अहमदनगर ब्रेकिंग : मशिदीत २३ जणांना लपवले, गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोनमधील उमर फारूख मशिदीमधून पोलिसांनी बुधवारी २३ नागरिकांना ताब्यात घेतले. या सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. या प्रकरणी तबलीक जमातीचे सचिव अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. उमर फारुक मशिदीमध्ये अमरावती, पुणे, वर्धा, तसेच उत्तरप्रदेशातील २३ नागरिक थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी तपासणी केली … Read more

बांधाचा वाद : सुनेला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नेवासे तालुक्यातील लेकुरवाडी आखाडा येथे मुलाला व सुनेला कुऱ्हाडीने व गजाने मारहाण केल्याप्रकरणी सोपान सुखदेव महारनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ नामदेव व वडील सुखदेव यांच्यासह सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे, कुटुंबात सामायिक बांधाचा वाद सुरू असून २५ मार्चला धाकटा भाऊ नामदेव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी तिघाना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा पोहोचला 17 वर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, गुरुवारी (दि.२) रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तपासणीचे अहवाल गुरुवारी दिवसभरात प्राप्त झाले. दुपारी सहा रुग्णांना कोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल आला, वाचा सविस्तर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बारामती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आले असल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथे पाठविल्या नंतर आज दि.२ एप्रिल रोजी त्या तीन जणांचे कोरोना तपासणी अहवाल मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. २० मार्च … Read more

ब्रेकिंग न्यूज : कार पेटवून देत ठाकरे कुटुंबियांना जीव मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात लाॅकडाउन असताना राहाता तालुक्यातील निमगाव कोर्राळे गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलेली स्विप्ट डिझायर ही चार चाकी गाडी उभी असताना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर मधील दोघांना कोरोना, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील असून सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे राहात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 6 नवे कोरोना रुग्ण आढळले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील असून सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे … Read more

कोरोनाचा असाही परिणाम अहमदनगर – बीड जिल्ह्यातील सीमावाद सुरू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नगर जिल्ह्यातील लोकांना येण्यास बंदी करावी या हेतूने वृद्धेश्वरच्या घाटात दगड माती टाकून हा रस्ता काही लोकांनी बंद केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आता या कोरेमुळे अंतर्गत सीमावाद देखील सुरू झाले आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वृद्धेश्वर घाटच … Read more

मोहटा देवस्थानची ५१ लाखांची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थान समितीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दिला. दहा दिवसांपासून शहरात रामनाथबंग मित्रमंडळाच्या वतीने गोरगरिबांना जीवनाश्यक वस्तू उपक्रम राबवून अनेक भुकेलेल्यांची भूक भागवली. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधवबाबा, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब राऊत, उद्योजक संदीप काटे, नगरसेविका दिपाली बंग आदींच्या हस्ते उपक्रमाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चोरट्यांचेच झाले एप्रिल फूल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र संचारबंदी असतानाही मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुकाण्यात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या जागरूकपणापुढे चोरट्यांच्या टोळीला पळ काढावा लागल्याने नागरिकांच्या प्रसंगावधानपणाने चोरट्यांचे एप्रिल फुल झाले. मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वंदेमातरम नगरात चोरटयाच्या टोळीने प्रवेश केला त्याच वेळी या नगरतील कुत्रे जोराने भुंकत असल्याने नागरिकंाना संशय आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतीनेच केली पत्नीची हत्या,नंतर सांगितले ‘हे’ कारण

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी बनाव तयार करून मृत विवाहिता ही गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. सविता भगवान हुलवळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखीलेश कुमार सिंह नगरचे एस पी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखीलेश कुमार सिंह यांची आज नेमणूक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे माजी पोलिस अधीक्षक  इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते. बुधवारी रात्री उशिरा याबाबत गृह विभागाने आदेश काढले. सिंह हे  मुंबई शहराच्या … Read more

मुकूंदनगर भाग मिलिटरीच्या ताब्यात देणार ! हा संदेश तुम्ही वाचला होता ? जाणून घ्या त्यानंतर काय घडले …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   अहमदनगर : सोशल मिडियात कोरोना आजारासंदर्भात खोटा मेसेज पाठवून अफवा पसरविणाऱ्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताहिर शेख (रा.मुकूंदनगर,नगर) याने त्याच्या मोबाईल नंबरवरून कोरोना आजारासंदर्भात एका ग्रुपवर मुकूंदनगर, फकिरवाडा भाग मिलिटरीच्या ताब्यात देणार असून याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी तसेच मिलिटरी काही सरकारी … Read more

संगमनेर : ‘ती’ आकडेवारी लक्षात घेता शहरासह तालुक्­यातील स्थिती गंभीरतेकडे जाणारी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर येथे दोन परदेशी व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने ते जिल्ह्यातील कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती जिल्हा प्रशासनाने काढली. त्याआधारे संगमनेरच्या प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया यांनी पथकासह … Read more

परदेशी नागरिकांना मशिदीत आश्रय देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नेवासा : परदेशातील १० व्यक्तींना मशिदीत आश्रय देऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मशिदीचे ट्रस्टी आहेत. कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी मंगळवारी याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीमध्ये म्हटले आहे की, काल मी तसेच, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक बी. एस. दाते, … Read more

कोरोनाचे संकट उंबरठयावर येऊन ठेपलय, आता तरी बेफिकीरपणा सोडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंदा : कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून, शहरी भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ग्रामीण भाग कोरोनाच्या प्रसारपासून लांब होता. परंतु बारामती येथील एक रिक्षावाला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर श्रीगोंद्याच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन दाखल झाला आहे. याचे कारण म्हणजे बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आल्यामुळे आता … Read more

नामदार तनपुरेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल जनतेमधून कौतूक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पाथर्डी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले, तारा तुटल्याने गावठान तसेच शेतीपंपाचा देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा स्पष्ट सूचना या भागाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना … Read more

जे घराबाहेर पडतील त्यांच्या हातात दिसणार ‘मी समाजाचा शत्रू’चे बोर्ड

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंदा : घरात रहा, सुरक्षित रहा रस्त्यावर फिरू नका, गर्दी करू नका, असे पोलिस व महसूल विभागाकडून वारंवार सांगूनसुद्धा काही लोक विनाकारण रस्त्याने फिरत असल्यामुळे आता या लोकांना अद्दल घडवण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आता नवीन शक्कल शोधून काढली आहे. जे लोक विनाकारण घराबाहेर रस्त्याने फिरताना दिसतील त्यांच्या हातात मी प्रशासनाने … Read more