पाथर्डी तालुक्यातील कान्होबावाडी शाळेत आठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक तर पहिली अन् तीसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही
करंजी- तालुक्यातील कान्होबावाडी येथे प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एक सहशिक्षक आहे. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या शाळेत तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी केंद्रातील करंजीपासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण देणारी शाळा आहे. … Read more