कौतुकास्पद : जिल्हा मराठा विद्या प्रसारक देणार ५० लाखांचा निधी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नामांकित असलेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी.डी. खानदेशी यांनी दिली. संस्थेचे विश्वस्त, कार्यकारणी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मिळून हा निधी … Read more

कोरोना लढ्यासाठी खासदार लोखंडेंनी केली एक कोटीची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत … Read more

‘या’ तालुक्यात पाच हजार नागरिक होम क्वारंटाईन

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे, मुंबई तसेच इतर राज्यात पोटापाण्यासाठी गेलेले तालुक्यातील नागरिक पुन्हा गावाकडे परतले आहेत. अशा परतलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली असून, ग्रामीण भागात ६७५९ नागरिक परत आले आहेत. यापैकी ५०८९ नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले आहेत. पोलिस पाटलांमार्फत या … Read more

धक्कादायक : दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात सहभाग घेवून अहमदनगर जिल्ह्यात परतले ३४ जण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील ३४ जण असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी २९ जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी १४ जणांची स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ४३७ … Read more

कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये आणखी तिन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबतचा अहवाल पुणे येथील एनआयव्ही राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्रशासनास काल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हयात कोरोना बाधीतांची संख्या एकूण ८ झाली दरम्यान नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे. परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून … Read more

नामदार बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयात कोरोना रोखण्यासाठी राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यभर वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी यशोधन या संगमनेर येथील कार्यालयात स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने कायम … Read more

शहरातील ‘त्या’ नगरसेवकांची चमकेगिरी आणि सोशल मीडियातील फोटोसेशनही बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- प्रभागांतून धूर व जंतुनाशक फवारणी केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियातून शेअर करण्याची नगरसेवक मंडळींची सुरू असलेली चढाओढ आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यामुळे बंद झाली. नगरसेवकांना जंतुनाशके द्यायची नाहीत, अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच जंतुनाशक फवारणीनिमित्त गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचा भंग कोणी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईच्याही सूचना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ‘या’ भागात पुन्हा आढलले 9 परदेशी नागरिक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  शहरातील मुकुंदनगर भागात एका इमारतीमध्ये आणखी नऊ परदेशी व दोन भारतीय नागरिक आढळून आले आहेत. याप्रकरणी या नऊ जणांना ठेवून घेत प्रशासनाला माहिती न दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान आता या सर्वांना सिव्हिल हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात इंडोनेशियामधील पाच, गुनाई देशातील चार नागरिक आहेत. राजस्थान व मध्य … Read more

मोबाईल व इंटरनेटच्या सेवा पुढील तीन महिने मोफत देण्याची मागणी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन असताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी मोबाईल व इंटरनेट सेवा गरजेची झाली असून, या लॉक डाऊनमुळे सर्व सामान्य नागरिकांना मोबाईल रिचार्ज करता येणार नाही. यामुळे मोबाईल व इंटरनेटची सेवा खंडित न करता ती नागरिकांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत देण्याची मागणी लहुजी … Read more

आसामचे कामगार फसले नगर एमआयडीसी मध्ये ,सत्यजित तांबेना संपर्क होताच मदत पोहोचली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर एमआयडीसीतील कंपनी मध्य कामाला आलेले आसाम मधील काही कामगार अडकले आहे , सर्व काम बंद असल्याने व पैसे नसल्याने  त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती , आशा परिस्थितीमध्ये त्यांनी आसाम चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार रिपून बोरा यांना Whatsapp द्वारे अडचण कळून  मदतीसाठी विनंती केली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश … Read more

वादळी पावसाचा पाथर्डी तालुक्याला तडाखा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पाथर्डी : तालुक्यातील वादळी पावसाने पाचशे बेचाळीस घरांची पडझड झाली आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागाचे नुकसान झाले आहे. करंजी, मिरी, कोरडगाव, पाथर्डी, तिसगाव, माणिकदौंडी परिसरात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे . दोघांचा मृत्यू झाला आहे. पडलेली घरे व नुकसान झालेल्या पंचनामे करावेत व कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांची कडक अमंलबजावणी … Read more

कोरोनामुळे कोंबडी 50 रुपयांत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाने हाहाकार उडवला असून याचा अनेक व्यवसायांना फटका बसला असला तरी कोरोनाचा कुक्कुटपालक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असून अवघ्या 50 रुपयांना एक या दराने कोंबड्या विकण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली असून मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. बेलपिंपळगाव येथील शेतकरी रत्नदीप कांबळे शेतीला जोडधंदा म्हणून सुगुणा कंपनीतर्फे ब्रॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय … Read more

यशवंतराव गडाख यांनी ‘जे’ केलं ‘ते’ जिल्ह्यातील बाकी साखरसम्राटांना जमेल का ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक म्हणून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे. करोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुस्लीम धर्माच्या प्रसारासाठी आलेल्यांकडून अहमदनगर जिल्ह्यात झाला कोरोना व्हायरसचा प्रसार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना  कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली आहे. रविवारी (२९ मार्च) नगरमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या दोन विदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामधील एक व्यक्ती फ्रान्स, तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. या दोघांचे नगर शहरासह जामखेड येथे वास्तव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना आज कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली असून त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान केली आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात २३ मार्च पर्यंत परदेशातून आलेल्या … Read more

कष्टकरी कामगारांसह लेकराबाळांच्या चेह-यावर दिसला भाकरीचा आनंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील सावेडीनाका येथील आदिवासी वस्ती असलेल्या विट, वाळू लोडींग अन्लोडींग करणारे कष्टकरी कामगारांची वसाहत असुन या असंघटीत कामगारांची सरकार दरबारी कुठलीच कामगार म्हणून नोंद नाही. कारण शासकीय जिआरमधे संदिग्धता आहे. हे कामगार बांधकाममधेही नाहीत आणि माथाडीमधेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. यांची माथाडी कामगार किंवा बांधकाम … Read more

‘एप्रिल फुल’ चे संदेश पाठविण्या अगोदर ‘ही’ बातमी नक्की वाचा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘ एप्रिल फुल ‘ चा दिवस सगळे एप्रिल फूलच्या निमित्ताने सर्वाना मस्करीचे मेसेज एकमेकांना पाठवत असतात . पण उद्या(१ एप्रिल ) जर कोणी एप्रिल फुल अथवा अफवांचे मेसेज फॉरवर्ड केले तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत . सर्व लोक सोशल … Read more

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले … Read more