राहुरीतील ६८ गावांत गरजूवंतांना घरपोच किराणा पोहोच : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

नगर : गेली ३0 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. आजही ते नियमितपणे सुरु आहे. या लोक दरबाराच्या माध्यमातून माझ्याशी जनतेचे नाते जुळले आहे. लोक दरबारामध्ये वैयक्तिक प्रश्नांपासून शासनाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम जनतेने केले आहे. ते सोडविण्याचे काम मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास … Read more

स्वच्छता कर्मचारींच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी

अहमदनगर – कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वच्छता कर्मचारी एका वॉरियर्स प्रमाणे दररोज लढा देत आहे. या विषाणूच्या महायुध्दात डॉक्टर, पोलीस व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन स्वच्छता कर्मचारी महत्त्वाचे योगदान देत असताना त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी सुमन इंटरप्राइजेस मॅन पावर संचालक तालेवर गोहेर, अखिल भारतीय … Read more

पगार मागणार्‍या आठ साखर कामगारांना व्यवस्थापनाच्या तक्रारीवरुन अटक

अहमदनगर ;- विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील आठ कामगारांनी पगाराच्या मागणी करता आंदोलन केले, म्हणून त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने आंदोलकांची निर्दोष सुटका करण्याची मागणी मुख्यमंत्री, सहकार मंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस सुभाष काकुस्ते, अध्यक्ष पी.के. मुंडे, कोषाध्यक्ष व्हि.एम. पतंगराव, सहचिटणीस आनंदराव … Read more

साईराम सामाजिक सोसायटीने 150 गरजू कुटुंबीयांची स्विकारली जबाबदारी

अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या नगर कल्याण रोड येथील 150 गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तर लॉक डाऊन उघडेपर्यंत साईराम सामाजिक सोसायटीने या गरजू कुटुंबीयांची जबाबदारी स्विकारली आहे. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. या संकट काळात कोणीही … Read more

कोरोनाच्या आपत्ती काळात शिक्षक कर्मचार्‍यांना तात्काळ वेतन अनुदान द्यावे -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या भीषण आपत्ती काळात उपेक्षित ठेवण्यात आलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांना तात्काळ वेतन अनुदान वितरित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक … Read more

झोपडपट्टीत कोरोना ही धोक्याची घंटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले असताना अनेक आवश्यक आरोग्य सुविधा, स्वच्छता व झोपडपट्टीचा उडालेला बोजवारा अशा अनेक गंभीर प्रश्‍नाबाबत सरकारचे डोळे उघडले आहे. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनच्या वतीने घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी संघटना सातत्याने संघर्ष करीत आहे. हक्काचा निवारा मिळत नसल्याने शहरात झोपडपट्ट्या झपाट्याने वाढत आहे. तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बायपास चौकात कंटनेरने पोलिसाला उडविले

अहमदनगर Live24 :- नगर – औंरगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात कंटनेरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना आज सकाळी घडली. वाहतूक शाखेचे कर्मचारी नदीम शेख हे यात गंभीर जखमी झाले आहे.पोलीस कर्मचारी नदीम शेख यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज … Read more

साठ वर्षांच्या महिलेचा तीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी अटक

पाथर्डी : करंजी परिसरातील एका खेड्यात साठ वर्षे वयाच्या महिलेचा एका तीस वर्षे वयाच्या युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. जमलेल्या ग्रामस्थांनाही युवकाने शिवीगाळ केली असून याबाबतवृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजीजवळील … Read more

पाथर्डीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण,गोळीबार झाल्याची चर्चा

पाथर्डी :- शहरालगत असलेल्या माळीबाभुळगाव शिवारातील एका कॉलनीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण होवून एका निवृत्त सैनिकाला काही जणांनी मारहाण केल्याचे समजते. यावेळी गावठी कट्यातुन हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी जावून आले मात्र येथे हाणामारी झाली असल्याचे काही जण सांगत आहेत. मात्र गोळीबार झाला की नाही हे स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस ठाण्यात … Read more

भाईगिरी आली अंगलट; श्रीगोंदा तालुक्यातील युवा नेत्याला बेदम चोप !

अहमदनगर Live24 :- काष्टी येथे २१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राउंडवर आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना उलट उत्तर देत अर्वाच्च भाषा वापरल्याने काष्टीतील युवा नेत्याला बेदम चोप देण्यात आला. या प्रकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे. २१ रोजी काष्टी येथे रात्री ९ च्या सुमारास राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी आपले कर्तव्य बजावत होती. अकारण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !

जामखेड :- कोरोनाबाधित वृध्दाच्या मृत्यूनंतर त्याची दोन मुले पॉझिटिव्ह निघाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्ती मात्र कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले. एका नगरसेवकासह १८ जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह अाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी सांगितले. आता या सर्वांना डॉ. आरोळे हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. … Read more

धक्कादायक : पारनेर मध्ये खरेदी करणारा निघाला कोरोनाबाधित !

पारनेर :- पुण्याहून परभणीकडे जाताना सुप्यात पाण्याची बाटली खरेदी करणारा दुचाकीस्वार कोरानाबाधित असल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संबंधित किराणा दुकानदारासह त्याचे कुटुंब क्वारंटाइन केले असून दुकानाच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचाही शोध घेतला जात आहे. परभणी येथील तरूण भोसरी येथे नोकरीस असून १२ एप्रिलला तो दुचाकीने परभणीकडे निघाला. सुप्यात आल्यानंतर त्याने बाटलीबंद पाणी खरेदी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली वाचा लेटेस्ट अपडेट्स …

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत जामखेड येथील आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read more

मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर –  मुकुंदनगरचे हॉटस्पॉट म्हणून लागू केलेले निर्बंध मागे. गुरूवारी, २३ एप्रिलला पहिल्या आदेशाची मुदत संपत आहे. जर येथे एकही नवा रुग्ण आढळून आला नाही, तर २४ एप्रिलपासून या भागातील अत्यावश्यक सेवांची सर्व दुकाने सुरू होणार आहेत. इतर निर्बंध पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच असणार – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

जाणून घ्या कोरोना व्हायरसची राज्यातील स्थिती आणि तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर मध्ये डिझेल विक्री वेळात बदल

अहमदनगर Live24 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्ह्यातील  कॅन्‍टोंमेन्‍ट झोन  वगळता जिल्ह्यात सार्वजनिक सोयीसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीची वेळ वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये डिझेल विक्रीची वेळ आता सकाळी 5 ते सायं 5 वाजेपर्यंत निश्चित करण्‍यात आली आहे. तसेच पेट्रोल विक्री पूर्वीप्रमाणेच दररोज सकाळी … Read more

डॉक्टरची IDEA : कोरोना टाळण्यासाठी बनवले असे यंत्र ज्याने स्पर्श न करता हात धुता येतात !

अहमदनगर Live24 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिने सुरक्षितेसाठी विशेष यंत्रणा बनवली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझर किंवा नळाच्या पाण्यानं हात स्वच्छ करतो. पण त्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझरची बाटली आणि नळाला हात लावतो. त्यामुळं संसर्ग होण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अहमदनगर Live24 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि … Read more