अहमदनगर ब्रेकिंग : धार्मिक द्वेष पसरविल्यावरून गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर : धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून येथील मनोज चिंतामणी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणी याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या. चुकीचे संदेश प्रसारित केले. या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ॲड. … Read more

कोरोनाच्या संकटात संजीवनीचे सॅनिटायझर बाजारात !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या संकटात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील डिस्टिलरीने ‘क्ि­लन ऑल’ या हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, अशी माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. सॅनिटायझरच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे बोलत होते. आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत, अशा साखर कारखान्यांनी सॅनिटाझरची निर्मिती करावी, असे आवाहन शासनाने केले होते. त्या … Read more

सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेर : सध्या कोरोनाने जगभरात चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सर्वांची काळजी घेत आहे. मात्र, तरीही लोक बेजबाबदारपणे वागत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. सध्या राज्यात कोरोनाची संख्या वाढत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या सीमा झाल्या बंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध गावांनी आपले रस्ते बंद करुन नो एन्ट्रीचे बोर्ड लावल्याचे चित्र दिसत आहे. जेऊर परिसरातील चापेवाडी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तसेच यापुर्वीच धनगरवाडी, शेंडी गावात रस्ते बंद करुन प्रवेश निषीध्द असे बोर्ड लावण्यात आले होते. रस्ते बंद करण्याचे लोन आता तालुक्यात वेगवेगळ्या गावात पोहचल्याचे दिसुन येत आहे. … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण; एकूण संख्या आता वीस !

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.आज तीन रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात तीनजण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.  यात  नगर शहरातील दोन जण तर राहाता तालुक्यातील लोणी येथील एकाचा समावेश आहे. यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पूर्ववैमनस्यातून ‘या’ तालुक्यात झाला गोळीबार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीय श्रीरामपूर तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वादावादी तसेच हाणामारी होवून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक  घटना समोर आलीय  खैरीनिमगाव (ता. श्रीरामपूर) येथे काल रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.या गोळीबारात एक जण गंभीर … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ कारच्या शोरूमला लागली आग, मोठा अनर्थ टाळला …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर – मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकाजवळ असलेल्या टाटा शोरुमला शनिवारी दि. 4 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत एक टाटा सुमो जळाली आहे. तातडीने महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली. एमआयडीतील टाटा शोरुम असून सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या संचारबंदी मुळे ते बंद आहे. शोरुम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात आढळला आणखी एक कोरोना बाधित रुग्ण; एकूण संख्या आता अठरा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३५ अहवाल प्राप्त झाले त्यात नगर शहरातील एक ७६ वर्षीय व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता अठरा झाली आहे. … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी सरसावले आ. संग्राम जगताप, लॉकडाऊनच्या काळात घरपोच सात हजार कुटुंबांना देणार किराणा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत जाहीर करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन लक्षात घेऊन आ. संग्राम जगताप पुढील १0 दिवस गरजूवंतांना सुमारे सात हजार कुटुंबांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरपोच किराणा देणार आहेत. त्यामुळे कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शासन व प्रशानाच्या नियमांचे प्रत्येकांनी अंमलबजावणी करावी. आजोबा बलभिम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोरांचा मंदिरावर डल्ला, एक लाखाचे दागिने लंपास !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गावाचे ग्रामदैवत ब्रम्हनाथ महारांच्या मूर्तीच्या अंगावरील दोन ते अडीच तोळ्याचे सोन्याचे दागीने कानातील बाळ्या व गळ्यातील लॉकेट असा सुमारे एक लाख रुपयाचा ऐवज दोन चोरट्यांनी गुरुवारी रात्री चोरुन नेला. मंदिरात व परीसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. सोनोशी गावात नदीच्या जवळच ब्रम्हनाथ महारांजाचे मंदिर आहे. मंदिरात ब्रम्हनाथ … Read more

जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आणि पेशंट्सबद्दल महत्वाची माहिती

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-कालपर्यंत जिल्ह्यात ४८९ व्यक्तींची तापासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४१९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४२९ व्यकींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, दक्षतेचा उपाय म्हणून १६६ व्यक्तींना निगराणीत ठेवले आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेले ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १७ आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या विदेशींच्या कारणामुळे वाढली आहे. … Read more

श्रीगोंद्यात सहा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ,तालुका तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आतापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे, आतापर्यंत जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील 6 व्यक्ती हे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असल्यामुळे त्यांना आज सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. श्रीगोंदे तालुक्यात आतापर्यत … Read more

अहमदनगर गुड न्यूज : कोरोणाचा दुसरा रुग्णही बरा होवून घरी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बूथ हॉस्पिटल येथून बरा होऊन आज त्याच्या घरी रवाना झाला. यावेळी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला रवाना केले. कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बरा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी वैद्यकीय … Read more

पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अलिकडच्या काळात ज़रा जास्तच बोलू लागले आहेत. पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शुक्रवारी थोरातांचा समाचार घेतला. देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मोदींच्या एका आवाहनाने … Read more

अहमदनगर जिल्ह्याला आता ‘त्या’37 अहवालांची प्रतीक्षा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या ०९ स्त्राव नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले असून जिल्ह्यात कोरोना बाधित आढळलेल्या दुसर्‍या रुग्णाच्या १४ दिवसानंतर पाठविलेल्या स्त्राव चाचणी अहवालाचाही समावेश आहे. आज पुन्हा या रुग्णाचा दुसरा स्त्राव चाचणी नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो … Read more

अहमदनगर करांसाठी एक आनंदाची बातमी…वाचा सविस्तर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात काल एकाच दिवसात नऊ रूग्ण सापडले होते त्यामुळे अनेकांच्या टेन्शनमध्ये भर पडली  मात्र, आजचा दिवस नगर करांसाठी चांगला ठरला आज सकाळी नऊजणांचे रिपोर्ट आले. ते सर्व निगेटीव्ह आहेत. त्यामुळे थोडेसे अहमदनगर जिल्ह्यात आज दिलासादायक वातावरण आहे.  दरम्यान जिल्ह्यातील दुसर्य़ा कोरोना रूग्णाचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज पुन्हा … Read more

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिट लाईट्स बंद करून बाल्कनी अथवा घरासमोर उभे राहून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले . या त्यांचा आवाहनावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली … Read more

कोरोनाविरोधात लढण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे यांच्याकडून १ कोटी रूपयांचा निधी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की,कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान … Read more