गावाकडे पायी चाललेल्या महिलेची बँकेत झाली प्रसूती…

सोनई :- कोरेगाव भीमा येथे पोटापाण्यासाठी मोलमजुरी करणारे कुटुंब काम नसल्याने व खाण्याची भ्रांत निर्माण झाल्याने गर्भवती पत्नीसह यवतमाळ येथे पायी जात होते. त्यातील संदीप काळे यांच्या पत्नी निर्मला संदीप काळे (३२) या गर्भवती महिलेस वडाळा बहिरोबा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या वडाळा येथील शाखेत आडोशाला … Read more

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 :- नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ (वय ३०) या विवाहितेने रविवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी माहेरच्या लोकांनी छळ व मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : निधनानंतर चार दिवसांनी ‘त्या’ व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट …

अहमदनगर – निधनानंतर चार दिवसांनी जामखेड तालुक्यातील व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.हा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यावर घरातील चार व्यक्ती व संबंधित व्यक्तीला तपासणाऱ्या खासगी हाॅस्पिटलच्या डॉक्टरांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले. दरम्यान, परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या चारही जणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रविवारी दुपारी नगर येथून सोडण्यात आले आहे. त्यांना आता जामखेड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. आज आणखी ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल काल पॉझिटिव्ह … Read more

अखेर ‘त्या’ अहमदनगरकरांनी कोरोनाला हरवलं !

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत. आज संगमनेर तालुक्यातील ०४ तर जामखेड येथील ०४ रूग्ण त्यांचा १४ दिवसानंतरचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त … Read more

अहमदनगर गुड न्युज : जिल्ह्यातील आठ रुग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 :- अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी आहे, अहमदनगर मध्ये  उपचार घेणारे आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता लवकरच त्यांची सुट्टी होणार आहे.  जामखेड येथील ०४ कोरोना बाधीत व संगमनेर शहरातील 3 आणि व आश्र्वी बुद्रुक येथील एक अश्या एकूण ८  रुग्णांचा १४ दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून  या आठ व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या … Read more

#Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी

अहमदनगर :- जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले. उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील … Read more

डॉक्टर्स फोनद्वारे देणार मोफत वैद्यकीय सल्ला

राहाता :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये किरकोळ व साध्या आजारांसाठी रुग्णांना प्राथमिक पातळीवरील औषधोपचार व वैद्यकीय सल्ला त्वरित मिळावा तसेच रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राहाता तालुक्यातील श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या सहा डॉक्टरांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. फोनद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांच्या वतीने डॉ.स्वाधिन गाडेकर यांनी … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन महत्त्वाचे – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर :-  लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत.या सर्व नागरिकांना राज्य शासनाने बसची व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहोच केले पाहिजे, असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत … Read more

राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अहमदनगर :-  नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. अजीनाथ बाळासाहेब काळे (वय २९) असे सदर आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.राहत्या घरातील छताच्या लाकडी ओंडक्याला साडी बांधून त्याने गळफास घेतला. आत्महत्या केलेल्या युवकाच्या वडीलांनी घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सुधाकर काळे यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉटस्पॉटमधील लॉकडाऊन वाढविला

अहमदनगर :-  नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून १३ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटस्पॉट मधील लॉकडाऊन १९ एप्रिल ते २७ एप्रिलपयंर्त वाढविल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. या दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा ही २७ एप्रिलपयंर्त पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. नेवासा शहरात १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर प्रशासनाने शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय … Read more

अभिमानास्पद : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब तयार…ठरले देशातील पहिले रुग्णालय !

अहमदनगर :- फक्त सहा दिवसांत ‘कोविड १९‘ साठी नवीन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता वैद्यकीय अभिमत विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर चाचण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र विखे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. सध्या कोरोना चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ अधिक लागतो. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या ‘त्या’ नराधमाला अटक

अकोले : एक अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात असताना तिला रस्त्यालगतच्या शेतात नेऊन तिचा विनयभंग करणाऱ्याला अकोले पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव अजिंक्य दामोधर मालुंजकर असे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, अल्पवयीन मुलीच्या आत्याने याबाबत फिर्याद दिली असून त्यावरून अकोले पोलिसांनी अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथील अजिंक्य दामोधर मालुंजकर (वय … Read more

जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना बाधीत

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील असून दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, … Read more

गृहमंत्री देशमुख यांनी केले अहमदनगरच्या जिल्हा प्रशासनाने कौतुक, म्हणाले कोरोनाविरोधात….

अहमदनगर :- पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांनी त्याचा त्याच कारणासाठी वापर करणे आवश्यक आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ जणांवर राज्य शासनाने पर्यटन व्हिसा नियमाचा भंग केल्याबद्दल कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधीत व्यकींच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याचा संशय घेत पत्नीस चाकूने भोसकत पतीने घेतला गळफास !

अहमदनगर Live24 :-  देशात आणि राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात शिर्डी शहरातील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने चिडून पत्नीची हत्या करण्याच्या प्रयत्नात तिला चाकूने भोसकले व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले. गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात शांतता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विनयभंगाची तक्रार मागे घेण्याची धमकी देत २७ वर्षीय तरुणीवर घरासमोर बलात्कार

अहमदनगर Live24 :- विनयभंगाची तक्रार मागे घेण्याची धमकी देत एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगर शहरातील केडगाव भागात असलेला खान मळा परिसरातील ही घटना आहे. इथे राहणारी एक २७ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर अंगणात झोपलेली असताना तिच्यावर आरोपींनी रात्री १२ च्या सुमारास पिडीत तरुणीला झोपेतून उठवून तू आमच्याविरुद्ध दिलेली विनयभंगाचा … Read more

अहमदनगर मध्ये ‘त्या’ तबलिगींना अटक, धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर ;- तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचं उघडकीस आले आहे. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आलीय. नगरला आलेले 29 परदेशी नागरिक … Read more