हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील लॉकडाऊन ‘या’तारखेपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस उलटली

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून चार मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून ही बस उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबादकडे २६ मजुरांना घेऊन निघाली होती. सदर खासगी बस ( क्र … Read more

अहमदनगरच्या ‘या’ उद्योजकाला 5 कोटी 86 लाखांचा ‘चुना’

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नवी मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा . लि ( खारघर ) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा चुना लावला. अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 38 गुन्हे करणारा ‘हा’ वॉन्टेड आरोपी टोळीसह पोलिसांच्या जाळ्यात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पूर्वीचे 35 व आता लागोपाठ तीन गुन्हे असे एकूण 38 गुन्हा केलेला वॉन्टेड नाशिकच्या किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (वय ३२) याच्यासह त्याची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. दोन गावठी कट्ट्यांंसह सात जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकली, 7 मोबाइल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. किरण उर्फ अॅन्थोनी … Read more

‘या’ निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला. कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग, पालिकेच्या दोन कामगारांना अटक

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नाकाबंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.लाख रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला … Read more

पत्ते खेळताना आयुष्याचाच पत्ता झाला कट !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाइपलाइन रस्त्यावरील तागडवस्ती येथे एकाचा खून झाला. पत्ते खेळताना पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. नंदकिशोर गणपत मंचरे (५२, तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तागडवस्ती भागात काहीजण शनिवारी जुगार खेळत होते. पैशांच्या वादातून त्यांच्यात भांडणे झाली. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. मंचरे याला पत्ते खेळणाऱ्या जोडीदाराने दगडाने मारले. त्यात … Read more

‘त्या’ तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नगरमध्येच अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मृत्यूपश्चात स्त्रावाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निघोजमधील संबंधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या सर्व दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे निघोज, पिंप्री जलसेन, पठारवाडी, तसेच चिंचोली येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मृताच्या १२ वर्षांच्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तोही शनिवारी सायंकाळी निगेटिव्ह आला. दरम्यान, निघोज परिसरात मुंबईतील रेड झोनमधून दाखल झालेल्या … Read more

धक्कादायक : एकाच दिवसांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ , कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार पार !

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज  १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार … Read more

यहाँ कपडा और ब्लेड मिलेगा …..?

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  “गर्भवती असलेल्या आपल्या सुनेची, शैलाची प्रसूती चालू कंटेनरमध्ये करावी लागली तर त्यासाठी नाळ कापायला दोन नवे ब्लेड ,कापूस,स्पिरीट आणि  निरुपयोगी कपडे  मिळतील का ? ” असे विष्णू यादव याने विचारले तेव्हा राहत केंद्रावरील सर्वजण सुन्न झाले. उत्तर भारतातील आपल्या घरांकडे पायी , सायकलिंद्वारे तसेच मिळेल त्या वाहनाने हजारो श्रमकरी  परतत आहेत.त्यांच्यासाठी निंबळक बायपास … Read more

हे तर मोदी सरकारचे ‘कर्ज’ पॅकेज ; महसूलमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जनता भरडली आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना आर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक मदतीची गरज असताना मोदी सरकारने मात्र आर्थिक पॅकेजच्या नावाने केवळ जनतेची दिशाभूल केली आहे. ही जनतेची क्रूर थट्टा केली आहे. आर्थिक मदत पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज,कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या आता 41 !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटीव आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे. आज सायंकाळी हे प्रलंबित १४ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल … Read more

टोमॅटो आणि कोरोना व्हायरसचा संबध काय ? जाणून घ्या ‘ही’ सत्य माहिती

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही लोक अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. तसेच मध्यंतरी टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी खून

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- पत्ते खेळताना झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला. आज सायंकाळी शहरातील तागडवस्ती परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नंदकिशोर मंचरे हे मयताचे नाव आहे. काही जण तागडवस्तीवर पत्ते खेळत होते. त्यावेळी पैशाच्या वादात झाला. त्यात एकास आपटून गंभीर दुखापत केली. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जास अपात्र, ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- नवीन पीक कर्जासाठी पहिले कर्ज भरलेले असणे गरजेचे असते. राज्य शासनाने कर्जमाफी केली आणि पहिल्या दोन टप्प्यात अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद असल्याने तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी आल्या असून या शेतकऱ्यांचे कर्ज जैसे थे असल्याने सुमारे २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहेत. … Read more

ठेकेदाराने खासदार ‘दादांना’ही दिली नाही ‘दाद’ !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबद्दल अनेकांनी डोके लावूनही फत्ते झालेले नाही. परंतु येथील गटारीचे काम तरी लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा घेऊन नागरिकांनी खा.डॉ.विखे यांना गार्हाणे मांडले. परंतु खासदारांच्या समोर फक्त हो म्हणून ठेकेदाराने हे काम ‘जैसे थे’च ठेवले. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे दोघे ताब्यात !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर शहरातील नगर-पुणे रोड वरील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न करणात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आधीही शहरात दुसऱ्या एका बँकेत असा चोरीचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) या … Read more