पारनेर मध्ये जिवंत बॉम्ब आढळला !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी काळकूप परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आला. स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर सायंकाळी नगरच्या लष्करी तुकडीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय बांडे व त्यांच्या पत्नी वर्षा बांडे हे डोंगरावरून परतत असताना जमिनीमध्ये अर्धवट … Read more

वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी गजाआड

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. आरोपींनी शिर्डीजवळील रांजणगाव देशमुख येथे महिंद्रा पिकअपचालकाला अडवून लुटमार केली होती. उमेश तान्हाजी वायदंडे (गणेशनगर), आकाश दीपक गायकवाड (लक्ष्मीनगर, शिर्डी), संदीप दिलीप रजपूत (बाभळेश्वर) व आणखी एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर … Read more

क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड  यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना घडल्यामुळे त्यांच्या परिवारासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानुसार शहरात विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावेत या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी बैठकीस खा.सदाशिवराव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, … Read more

महाराष्ट्रातील जनतेला मृत्यूशय्येवर नेणाऱ्या सरकारला आता जाब विचारायची गरज !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोविड १९ च्या महामारीवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा राज्यात वाढत चालला आहे. कोरोनाचा विषाणू अकार्यक्षम, सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भाजपाचा एक एक कार्यकर्ता दिवसरात्र जनसेवा करत … Read more

धक्कादायक : 14 क्वॉरंटाईन सदस्यांनी ठोकली धूम !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  एकिकडे कोरोनाची लढाई प्रशासन शर्थीने लढत असून, दुसरीकडे मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटूंबातील तब्बल १२ ते १४ सदस्यांनी अक्षरश: धूम ठोकल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी घडल्या. या दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९) उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथील क्वॉरंटाईन एक जोडपे दुसऱ्याची मोटारसायकल … Read more

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 39 हजार पेक्षा जास्त ! वाचा तुमच्या भागातील स्थिती

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८७रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन मध्ये, २२ मेपासून व्यवहार सुरू करता येणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक २२ मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.अर्थात, जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे … Read more

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक … Read more

सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोनाची राज्यातील परिस्थीती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जनतेला संकटाच्या काळात मदत केली मात्र राज्य सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. … Read more

भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. भाजपतर्फे मंगळवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी मा खा दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे … Read more

वंचितांची ईद गोड करण्यासाठी शरद पवार विचार मंचचा पुढाकार

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव म्हणजेच रमजान ईद. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले कामगार व आर्थिक दुर्बल घटक असलेल्या गरजूंना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंचायत समितीच्या सभापतींचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय संभाजी बोऱ्हाडे (वय-५५,रा, केळी -ओतूर,ता.अकोले) यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सातेवाडी गणातून ते पंचायत समिती वर निवडून गेले होते.भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या गावी विहिरीचे काम सुरू होते.काम पाहण्यासाठी सोमवारी दुपारी ते विहिरीत उतरले होते, यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या नगराध्यक्षांचा अखेर ना’राजीनामा …

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जनता कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त असताना देवळाली प्रवरामध्ये नगराध्यक्ष आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगले आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर हुकूमशहाचे आरोप करीत विरोधकांनी केले,या मुळे विरोधकांच्या डावपेचाला कंटाळून नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा ‘ना’राजीनामा देऊन त्यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष कदम यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या नाराजीनाम्यात माझ्यासह विरोधकांनाही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातही लवकरच सुरु होणार दारू घरपोहच !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने करोनाचा धोका होण्याची भिती व्यक्त होऊ लागली. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य … Read more

‘त्या’अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यालय सोडून विनापरवानगी रेड झोन पुण्यात प्रवेश केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी फिर्याद दिली. लॉकडाऊनमध्ये अधिकाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन निरीक्षक आहुजा यांनी पूर्वपरवानगी न घेता … Read more