन्ही पायानी दिव्यांग तरीही बारावीत घवघवीत यश, अहमदनगरमधील तुषारच्या जिद्दीची गोष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : लहान असताना वडिलांचे निधन झाल्यानं पितृछत्र हरपले.. आईने अंगणवाडी सेविकाच्या पगारातून कुटुंब चालविले.. तुषार दोन्ही पायानी दिव्यांग तरीही जिद्दीने बारावी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून यश मिळवले. तुषार लोंढे या विद्यार्थ्याची शिक्षणाची जिद्द पाहून कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील युवकांनी पाठबळ दिले. त्याच्यासाठी तीनचाकी मोटारसायकलचे पैसेही भरले आहेत. कान्हूर पठारचा तुषार लोंढे … Read more

पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून … Read more

भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोदी हटाव, शेतकरी बचाव, शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो अश्या घोषणा यावेळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब शिर्के तेथे उपस्थित … Read more