अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more

भाजपाच्या ‘या’ आमदारांच्या खासगी कारखान्यातून दारूसाठी स्पिरीटची

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- ‘पार्टी विथ डिफरन्स’ पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा फेज – 2 या कारखान्यातून धुळे येथे हातभट्टी दारुसाठी स्पिरिटची विक्री केली जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. पाचपुते यांच्या साईकृपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अवघ्या एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारातील उज्ज्वला चव्हाण हिच्या घरी बुधवारी रात्री ही घटना घडली. मागील भांडणातून आरोपींनी उज्ज्वला हिच्या एक महिन्याच्या अर्णवच्या डोक्‍यात दगड घालून त्यास ठार केले. अर्णव अभिषेक चव्हाण (वय 1 महिना) असे मृत बाळाचे नाव … Read more

अहमदनगर शहरात बुलेटने घेतला आजोबांचा जीव !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर शहरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बबन भानुदास तोडमल ( वय- ६० रा . बुन्हाणनगर नगर ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी ( दि १० ) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर- बुन्हाणनगर रोडवरील बोचरी नाक्याजवळ घडली . याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात … Read more

25 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक चु , येथील कृष्णा रमेश देठे , वय २५ या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली . या प्रकरणी भास्कर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर  … Read more

कोविड हॉस्पिटलला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली भेट

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. कोरोनच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर सर्व बाबींची पाहणी केली व आढावा घेतला. अहमदनगर मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स14 मे 2020, वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा असून आज रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू … Read more

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे होणारे नुकसान तसेच पावसाळ्यात येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, पूर आदींचा सामना करण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. यासंदर्भात, सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी  व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यासाठीचे नियोजन … Read more

सख्ख्या भावाच्या अंत्यविधीपेक्षा कर्तव्याला महत्व, कर्मचाऱ्यांचाही डोळ्याच्या कडा पाणावल्या

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे सख्खे बंधू चंद्रकांत मायकलवार ( वय ६५ ) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. आपला सख्खा भाऊ गेल्याचे समजले, पण त्याचवेळी शहरात एकाच दिवसात ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. अशा परिस्थितीत आयुक्त मायकलवार यांनी नगर शहरातील जनतेची काळजी घेणे महत्वाचे मानत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवकाकडून रुग्णालय कर्मचाऱ्यास मारहाण, शहरात खळबळ !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : शेतातील पाण्याची पाईपलाइन नेण्याच्या वादातून भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह अन्य चौघांनी खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. विशेष म्हणजे महापालिकेच्या केबिनमध्येही मारहाण करण्यात आली. यामुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. संजय परशुराम छत्तिसे (वय ४२) हे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील शिंदे, भैय्या संपत गोरे यांच्यासह … Read more

प्रगतशील शेतकऱ्याचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव थोरात (वय 48) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला. कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ पंचायत समिती सदस्यावर गुन्हा

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  पाथर्डी पंचायत समिती सदस्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देविदास लिंबाजी खेडकर (वय 42, पंचायत समिती सदस्य, पाथर्डी, रा:- पाथर्डी , ता: पाथर्डी, जि:- अहमदनगर), सविता देविदास खेडकर (वयः- 37, गृहिणी, रा:- पाथर्डी ता:- पाथर्डी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावठी कट्ट्याच्या धाकाने दाम्पत्यास लुटले

अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक पती पत्नीस गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी -राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाऊर येथील रंजना शिंदे (खोपडी-कोपरगाव येथे कार्यरत) तर पती ग्रामसेवक मधुकर गंगाधर आग्रे (राहाता पंचायत समितीत कार्यरत) हे दाम्पत्य आपले कर्तव्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग हॉटस्पॉट घोषित !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अहमदनगर शहरात दोन दिवसांत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, शहरातील काही परिसर मध्यरात्रीपासून “हॉट स्पॉट’ करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट,पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चोक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.4, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस स्टेशन,जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट येथे हॉटस्पॉट … Read more

कोरड्या विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-कान्हूरपठार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्यास पारनेर वनविभाग, नगरच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम व ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वा. कान्हूरपठार ते गारगुंडी रस्त्यावरील हनुमंत लोंढे यांच्या कोरड्या पडलेल्या सुमारे चाळीस ते पन्नास फुट खोल विहीरीत बिबट्या असल्याचे शेतकरी रामदास लोंढे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावात येवू न दिल्याने महिला सरपंचांना मारहाण !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठीपोखरी बाळेश्वरमध्ये प्रवेशाचे सर्व रस्ते बंद असताना देखील चार जण गावात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना गावात प्रवेश दिला नाही, याचा राग आल्याने या चौघांनी सरपंच मनिषा अर्जुन फटांगरे यांना शिवीगाळ करत व दगडाने मारून दुखापत केल्याची घटना बुधवार दि.१३ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. … Read more