कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘नागवडे’ कारखाना तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपये देणार

श्रीगोंदा ;- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ‘नागवडे’ कारखाना श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपये तर तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देणार असल्याची माहिती ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. गरज पडल्यास स्थानिक प्रशासनाला देखील आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे नागवडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या … Read more

लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; स्पर्धेत सहभागी होऊन मिळावा बक्षिसे !

पुणे : सध्याच्या लॉकडाऊनमध्ये मोबाइलवर फ़क़्त गेम खेळणे व व्हिडिओ पाहणे याच्याही पल्याड जाऊन तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘वाचा, परीक्षा द्या आणि बक्षीस मिळवा’ ही स्पर्धा लोकरंग फाउंडेशन (बाबुर्डी बेंद, अहमदनगर) यांनी आयोजित केली आहे. गुगल डॉक्सच्या मदतीने घरबसल्या अभ्यास आणि परीक्षा देण्याची सोय असल्याने राज्यातील पहिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुकानास आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान !

नेवासा :- तालुक्यातील सोनई येथे आज पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत माहिती अशी की सोनई बाजारपेठेतील मनोज जनरल स्टोअर्स या दुमजली दुकानाला आज गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान, फर्निचर जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मुळा कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले. … Read more

विलगीकरण कक्षासाठी मदरसाने इमारत दिल्याने ग्रामस्थांनी मदरसेच्या मौलानांना जीवनावश्यक वस्तू देणे केले बंद !

अहमदनगर  ;- कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देत नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) ने मदरसेने देऊ केलेली इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) कार्यान्वीत झाली आहे. मात्र मनपाचे आरोग्य प्रशासन व बाराबाबळीचे ग्रामस्थ सहकार्य करीत नसून, बेजबाबदारपणाचे वर्तन केले जात असल्याचा आरोप मदरसाच्या विश्‍वस्तांनी केला आहे. मनपा प्रशासनाने मंगळवार … Read more

संकटकाळात जगताप कुटुंबीय नेहमीच अग्रेसर : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर :- भारत देशावर कोरोना संसर्ग विषाणूचं संकट आलेले आहे. अतिशय गंभीर असे हे संसर्ग असल्यामुळे देशावर मोठे संकट उभे झालेले आहे. या संकटकाळात या कोरोना विषाणूस रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. देशात हातावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विषारी औषध पोटात गेल्याने तरूणीचा मृत्यू

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील तरुणीचा विषारी औषध पोटात गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.सीमा प्रेमकुमार पासीय (वय ३०) असे तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सिमा हिला राहाता तालुक्यातील प्रवरा हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना तिचा दुसऱ्या दिवशी ३१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ८३ अहवालापैकी ८२ अहवाल आले निगेटीव्ह !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले.  त्यापैकी ८२ अहवाल निगेटीव आले असून एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.  ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून … Read more

‘होमक्वारंटाइन’च्या वादातून दोन कुटुंबात झाल्या मारामाऱ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी होम क्वारंटाइन केलेले दत्तू कचरू सदगीर व देवराम कचरू सदगीर (दोघेही मुथाळणे) यांना ‘तुम्ही होम क्वारंटाइन आहात, बाहेर फिरू नका’, असे सांगितल्याचा राग आल्याने या दोघांनी आपल्या घरातील १० जणांना बोलावून घेत बाळू पूंजा सदगीर यास बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी मुथाळणेफाटा येथे घडली. जखमी बाळू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना मुळे काम नसल्याने विधवा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नाही. हाताला काम नसल्याने जगायचे कसे या विंवचनेतून दोन लहान मुले असलेल्या मजूर विधवा महिलेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने एका कार्यकर्त्यांच्या लक्षात ही घटना आल्याने तो अयशस्वी ठरला व या महिलेचा जीव वाचल्याची घटना सोमवारी अकोल्यात घडली. कोरोनाच्या या संकटात … Read more

श्रीरामपुरहून आलेले दोन कोरोना संशयीत बहाणा करत झाले गायब !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेले दोघे कोरोना संशयीत केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग … Read more

अहमदनगरमधील रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीडमधील तरुणास कोरोना !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगरमधील रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीडमधील तरुणास कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.  नगर तालुक्यातील अलमगीर येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील 84 संशयितांचे सोमवारी तर मंगळवारी आणखी 61 असे 145 स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. यातील 83 व्यक्तींचे अहवाल सोमवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाले होते. यात एकाला कोरोना … Read more

स्वस्त धान्य दुकानांवर कोरोना संसर्ग होण्याचा धोका

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्वस्त धान्य दुकानावर ठेवलेल्या पॉस मशीनवर अंगठा ठेवल्याशिवाय कुपन धारकांना धान्य मिळत नाही. परंतु आता प्रत्येक माणसाने पॉस मशीनवर हात ठेवून त्यामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटल्याने शासनाने त्या मशीनवर शिधापत्रिका धारकाच्या आंगठ्या ऐवजी दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य देण्यास परवानी दिलेली आहे. ही बाब एका दृष्टीने योग्य झाली. ज्यांना धान्य वाटप केले … Read more

तहसिलदारांची वृद्ध महिलेला धमकी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी जवळा येथे एका वृध्देच्या घरात जावून दमदाटी करत काठी उगारत मुलावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरल्याने पारनेर तालुक्यातील जवळे येथील हरणाबाई लक्ष्मण सालके या 65 वर्षीय महिलेचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सबंधित महिलेने रुग्णालयातून जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार … Read more

भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाला चमकोगिरी चांगलीच भोवली !

  अहमदनगर लाईव्ह24 टीम :- माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमाफी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.  शेजारच्या गावातील डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी केल्याने डॉक्टरांसह त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोमवारी … Read more

विनाकारण फिरताना शिवीगाळ करनाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले : मुंबईहून आलेल्या व होम क्वरंटाईनचा शिक्का मारलेला असताना देखील कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना येथील दोघांना ग्रामविकास अधिकारी समजावून सांगत असता शिवीगाळ केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कळस येथील ग्रामविकास अधिकारी कचरू पुंजाजी भोर यांनी याबाबत अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे … Read more