अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू!

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे रुग्णाला दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. कालच तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान काल दि. 25 रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 03 कोरोना पॉझिटिव्ह, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून … Read more

काय सांगता…..क्वारंटाईन महिलेचे दागिने चोरीला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेचे दागिने विलगीकरण कक्षातून चोरीला गेले. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे घटना घडली.हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी … Read more

त्या तरुणाच्या खूनप्रकरणी 24 तासांच्या आत सहा जणांना अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री साडेसात वाजता नागेश गवळीराम साळवे याचा काही लोकांनी गावठी कट्ट्यातून गोळी घालून खून केला होता. रविवारी याप्रकरणी मयताचा भाऊ … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी, महाविकाअघाडी सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेले अपयश, लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांच्यासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशा मागण्या करत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी,श्रीरामपूर शहरच्या वतीने महाविकाअघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून कोरोनाबाधित … Read more

पत्नीचे पोलीसासोबत अनैतिक सबंध,तरुणाने पोलीस चौकीच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.  त्यानानातर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पत्नीचे एका पोलीसासोबत अनैतिक सबंध … Read more

धक्कादायक : पुण्याहून श्रीगोंद्यात आलेला कोरोनाचा रुग्ण आढळला …

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे, आज संध्याकाळी तालुक्यातील एक मुलगा कोरोना पॉझिटिव निघाला आहे.  घोरपडी (पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी वर आलेल्या व्यक्तीचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातील  महाराजांच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच असल्याचे सांगून विवाहित तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील ३१ वर्षाच्या विवाहित तरुणीस गोंडेगाव येथे रस्त्याने पायी जात असताना आरोपी शफीक युसूफ शेख , वय 39  (रा. दहिफळ ता – शेवगाव) याने कुठे  जायचे असे म्हणून ओळख करुन घरी नेले. त्यानंतर तो सदर पिडीत महिलेस दहिफळ गावचा सरपंच आहे , असे सांगत महिलेच्या घरी … Read more

आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्‍यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवण्‍यासाठी केलेल्‍या ए‍कत्रित प्रयत्‍नांमुळे कोरोना संकटाच्‍या लढ्यातील आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्‍यात लक्ष वेधत आहे. राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्‍या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्‍यात येणा-या उपाय योजना … Read more

विलगीकरण कक्षात जवानाचे हाल ! लग्नासाठी आलेल्या जवानासोबत झाले असे काही ….

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  देश रक्षणाचे कर्तव्य बजावून स्वत:च्या लग्नासाठी परवानगी घेऊन आपल्या गावी मौजे धामोरी खुर्द (ता. राहुरी) येथे परतलेल्या भारतीय लष्करातील जवानाला गावा बाहेरील शाळेत क्वारन्टाईन होण्याची वेळ आली आहे. क्वारन्टाईन होऊन देखील जेवणाची व राहण्याची सुविधा नसून, सैनिकांचे हाल केले जात असल्याचा आरोप मेजर अशोक कुसमूडे यांनी केला आहे. अशोक … Read more

अर्ध्या रात्री रेल्वे स्टेशनवर दीड हजार प्रवाश्यांना फुड पॅकेट व पाणी बॉटलचे वितरण

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने विविध राज्यात रेल्वेने जाणार्‍या प्रवाश्यांना देखील अहमदनगर रेल्वे स्टेश्‍न येथे फुड पॅकेट व पाण्याची बॉटल देण्याचा उपक्रम चालू आहे. पंजाब मधून अहमदनगरला मध्यरात्री आलेल्या रेल्वे मधील प्रवाश्यांची एका फोनवर काही … Read more

कोरोनाच्या अफवेमुळे दूध डेअरीचालक उध्वस्त होण्यापासून वाचला

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच धास्तावले आहे. कोरोना नांव ऐकताच भल्याभल्यांच्या अंगात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. तर एखाद्याला कोरोना झाल्याची अफवा पसरताच त्याला समाजातून बहिष्कृत केल्यासारखी वागणुक देण्याचे प्रकार सध्या घडत आहे. अशीच परिस्थिती एका दूध डेअरीचालकावर ओढवल्याने त्याच्या मदतीला जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी असलेले डॉ.विनय शहा देवदूतासारखे धावून आले. तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ परशाला अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- ‘ सैराट’फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्या भामट्याला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज ( रा . पिंपरी चिंचवडी , जि . पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे . त्याने महिलेकडून घेतलेले … Read more

विजेचा धक्का बसून दोन मुलींचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिकटल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. ही रविवारी ( दि . २४ मे ) रोजी सायंकाळी सात वाजता घडली. जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोरोनाच्या साथीच्या भीतीने तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे. २०१३ मध्ये गावातील … Read more

ब्रेकिंग : मुंबईहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ०५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील … Read more

मोठी बातमी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव , कोरोनाबाधित महिला रुग्ण सापडली !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस आज नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ठाणे येथून श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वानवळा आल्यामुळे एकच खळबळ उडाली … Read more

घातवार… विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यासाठी शनिवार व रविवार घातवार ठरला. विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. बेलापूर ते चितळी रेल्वेस्टेशन दरम्यान २५ वर्षांच्या युवकाचा व पढेगाव रेल्वेस्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाला. रविवारी सकाळी शहरातील वाॅर्ड १ मधील डबके पेंटरसमोर राहणाऱ्या रोहिणी दीपक आरोरा (३०) या सकाळी ८ च्या सुमारास शिवाजी … Read more