अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स 5 मे 2020 : ‘त्या’ तिघांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-   कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे जिल्‍हयात अडकलेल्या स्थलांतरित आणि इतर नागरिकांचे महाराष्‍ट्र राज्‍यांतर्गत इतर जिल्‍हयामध्‍ये जाण्‍यासाठी मोठया प्रमाणावर अर्ज प्राप्‍त होत आहे. या अर्जाच्‍या परवानगीसाठी तहसिलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांना त्‍यांचे कार्यक्षेत्रात महाराष्‍ट्र राज्‍यांतर्गत इतर जिल्‍हयामध्‍ये जाण्‍यासाठी प्राप्‍त होणा-या अर्जावर तात्‍काळ निर्णय घेऊन कार्यवाहीसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा माणिकदौंडी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर १५ एप्रिल रोजी तसेच २ मे रोजी दुपारी आरोपी शाहरुख शाम्मद बेग , रा . … Read more

खडू शिल्पातून दाखविली कोरोनाची भयानकता आणि उपाय …कोरोना हारेल, विश्‍व जिंकेल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना नावाच्या विषाणूरुपी राक्षसाने संपूर्ण विश्‍वालास आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांना मृत्यूच्या लाटेत लोटणार्या या महाभयंकर राक्षसाचा सामना केवळ आणि केवळ आपण सर्व मिळूनच करु शकतो. यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, अत्यंत आवश्यक आहे. या महत्वाच्या सूचना आणि राक्षसरुपी या विषाणूची भयानकता छोट्याशा खडू शिल्पात कोरली आहे. नगरच्या … Read more

कोरोनाच्या काळात अंधांसाठी आ. संग्राम जगताप आले धावून !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना संसर्ग विषाणूमुळे प्रत्येक मनुष्यावर एक संकट आले आहे. त्यात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे अनेकांच्या उपजिविकेचे साधन बंद आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकाळामध्ये अंधांची रोजीरोटीच बंद झाली आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र अहमदनगरचे 270 अंध सदस्य आहेत. शहरातील 35 अंधांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्यावर बहिष्कार ! ‘त्या’प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल माजी आमदार यांनी अपशब्द वापरुन फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील जनतेचा अपमान केल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. प्रशांत गायकवाड हे दलित चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत. माजी आमदार राठोड यांच्या डोक्यातील जातीय मानसिकता बाहेर पडली आहे. चुकीच्या पद्धतीने गलिच्छ भाषा वापरत माजी … Read more

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ‘या’ वेळेत बंद

अहमदनगर जिल्‍हयातील नागरी व ग्रामीण भागातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्‍यावश्‍यक सेवा, कार्यालये, आस्‍थापना वगळून इतर सर्व दुकाने दिनांक १७ मे, २०२० रोजी पर्यंत संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच या कालावधीत उपरोक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा वगळून इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव्ह ! वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची माहिती

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  दि.०५ – जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ … Read more

अहमदनगर ब्रेकींग : …म्हणून लाठीचार्ज करून दारू दुकानांना ठोकले सील !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरात आज दुपारी दारू विक्रीच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केला. तसेच तीन दुकानांना प्रशासनाने सील ठोकले. पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिका यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ . आर. शेख यांनी तीन … Read more

‘येथून’ दारूचा मोठा साठा चोरीस

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- वडगाव गुप्ता परिसरातून परमिट रूम फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक अशोक गायकवाड (रा. सिव्हिल हडको, नगर) यांचे नगर-मनमाड रस्त्यालगत वडगाव गुप्ता परिसरात परमिट रूम आहे. रेनॉल्ट शोरूम शेजारी असलेल्या या परमिट रूमची पाठीमागील खिडकी … Read more

अहमदनगर शहरात अशी चालू आहे दारू विक्री पहा फोटोज …

शहरात वाईन शॉप वर दारू घेण्यासाठी मद्यपींच्या लागलेल्या रांगा.. (छाया- वाजिद शेख-नगर) मद्य विक्रीला परवानगी दिल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.

..तर 10 वी व 12 वीचे निकालही लांबण्याची शक्यता

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता निर्धारित स्थळी पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मध्ये सूट मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याची माहिती शिक्षक … Read more

कोरोनाच्या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांसह जिल्ह्यातील माजी सैनिक देखील सज्ज !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहण्यासाठी माजी सैनिकांनी देखील पुढाकार घेतला आहे. सिमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील 219 माजी सैनिकांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. … Read more

अजानला परवानगी कशी दिली? शिवसेना-भाजपने प्रशासनाला केला सवाल

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  रमजानच्या काळात अजानला परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढू शकतो. काही समाजातील सण घरात साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा नगर शहरातील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे … Read more

धक्कादायक : गुटखा न दिल्याने ‘त्याने’दुकानदारासोबत केले असे काही !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे गुटखा दिला नाही म्हणून चार ते पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दुकानदारावर चाकूने हल्ला केला. ही घटना काल सोमवार दि.4 मे रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र, सुदैवाने या दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला. हा वाद मिटविण्यासाठी तेथीलच दत्तात्रय धनवटे हा तरुण गेला … Read more

अहमदनगरमध्ये वाईन शॉपसमोर लागल्‍या रांगा!

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी … Read more

पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. शिंदे यांच्यासह … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज : ‘या’ भागातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. रविवारी ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला होता. अजून ११ अहवालांची प्रतीक्षा आहे. जामखेड, नेवासे, संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यातील रुग्ण सध्या उपचार घेत असून उर्वरित तालुके कोरोनामुक्त आहेत. गेल्या आठवड्यात शनिवार वगळता एकही रुग्ण आढळून आला नाही. शनिवारी … Read more