जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय

अहमदनगर : आजारी असलेल्या आईच्या औषधासाठी मुलाने थेट साद घातली ती जिल्हाधिकाऱ्यांना! त्यानंतर त्या सादेला प्रतिसाद देत पाउण तासात आवश्यक असलेली औषधे मुकुंदनगर येथील त्या मुलाच्या घरी पोहोच झाली. या घटनेतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय आला नसेल तर नवल ! कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी आहेत. मुकुंदनगरमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्‍हयातील सर्व दारु दुकाने ‘या’ तारखेपर्यत बंद !

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर देशात व महाराष्‍ट्र शासनाने लागू केलेल्‍या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व महाराष्‍ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्‍वये जिल्‍हयातील सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने 30 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहे. जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी … Read more

देवीच्या यात्रेची पालखी पोलिसांनीच आणली..

सोनई : घोडेगाव येथील जागृत देवस्थान घोडेश्वरी देवी यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. परंतु घोडेश्वरी देवी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व विधी,पूजाअर्चा तसेच आत्ताची चैत्र यात्रा देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच भाविकांशिवाय पार पडली. पोलीस बांधवांनी देवीच्या पालखीला खांदा दिला. चैत्र पंचमी तिथीला व १२ एप्रिल या तारखेला घोडेश्वरी यात्रा उत्सव सोहळा … Read more

प्रवरा नदीत बुडणाऱ्याला तरुणाने वाचविले

अकोले: अकोले तालुक्यातील ढोकरी येथे प्रवरा नदीच्या पाण्यात यशवंत डोळस हे पोहत होते. पोहत असताना ते दोन धाऱ्यापर्यंत पोहचले अन् गटांगळ्या खाऊ लागले. समोरच नदीच्या काठावर उभ्या असलेल्या अर्जुन पथवे या आदिवासी तरुणाच्या हे लक्षात आले. त्याने आपला जीव धोक्यात घालून थेट नदीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या यशवंतचे प्राण वाचविले. शनिवार,दि.११ रोजी दुपारची ही घटना … Read more

संगमनेरच्या मालपाणी परिवाराची कोरोना लढ्यासाठी सव्वा कोटींची मदत !

संगमनेर : राष्ट्रीय आपत्ती असो वा धार्मिक, सामाजिक कार्य असो प्रत्येकवेळी आपल्या दातृत्त्वाचा परिचय देणाऱ्या संगमनेरच्या मालपाणी परिवाराने ‘कोरोना’शी लढणाऱ्या शासन व प्रशासनाला भरीव अर्थसहाय्य केले आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी ‘संगमनेर सहाय्यता निधीला’ पाच लाखांचा धनादेश दिला. आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मालपाणी परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास … Read more

अहमदनगर करांसाठी अत्यंत महत्वाची बातमी वाचा आणि शेअर करा …

अहमदनगर :- कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, अहमदनगर छावणी परिषद तसेच जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास दि.15 एप्रिल 2020 ते दि.30 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी … Read more

‘त्या’ रुग्णाला तपासणाऱ्या तीन डॉक्टरांसह ११ जण क्वारंटाईन

नेवासा : शहारातील एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. नेवासा शहरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासा शहरात अत्यावश्यक सेवाही दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. सोमवारी सकाळी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महिती मिळताच शहरातील चालू असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केला तरुणावर हल्ला, बिबट्याशी झुंज आणि अखेर झाले असे काही….

अकोले: अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील चितळवेढे येथे बिबट्याने तरुणावर हल्ला केला. तरुणाने बिबट्याचा तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केला. काही काळ दोघांची झुंज चालल्यानंतर अखेर बिबट्या पसार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे समीर अशोक आरोटे (वय २१) हा आपल्या शेतामध्ये टोमॅटोला पाणी भरत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान या शेतामध्ये दबा धरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मास्क न वापरणाऱ्यावर गुन्हा

खर्डा : कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव पाहता खर्डा येथे गेली अनेक दिवस लॉकडाऊन असल्यामुळे खर्डा शहर पूर्णपणे बंद असताना तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. खर्डा येथील सोनेगाव चौकात पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साखरे यांना एक इसम विनाकारण फिरताना दिसून आल. त्याला घराच्या बाहेर का पडला असे विचारले असता त्याला समाधानकारक उत्तर … Read more

पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिगचा फज्जा

पाथर्डी :- तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर कारखाना परीसरातील पेट्रोल पंपवर दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, निवंडुगे, ढवळेवाडी, कोपरे, वाघोली, चितळी, साकेगाव तसेच शेवगाव, तालुक्यातून पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी लोक दररोज येतात. कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल ठरलेल्या वेळेप्रमाणे चालू आहे. तसेच वेळेत बंदही होत … Read more

मदत वाटपाचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल !

अहमदनगर :- लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्नधान्य, फुड पाकीट, जेवण व अन्य मदत देत असल्याबाबतचे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मिडीयामध्ये अनेकजण पोस्ट करीत आहेत. अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निर्बंध घातले असून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ठाण्यातून आलेल्या मुलाचा अहमदनगरमध्ये मृत्यू

अहमदनगर Live24 टीम :- कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू … Read more

अहमदनगर जिल्‍हयातील सर्व शाळा तसेच महाविद्यालय, अंगणवाडया, क्‍लासेस ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद !

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त, व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस दिनांक 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. कोरोना विषाणूचा … Read more

जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार 30 एप्रिलपर्यंत बंदच राहणार

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक 30 एप्रिलपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना य फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात नवे संकट ! महिलेचा सारी आजारामुळे मृत्यु ….

अहमदनगर Live24 टीम :-  जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. कोरोनापाठोपाठ सारीनेही नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. ‘सारी’ या आजारामुळे कोपरगावात आज एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय कोपरगाव तालुक्यातील एका ६५ वर्षीय … Read more

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले हे आवाहन

अहमदनगर Live24 टीम :-  कोपरगाव शहरातील कोरोना बाधित आढललेल्या ६० वर्षीय महीलेचा आज पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेला श्र्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटल मधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे जिल्ह्यात या महिलेच्या मृत्युमुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू …जिल्ह्याची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 टीम :-  कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या … Read more

मोफत शिवभोजन देऊन ‘त्यांनी’ माणुसकी जपली

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना कर्फ्यूच्या काळात रोजगार नसलेल्या उपाशी लोकांना मोफत शिव भोजन थाळीची सेवा देणाऱ्या चव्हाण बंधू यांनी या संकटाच्या काळातही माणुसकी व समाजसेवेचा भाव जपला आहे. अशी शाबासकी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी दिली आहे. नगर शहरात इतरही शिवभोजन थाळी केंद्रांनी चव्हाण यांचा आदर्श घेऊन त्यांचे अनुकरण करावे व कोरोना कर्फ्यू … Read more