आणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली…

अहमदनगर / अकोले :- मागील सुमारे पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या महिलेचे एका अपघातात निधन झाल्याची माहिती तिचे कुटुंबियांना मिळाली. ती ग्राह्य धरून नातलगांनी तिचे श्राद्ध कर्मही केले आणि अचानक ती महिला जिवंत अवस्थेत परतली. सटाणा, इगतपुरी, अकोले येथील पत्रकारांनी पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या या वृद्धेला तिच्या कुटुंबात परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच या लॉकडाऊनच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्याच्या टाकीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील डिग्रस येथील हर्षल अण्णासाहेब तांबडे (वय 11) या विद्यार्थ्याचा घराच्या पाठीमागे खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ एप्रिलला सकाळी १० च्या सुमारास तांबडेवस्तीवर घडली. हर्षल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीत शिकत होता. घटना घडली तेव्हा घरातील सर्व जण शेतात होते. त्याला संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी … Read more

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 :-  दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज येथील कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी लेख लिहिला होता. त्याचा राग मनात धरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शुक्रवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही तबलीग जमातविषयी लिहू नका; अन्यथा हात-पाय तोडून टाकू, जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या भोस यांना … Read more

मोठी बातमी ; अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ कारखाने सुरू होणार

अहमदनगर Live24 :- सरकारने लॉकडाऊन काळात जे उद्योग सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, असे कारखाने चालू करण्यासाठी कोणत्याही लेखी पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे विविध जीवनावश्यक वस्तू व शेतीशी निगडित उत्पादने सुरू होऊ शकतील. अन्न व संबंधित वस्तू, साखर, दुग्धशाळा, पशुखाद्य आणि चारा युनिट, औषध, लस, सॅनिटायझर्स, साबण आणि डिटर्जंट्स, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘सारी’ची चिंता वाढली !

अहमदनगर :- जिल्ह्यात सारी रोगाने मात्र वाढवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे ४२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८ कोरोना रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. १३ एप्रिलनंतर एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे सारीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधित नऊ जणांचे लाळेचे नमुने १४ दिवसांनंतर तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तुला करोना झाला आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 :- अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. तुला कोरोना झाला आहे. चल तुला घरी सोडवितो. असे म्हणत तिला मिठी मारली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा काही तासात तपास करुन पोलिसांनी अजिंक्य दामोदर मालुंजकर (रा. उंचकडक खुर्द) यास अटक केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ परदेशी नागरिकांना अटक !

अहमदनगर :-  कायद्याचे उल्लंघन करून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव केल्याप्रकरणी २४ परदेशी नागरिकांना अटक शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य ५ परदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात येणार आहे. सिव्हिल हास्पिटलमधून सोडल्यानंतर २४ परदेशी नागरिक व ५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यालयासमोर हजर केले जाणार दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री १३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तर, उर्वरित ०९ अहवाल नाकारण्यात आले असून ते जिल्हा रुग्णलयाकडे परत पाठविण्यात आले आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू, शेती निगडित उद्योग आणि औद्योगिक प्रकल्प सुरू होणार, केंद्र आणि राज्य शासनाने दिलीय सवलत

अहमदनगर :- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्या उद्योग आणि औद्योगिक प्रकल्पांना ते सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, अशा औद्योगिक प्रकल्‍प / उद्योगांना उत्‍पादन चालु करण्यासाठी किंवा उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी कोणत्याही लेखी वा इलेक्ट्रॉनिक पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात विविध जीवनावश्यक वस्तु शेतीशी निगडित उत्पादनांचा समावेश … Read more

चढ्या भावाने किराणा वस्तूंची विक्री करणार्‍या रिटेलर आणि होलसेल व्यापार्‍यांवर कारवाई होणार

अहमदनगर :- किराणा दुकानदार जीवनावश्‍यक किराणा वस्‍तूंची चढया भावाने विक्री करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच ग्राहकांना खरेदी मालाचे बिल देत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. व्‍यापारी संघटनेच्‍या वेळोवेळी घेतलेल्‍या बैठकीमध्‍ये सर्वच टप्‍यावरच्‍या व्‍यवहाराची पक्‍की बिले ठेवणे व ग्राहकाला बिल देण्‍याबाबतच्‍या सूचना यापूर्वीच दिल्या असतानाही अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात यश

राहुरी :- तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात वनिवभागाला यश आले. सोशल डिस्टनसिंगची मर्यादा पाळून उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत राहुरी वनविभागाच्या या कामगिरीचे स्वागत केले. पिंपळगाव फुणगी येथील मच्छिंद्र रामभाऊ बाचकर यांच्या शेतीतील गट नंबर ९६ मधील विहिरीत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्षाच्या शोधात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सारी रुग्णाची संख्या ४२ वर !

अहमदनगर:-  जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि ०४ मुलांचा समावेश आहे. अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री … Read more

आता बातम्याच द्यायच्या नाहीत का? बातमी दिली म्हणून अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारावर हल्ला

अहमदनगर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातम्या देणेही आता पत्रकारांना अडचणीचे ठरू लागले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकार गावात, शहरात फिरून बातम्या देत आहेत. नागरिकांकडून कौतूक दूरच त्यांच्या रोषालाच सामोरे जावे लागत आहे. नगर जिल्ह्यात पानेगाव (ता.नेवासे) येथील १७ कुटुंबांना क्वारंटाइन केल्याची बातमी गावातील पत्रकार बाळासाहेब नवगिरी यांनी दिली होती. बातमी दिल्याच्या रागातून जमावबंदीचा आदेश मोडत गावातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चाा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी आता प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर संबंधीत प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : नवऱ्याचा मोबाईल तपासल्याने बायकोस मारहाण !

अहमदनगर Live24  :- श्रीगोंदा तालुक्‍यातील आढळगाव येथे राहात असलेली विवाहित तरुणी सौ. रुपाली विशाल छत्तीसे, वय २४ हिने तिचा पती विशाल अंकुश छत्तीसे याचा मोबाईल चेक केला ,याचा राग आल्याने आरोपी नवरा विशाल अंकुश छत्तीसे, संजना अंकुश शिंदे, अंकुश किशन छत्तीसे, रा. आढळगाव यांनी मारहाण करुन रुपाली हिला ढकलून दिले. ती भिंतीवर आदळून डोक्याला व … Read more

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फोन गेला आणि हिवरे बाजारमध्ये मोठा अनर्थ टळला….

अहमदनगर Live24  :- आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राला अचानक दि.१२ एप्रिल २०२० रोजी दुपारी आग लागली, वनक्षेत्राला आग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामविकास तरुण मंडळाचे कार्येकर्ते व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कोरोना पेशंट्सना रूग्णालयातून सुटताच होणार अटक ….

अहमदनगर Live24 :-  धार्मिक कार्यक्रमासाठी  अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या 29 परदेशी नागरिकांसह सहा परराज्यातील नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहे. पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही क्वारंटाईन आहेत. यांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या … Read more

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात आज पासून सुरू होणार :- बबनराव पाचपुते

श्रीगोंदा – कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते मात्र उद्यापासून आपल्याकडे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होत आहे. पाणी सर्वाना मिळेल या बाबत कोठेही शंका नाही. सर्वांनी आपली काळजी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” आपल्याकडे आज … Read more